कुम्भलगड किल्ल्याची माहिती

Kumbhalgarh Fort

कुम्भलगड किल्ला मेवाड प्रांतातील प्रसिध्द किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला अरवली पर्वतात स्थित आहे. राजस्थान येथील उदयपुर जिल्ह्यातील राजसमंद येथील प्रदेशात हा किल्ला वसलेला आहे. हे एक वैश्विक धरोहर म्हणून भारताला गौरवान्वित करते. याचे निर्माण १५ व्या शतकात राजा राणा कुंभ यांनी केला. कुम्भलगड किल्ला महान व योद्धा महाराणा प्रताप यांची जन्मभूमी सुद्धा आहे. महाराणा प्रताप मेवाडचे विर योद्धा व इतिहासातील प्रेरणास्त्रोत असलेले शासक होते.

१९ व्या शतकापर्यंत हा किल्ला महाराणा वंशाची संपत्ती होता. आज तो सामन्यांसाठी खुला केला आहे. उदयपुर पासून ८२ कि.मी. पश्चिमेस कुम्भलगड किल्ला आहे. चित्तोडगढ नंतर हा महाराणा वंशाचा मुख्य किल्ला मानल्या जातो. राजस्थान मधील सर्वात सुंदर व विशाल किल्ल्यामध्ये ह्या किल्ल्याचा समावेश होतो.

Kumbhalgarh Fort History

कुम्भलगड किल्ल्याची माहिती – Kumbhalgarh Fort History in Marathi

२०१३ मध्ये कम्बोडीया येथे आयोजित वर्ल्ड हेरीटेज कमिटीने ३७ व्या अधिवेशनात कुम्भलगड किल्ल्यास जागतिक दर्जा देत ह्यास वैश्विक संपत्तीचा भाग म्हणून घोषित केले जी भारतासाठी गौरवाची बाब ठरली.

कुम्भलगड किल्ला – गढ – Kumbhalgarh Killa

युनेस्कोने राजस्थान मधील अशा इतर किल्ल्यासह याचा समावेश करून भारताचा गौरव वाढविला ३८ कि.मी. लांब किल्ल्याच्या भिंतींची नोंद चीनच्या ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर सर्वात उंच व लांब भिंतीत केली जाते. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची लांब व उंच किल्ल्याची भिंत आहे.

या किल्ल्याच्या इतिहासाबाबत पाहिजे तशी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. याच्या नावाबाबत उल्लेख सापडतो कि, याचे प्राचीन नाव मछीद्रपूर असे होते. प्रसिद्ध इतिहासकार साहिब हकीम यांनी यास माहोर हे नाव दिले होते. त्यांच्या मते या किल्ल्याचे निर्माण मौर्य सम्राट सप्रती यांनी इ.स.६०० मध्ये केला असावा.

इ.स.१३०८ च्या अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमनापूर्वीचा इतिहास फारच अस्पष्ट आहे. त्यामुळे या किल्ल्याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

काही स्पष्ट पूराव्याद्वारे हे सिद्ध होते कि, हे मेवाडमधील हिंदू सिसोदिया राजपुतांच्या राज्याचा मुख्य गढ मानला जाई. ब्रिटीश काळात इंग्रजांच्या हल्ल्यात किल्ल्याचा बराच भाग पाडला गेला. त्यामुळे यास ब्रिटीश सरकारने प्रसिद्ध वास्तुविशारद एरा मदन यांच्या कडून किल्ल्याची डागडुजी करून घेतली.

राणा कुंभ चे साम्राज्य रणथम्बोर ते ग्वालियर पर्यंत पसरले होते. ज्यात मध्यप्रदेशातील बराच भाग व काही राजस्थानच्या भागाचा समावेश आहे. राणा कुंभ याच्या अधिपत्याखाली ८४ किल्ले होती. ज्यापैकी ३२ अत्यंत सुंदर कलाकुसरी व वास्तुशास्त्राचा विशेष अभ्यास करून बांधल्या गेले आहेत.

