” महाराणा प्रताप” अतुलनीय साहस व पराक्रमाचा शूर स्वाभिमानी राजा

Maharana Pratap Information in Marathi

भारताच्या इतिहासातील महान याशोगाथा ह्या अकल्पनीय घटनांच्या सोबतच शौर्यवान महापराक्रमी वीर योद्ध्यांच्या बलिदान व मातृभूमी बद्दलचे प्रेम याची साक्ष क्षणोक्षणी देतात. मध्ययुगीन भारताचा इतिहास कालखंड भारतात परकीय आक्रमणाबरोबरच सांस्कृतिक,राजकीय,आर्थिक व कलेच्या दृष्टीने अमुलाग्र बदल घडविणारा होता.

जिथे एकीकडे भारतात मुघल हे परकीय असूनसुध्दा राजकीय दृष्ट्या घट्ट पाय रोवून शासन करीत होते तिथे अफगाणी,तुर्की व मध्य अरबस्थान प्रांतातून लुटीच्या हेतूने भारतात क्रूर सैन्य टोळ आक्रमण हे सततचेच होवून गेले होते.

तत्कालीन भारतात हिंदू शासन कर्त्या मध्ये राजपूत,मराठा इत्यादी घराणे नेटाने परकीय आक्रमणाबरोबर लढत होते, राजस्थानातील उदयपुर येथील राजपूत घराण्यातील अश्याच एका वीर साहसी योद्ध्याची यशोगाथा आज आपण बघणार आहोत, ज्यांची मातृभूमीप्रती निष्ठा, साहस, अद्भुत शौर्य व अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची झुंजार वृत्ती ह्याला नमन केल्याशिवाय राहवत नाही.

एक असा राजा ज्याला अकबर या मुघल शासकानेसुध्दा मुक्त मनाने स्तुती सुमने वाहिली असे महान व्यक्तीमत्व म्हणजेच मेवाडचे संरक्षक व राजा महाराणा प्रताप होय.

“महाराणा प्रताप” अतुलनीय साहस व पराक्रमाचा शूर स्वाभिमानी राजा – Maharana Pratap Information in Marathi

Maharana Pratap Information in Marathi
Maharana Pratap Information in Marathi

शूरवीर योद्धा महाराणा प्रताप यांचा इतिहास – Maharana Pratap History in Marathi

महाराणा प्रतापांचा योद्धा म्हणून विचार केल्यास त्यांच्यातील काही बाबी त्यांचा परिचय देण्यास समर्थ होतात उदाहरणा दाखल बघायचे झाल्यास, युद्धा दरम्यान महाराणा प्रताप २०८ किलो वजनाचे लढाई साहित्य स्वत: जवळ बाळगायचे यामध्ये त्यांचा भाला ८१ किलो वजनाचा असायचा तसेच ते शरीरावर लोखंडी कवच धारण करायचे याव्यतिरिक्त त्यांच्या जवळ ७२ किलो वजनाची २ लोखंडी तलवार व एक मजबूत ढाल इत्यादी युध्द साहित्य राहायचे.

  • Maharana Pratap Bhala Weight : 81KG
  • Maharana Pratap Talwar Weight : 72KG

यावरून तुम्हाला महाराणा प्रतापांच्या मजबूत देहयष्टी ची कल्पना नक्कीच येईल.हळदीघाटीची लढाई हे महाराणा प्रतापांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे व निर्णायक युध्द होते ज्याने आजवरच्या इतिहासात त्यांना अजराअमर केले.

महाराणा प्रतापांचा जीवन परिचय – Maharana Pratap Biography

महाराणा प्रतापांचा जन्म ९ मे ईसवी सन १५४० ला राजस्थानातील कुंभलगढ या ठिकाणी उदयपुरचे तत्कालीन राजा उदय सिंह व राणी जयवंता बाई ह्यांच्या ज्येष्ठ पुत्र रूपाने झाला होता.लहानपणापासूनच महाराणा प्रताप हे हट्टी व एकांत प्रिय स्वभावाचे होते. त्यांच्यातील दृढ निश्चयीपणा व कुशाग्र बुद्धी ते नक्कीच भविष्यात काहीतरी मोठे यश साध्य करणार ह्याचा अंदाज वर्तवित असे.ह्यामुळेच काय तर त्यांनी कधीच मुघल शासनाच्या अधीन राहून आपले शासन करणे पसंत केले नाही व आजीवन ते स्वाभिमानी वृत्तीने स्वशासन सांभाळीत राहिले. महाराणा प्रताप ह्यांना २२ अपत्ये होती ज्यामध्ये १७ पुत्र रत्न तर ५ कन्यारत्न होती. महाराणांची पहिली पत्नी अजबदे पुनवर ही होती ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत राजांना साथ दिली व त्यांचे मनोबल वाढविले.

