अशी झाली लुडो किंग गेम ची सुरुवात. जाणून घ्या या लेखाद्वारे

Ludo King Game

लॉकडाउन मध्ये कंटाळा येत असेल ना आणि कंटाळा आला तर मित्रांसोबत ऑनलाईन बरेच गेम खेळत असाल आणि त्या गेम्स पैकी सर्वात जास्त खेळल्या जाणारा गेम्स तो म्हणजे लुडो किंग. आपण लॉक डाऊन मध्ये एकवेळ तरी लुडो किंग खेळून पाहिले असेलच, आपल्याला माहीत आहे का लुडो किंग गेम ची सुरुवात कोणी केली होती? कोणी या गेम ला बनवले होते? बनविणारे भारतीय होते की विदेशी ? तर आजच्या या स्टार्टअप स्टोरी मध्ये आपण पाहणार आहोत लुडो किंग गेम प्रसिध्द कशा प्रकारे झाला, त्याला कोणी बनविले वगैरे वगैरे.. आशा करतो आपल्याला आवडणार. तर चला पाहूया..

 २०१६ ला झाली होती सुरुवात आणि आता लुडो किंग बनलाय नंबर एक चा गेम – India’s Famous Ludo Game Information History in Marathi

Ludo Game Information in Marathi
Ludo Game Information in Marathi

लूडो गेम चा इतिहास – History of Ludo in Marathi

भारताच्या बिहार राज्यात लुडो किंग ला जन्म देणाऱ्या विकास जयस्वाल यांचा जन्म झाला. विकास दोन वर्षाचे असताना च त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले. आणि त्यांचे घर हे त्या काळी वडिलांच्या पेन्शन वर चालत होते. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सांगितले की लहानपणी मला कोणी असे विचारले नाही की मला मोठेपणी काय बनायचं आहे? पण मला माहिती होत मला मोठेपणी श्रीमंत बनायचं आहे.

साधारण परिवारात जन्म झालेल्या विकास ने भविष्यात कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न आपल्या उरी बाळगलं, कारण तेव्हाच्या काळात एक कॉम्प्युटर इंजिनिअर चांगली कमाई करत होते. १९७१ मध्ये जेव्हा विकास लहान होते तेव्हा त्यांना कॉम्प्युटर वर गेम खेळण्यात आनंद येत होता.

१९९१ मध्ये जेव्हा तेथील सरकार ने व्हिडीओ गेम ला खेळण्यावर बंदी आणली होती तेव्हा विकास फक्त १७ वर्षाचे होते. आणि त्यांचे फक्त एकच स्वप्न होते की त्यांचा स्वतःचा एक व्हिडिओ गेम असावा आणि ते दिवसभर त्याला खेळत रहावे.

त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याचे ठरवले होते. त्यांनी इंजिनिअर कॉलेज ला प्रवेश सुध्दा घेतला, पण तेव्हा त्यांच्या कडे पुस्तके मिळवण्यासाठी कष्ट करावे लागले, त्यांनी हँडमेड ग्रिटींग कार्ड विकून आपल्या पुस्तकांसाठी पैसे एकत्र केले आणि त्यांनी १९९९ मध्ये उत्तर प्रदेश च्या बुलंदशहर मधील एका इंजिनिअर कॉलेज मधून आपली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केली.

त्यांना स्वतःचे कॉम्प्युटर घ्यायचे होते तेव्हा त्यांनी कॉम्प्युटर साठी आपल्या घरच्यांना कॉम्प्युटर ची मागणी केली. तेव्हा त्यांच्या आई आणि भावाने त्यांना कॉम्प्युटर घेऊन दिले, पण ते सांगतात की मी घेतलेल्या कॉम्प्युटर चा कधीही गैरवापर केला नाही. मी फक्त त्यावर कामच केले. पण माझ्या हॉस्टेल वरील मित्रांनी त्यावर गेम्स खेळत असत. त्यांनी तेव्हा एक छोटासा गेम सुध्दा बनविला होता त्याचे नाव होते एग्गी बॉय.