कुम्भलगडने मेवाड आणि मारवाड प्रांतांना अलग अलग केले आहे.

कुम्भलगडावरील एक प्रसिद्ध घटना जुळली आहे. १५३५ साली येथील राजकुमार उदय यास येथून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला शत्रूंच्या आक्रमणास तोंड देण्यास ह्या किल्ल्याने महत्वाची भूमिका बजावली. शत्रू परत गेला. राजकुमार उदय यांनी उदयपुर या किल्ल्या जवळ वसवून याचे महत्व स्पष्ट जाणले.

इतिहासात ह्या किल्ल्यास सर करणे फारच कठीण मानले जाते. अम्वेर राजा मानसिह, मारवाड राजा उदय सिह आणि सम्राट अकबर यांनी यावर स्वारीचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे हा किल्ला सर करता येत नाही.

स्पष्ट पुराव्यानुसार अहमदशाह अब्दाली ने ह्या किल्ल्यावर आक्रमण (१४५७) केले परंतु त्याचा हा प्रयत्न असफल ठरला असे मानले जाते कि, या किल्ल्यावरील वन माता देवी ह्या किल्ल्याचे रक्षण करते.

यानंतर १४५९ आणि १४६७ मध्ये मोहंमद खिलजीने आक्रमण केली परंतु त्यासही हा किल्ला सर करता आला नाही. अकबर बादशहाच्या मेवाड घराण्याशी संबंध असल्यामुळे हा किल्ला १५७६ पासून मोगल सत्तेचा हिस्सा बनला. काही वेळा हा किल्ला मराठ्यांच्या उत्कर्षात त्यांच्या ताब्यात होता. मेवाड घराण्याच्या राणा कुंभ वंशीयांनी ह्या किल्ल्याची वेळो वेळी डागडुजी व काही पाहिजे तसे बदल घडवून आणले.

कुम्भलगडचे सांस्कृतिक महत्व

राजस्थान पर्यटन विभागाने या ऐतिहासिक किल्ल्याचे महत्व जाणून कुम्भलगड महोत्सव करण्याचे ठरवले आहे. या महोत्सवात किल्ल्यास योग्य रोषणाई व रंगरंगोटी करून सजवले जाते. नृत्य,कला,संगीत यांचे प्रदर्शन होते. या उत्सवात विविध स्पर्धाचे आयोजन होते. बहारदार मिशा, पगडी बांधणे, रस्सीखेच, युद्धकलेचे प्रात्यक्षिक, मेहंदी व रांगोळी भरणे इत्यादी स्पर्धा आयोजित होतात.

५ दिवस चालणारा हा महोत्सव पाहण्यासाठी भारतातूनच नाही तर विदेशातूनही लोक येथे येतात. मोठ्या थाटामाटात ह्या महोत्सवाची सांगता केली जाते. कुम्भलगडाची एक अविस्मरणीय आठवण पर्यटक येथून हसतमुख जातात.

राजस्थान मधील ६ किल्ल्यांमध्ये मुख्यतः अमेरचा किल्ला, चित्तोडगड किल्ला, जैसलमेर किल्ला, कुम्भलगड किल्ला आणि रनथम्बोर किल्ला या सर्वांनी राजस्थान प्रदेशाची संस्कृती साऱ्या जगासमोर प्रस्तुत केली आहे.

राजपुतांची शान मानल्या जाणारा कुम्भलगड किल्ला शेकडो किलोमीटर मध्ये पसरलेल्या अरवली पर्वताच्या हिरवळीने मोहून जातो तर दुसऱ्या बाजूस थार चे वाळवंट असे सुंदर देखावे या किल्ल्याहून तुम्ही पाहू शकता.

चला तर मग एकदा तरी कुम्भलगड किल्ल्यास भेट देऊ या. तेथील शाही जीवन अनुभवूया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top