महाराणा प्रताप यांचा स्वामीभक्त चेतक अश्व – Maharana Pratap Horse

चेतक (Chetak) हा घोडा महाराणा प्रताप यांचा अत्यंत प्राणप्रिय सेवक होता. चेतक हा अत्यंत मजबूत व निर्भीड असा घोडा होता, जो युद्धजन्य परिस्थितीत अनेकदा आपल्या स्वामीला संकटातून बाहेर काढायचा, हळदी घाटीच्या लढाईत महाराणा प्रताप व चेतक दोघेही गंभीर रित्या जखमी झाले असतांना सुध्दा चेतकने आपल्या स्वामींच्या प्राणाचे रक्षण करण्याकरिता त्यांना युध्द भूमीतून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात मोलाचे कार्य केले. ह्यावेळी मार्गात जवळपास २६ फुट खोल इतका खड्डा असतांना सुध्दा चेतक ने आपल्या स्वामीच्या प्राण रक्षणा करिता तो खड्डा पार केला व महाराणा प्रताप ह्यांना सुरक्षित जागी पोहचविले होते. ह्या घटनेत चेतक ला वीर मरण आले परंतु त्याने अखेर च्या श्वासापर्यंत स्वामी सेवा चोख बजावली.

महाराणा प्रताप व हळदी घाटीची लढाई – Haldighati War

महाराणा प्रताप यांना शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांचे शासनाअधीन राहणे पसंत न्हवते. मेवाडचे शासन प्रताप ह्यांना मिळाल्याने त्यांचे सावत्र बंधू चिडून उठले होते व त्यांचा महाराणा प्रतापांना आंतरिक विरोध व्हायचा. राजपूत परिवारातील ह्या अंतर कलह व आपसातील विरोधी भावनेचा फायदा घेण्याची अकबराला नामी संधी मिळाली होती व तेच त्याने केले.

चित्तोड येथील किल्ल्यावर मुघलांचे शासन प्रस्थापित झाले, राज्य व प्रजेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराणा प्रताप व त्यांचे वडिल किल्ल्यातून बाहेर आले व त्यांनी पुढील काही वर्षे राज्याला समृध्द व सुरक्षित करण्यावर भर दिला. ह्या दरम्यान अनेकदा अकबराने महाराणा प्रताप ह्यांच्या कडे दूत पाठवून मेवाड राज्य त्याच्या अधीन करण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु स्वाभिमानी राजाने ते कदापि मान्य केले नाही. ह्या मुळे अकबर पुरता चिडून उठला व ह्याचा परिणाम असा झाला की १८ जून १५७६ साली अकबर व महाराणा प्रताप आमने सामने हळदी घाटी ह्या युद्धभूमीवर आले. जिथे एकीकडे मुघलांचे ८०००० ईतके प्रचंड सैन्य होते तर महाराणा प्रताप ह्यांच्या कडे नेमके २०००० इतके सैन्य होते.

अत्यंत प्राणपणाने शर्थीची कडवी झुंज महाराणा प्रताप यांनी अकबराला दिली यामध्ये राजपुतांचे कमी सैन्य असून सुध्दा मुघलांचे अतोनात नुकसान झाले. युध्द भूमीवर महाराणा प्रताप यांचे असीम शौर्य,मातृभूमी साठीचा लढाऊ बाणा व वीर रसाने ओतप्रोत कडवा प्रहार ह्याने अक्षरशः अकबर थक्क व आश्चर्यचकित होऊन गेला होता.

महाराणा प्रताप यांचा मृत्यू – Maharana Pratap Death

युद्धामध्ये महाराणा प्रताप जखमी झाल्याने त्यांना युद्धातून सुरक्षित जागी हलविण्याचा त्यांच्या सैन्यदळातर्फे निर्णय झाला व चेतक ह्या प्रतापांच्या स्वामीभक्त अश्वाने त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. हळदी घाटीची लढाई ही अनिर्णीत रुपात समाप्त झालेली लढाई अशी इतिहासात नोंद आहे. परंतु महाराणा प्रतापांचे शौर्य सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले व इतिहासात राजांची ” अतुलनीय साहसी व परम स्वाभिमानी वीर राजा” अशी ओळख निर्माण करून गेली.

अश्या वीर योद्ध्याचा राजस्थानातील चवण येथे २९ जानेवारी १५९७ साली मृत्यू झाला.

भारतीय इतिहासात महाराणा प्रताप यांच्यासारख्या क्वचितच योद्ध्यांनी जन्म घेतला आहे ,ज्यांनी अंतिम श्वासापर्यंत मातृभूमी, स्वराज्य व आपली प्रजा यांच्या कल्याणाकरिता अखंड लढा दिला व विपरीत परिस्थितीत सुध्दा पराधीनता स्वीकारली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top