चीनमध्ये जगातील सर्वात खतरनाक प्राणिसंग्रहालय

Lehe Ledu Wildlife Zoo

आपण कधी जंगली प्राण्याला साक्षात जवळून पाहिले आहे का? मग तो वाघ असो कि सिंह. काही जनांनी पाहिलेले सुद्धा असेल पण खूप कमी लोकांनी. जे लोक प्राण्यांवर अभ्यास करत असतात किंवा त्यांना जंगली प्राण्यांना जवळून पाहायची इच्छा असते.

पण प्राण्यांच्या भीतीने ते त्यांना जवळून पाहू शकत नाहीत. कारण त्यांच्या जवळ आपण जायचे प्रयत्न केले तर ते आपल्याला इजा पोहचू शकतात. पण आजच्या लेखात आपण एक असे प्राणी संग्रहालया विषयी माहिती पाहणार आहोत ज्या प्राणी प्राणिसंग्रहालयात आपण जंगली प्राण्यांना खूप जवळून पाहू शकतो.

तर चला जाणून घेवूया कोणते आहे ते प्राणी प्राणि संग्रहालय.

चीनमध्ये जगातील सर्वात खतरनाक प्राणिसंग्रहालय – Lehe Ledu Wildlife Zoo

Lehe Ledu Wildlife Zoo
Lehe Ledu Wildlife Zoo

आपणही बऱ्याच प्राणी संग्रहालयाला भेट दिली असणार ज्या मध्ये आपल्याला प्राणी पिंजऱ्यात पाहायला मिळाले असणार आणि आपण बाहेर उभे राहून त्या प्राण्यांना पाहिले असेल, पण कधी प्राण्यांना मोकळे सोडलेले आणि माणसे पिंजऱ्यात राहून त्या प्राण्यांना पाहत आहेत, असे कधी निदर्शनात आले आहे का?

नाही ना! पण चीन च्या एका प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला असे निदर्शनात येऊन जाईल इथे प्राणी मोकळे असतात आणि माणसे पिंजऱ्यात असतात.

चीनच्या चोंगकिंग या शहरात एक प्राणिसंग्रहालय आहे ज्यामध्ये आपल्याला एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो येथे तुम्ही प्राणिसंग्रहालयाच्या प्राण्यांना आपण आपल्या हातांनी खाऊ घालू शकतो.

या प्राणिसंग्रहालयाचे नाव लेहे लेदु वाइल्डलाइफ झू (Lehe Ledu Wildlife Zoo) असे आहे, येथे माणसांना एका पिंजऱ्यात बंद करून प्राणिसंग्रहालयाचा एक चक्कर मारून आणले जाते, या मध्ये लोक प्राण्यांना खायला मांस सोबत घेऊन जातात आणि त्या मासाच्या तुकड्यांना पिंजऱ्यातून बाहेर टाकतात,

मासाच्या तुकड्यांना पाहून बाकीचे प्राणी त्या पिंजऱ्या जवळ येतात आणि मांस खातात. कधी कधी तर काही प्राणी पिंजऱ्याच्या वरती पण चढतात, पण तो पिंजरा बंद केलेला असतो आणि मजबूत पिंजऱ्या मुळे त्या लोकांना कोणत्याही प्रकारे ते प्राणी इजा पोहोचवू शकत नाहीत.

अश्या प्रकारच्या या पहिल्या झु ची सुरुवात २०१५ मध्ये झालेली आहे. या झु मध्ये प्रवेश करण्याच्या आधीच येथे भेट देणाऱ्या लोकांना शिस्तीत राहायला सांगतात. आणि तेथील नियम सांगितल्या नंतर त्यांना आतमध्ये सोडतात. जर अचानक कोणाला काही त्रास किंवा अडचण झालीच तर ५-१० मिनिटात त्याच्या जवळ मदत पोहचते. कारण त्या पिंजऱ्यामध्ये कॅमेरे लागलेले असतात.

या झु च्या मालकाचे असे म्हणणे आहे कि आम्हाला लोकांना असा अनुभव द्यायचा आहे कि जेव्हा लोकांच्या अंगावर एखादा प्राणी हल्ला करतो, तेव्हा त्यांची फिलिंग काय असते. आणि त्यांना कसे वाटते.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top