त्यांनंतर त्यांना माहिती होते की आपण गेमिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारे आपले भविष्य निर्माण करू शकते. इंजिनिरिंग च्या शेवटच्या वर्षाला असतांना त्यांनी कॅफेवर जाऊन १०० रुपये भरून भारतातील वेगवेगळ्या कंपन्यांना आपले सिव्ही पाठविले.

त्यानंतर त्यांना २००४ मध्ये इंडियागेम्स या कंपनीतून बोलावणे आले. इंडियागेम्स ही मुंबई ला स्थित असणारी एक गेमिंग ची कंपनी होती. विशाल गोंड हे ह्या कंपनीचे निर्माते होते. विकास यांचे म्हणणे आहे की त्यांनी या कंपनीत चार वर्ष नोकरी केली ते म्हणतात की त्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण देणारा हा अनुभव होता काही दिवसानंतर ही कंपनी डिसनी ला विकण्यात आली होती. ते म्हणतात की त्यांनी नोकरी यासाठी सोडली होती कारण त्यांना एक उद्योजक बनायचे होते.

विकास गेमिंग कंटेंट सुरुवाती पासून बनवत होते. त्यांना जेव्हा ब्लॉग्स च्या माध्यमातून त्यांच्या पेमेंट इतकी रक्कम त्यांना मिळायला लागली. तेव्हाच त्यांनी आपली नोकरी सोडली होती. पुढे ते सांगतात त्यांनी २०१० ला २ लाख रुपयांचा निवेश करत गेमेटियन ची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मुबई येथे एक छोटस ऑफिस सुरू केले. ज्यामध्ये त्यांची दोन जणांची टीम सुध्दा सहभागी होते.

लुडो किंग ला बनविण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीम ला सोबत घेऊन हा गेम बनविण्यासाठी मेहनत घेतली पण तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही त्यांच्या जीवनात लुडो खेळलेलं नव्हतं. पण विकास यांनी स्केच बनवून त्याचे निर्माण केले. त्यांनी यावर बोलताना सांगितले की लुडो देशात वेगवेगळ्या ठिकाणी खेळल्या जातो आणि प्रत्येक ठिकाणी या खेळाचे नियम हे वेगवेगळे आहेत म्हणून त्यांनी या खेळाला सोप्या पद्धतीने बनविले.

जेव्हा २०१६ ला हा गेम लॉन्च केला होता तेव्हापासून हा गेम टॉप गेम्सपैकी नेहमी एकला राहिला आहे. आणि हा पहिला भारतीय खेळ आहे जो जगात सर्वात जास्त प्रमाणात खेळल्या जातो. त्यांनी या खेळाला स्वतः निर्मित केले असणार पण ते या सर्व गोष्टींचे श्रेय आपल्या ७० जणांच्या टीम ला देतात.

या गेम ची लोकप्रियता एवढी वाढली की सुरुवातीला सरासरी २० ते ३० लाख दिवसाला या गेम ला डाऊनलोड करत आणि त्याला खेळत असत पण लॉक डाऊन च्या काळात हाच आकडा कोटींमध्ये जाऊन पोहचला आहे. ज्यामुळे विकास यांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा झाला आहे.

या स्टार्टअप स्टोरी वरून आपल्याला लक्षात येते की आपण गरीब परिवारातून असलो तरी सुध्दा एक स्वप्न पाहून आपण त्या स्वप्नाला पूर्ण करू शकतो, फक्त आणि फक्त त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि चिकाटी आवश्यक असते. कोणतीही गोष्ट अशक्य नसते, आणि प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर कोणतेच ध्येय कठीण नसते.

तर आजच्या लेखात आपण लुडो किंग गेम चा स्टार्टअप कसा झाला ते पाहिले, आशा करतो आपल्याला लिहिलेली ही स्टार्टअप स्टोरी आवडली असणार आपल्याला ही स्टार्टअप स्टोरी आवडल्यास या स्टोरी ला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here