भगवान महावीरांची आरती

Mahavir Swami Aarti

जैन धर्मात होवून गेलेल्या एकूण चोवीस तीर्थकारांपैकी भगवान महावीर यांना चोविसावे तीर्थकर मानलं जाते. भगवान महावीर यांच्याबाबत असे सांगण्यात येते की, त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान करून, पूर्व वैदिक काळात होवून गेलेल्या महान तीर्थकरांनी दिलेल्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा जगभर प्रसार केला.

भगवान महावीर यांच्याबाबत जैन धर्मांतील अनुयायांची अशी मान्यता आहे की,भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नसले तरी, त्यांनी जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे महान काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे जगातील प्रमुख धर्म संस्थापकाच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते.

आपण आजच्या या लेखात जैन धर्मातील चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांच्या आरतीचे लिखाण करणार आहोत. यामागील आमच्या उद्देश एकच आहे कि भगवान महावीर यांचे पूजन करते वेळी सगळ्यांना आरती सहजरीत्या उपलब्ध व्हावी.

भगवान महावीरांची आरती – Bhagwan Mahavir Aarti

Mahavir Aarti
Mahavir Aarti

जय महावीर प्रभो, स्वामी जय महावीर प्रभो।

कुंडलपुर अवतारी, त्रिशलानंद विभो॥ ॥ ॐ जय…..॥

सिद्धारथ घर जन्मे, वैभव था भारी, स्वामी वैभव था भारी।

बाल ब्रह्मचारी व्रत पाल्यौ तपधारी ॥ ॐ जय…..॥ 

आतम ज्ञान विरागी, सम दृष्टि धारी।

माया मोह विनाशक, ज्ञान ज्योति जारी ॥ ॐ जय…..॥ 

जग में पाठ अहिंसा, आपहि विस्तार्यो।

हिंसा पाप मिटाकर, सुधर्म परिचार्यो ॥ ॐ जय…..॥

इह विधि चांदनपुर में अतिशय दरशायौ।

ग्वाल मनोरथ पूर्‌यो दूध गाय पायौ ॥ ॐ जय…..॥ 

प्राणदान मन्त्री को तुमने प्रभु दीना।

मन्दिर तीन शिखर का, निर्मित है कीना ॥ ॐ जय…..॥ 

जयपुर नृप भी तेरे, अतिशय के सेवी।

एक ग्राम तिन दीनों, सेवा हित यह भी ॥ ॐ जय…..॥

जो कोई तेरे दर पर, इच्छा कर आवै।

होय मनोरथ पूरण, संकट मिट जावै ॥ ॐ जय…..॥

निशि दिन प्रभु मन्दिर में, जगमग ज्योति जरै।

हरि प्रसाद चरणों में, आनन्द मोद भरै ॥ ॐ जय…..॥

जैन धर्माचे चोविसावे तीर्थकार असणारे भगवान महावीर हे अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. जैन धर्माचे तीर्थकर असणाऱ्या भगवान महावीर यांच्या जन्माबाबत जैन ग्रंथांमध्ये माहिती देण्यात आली आहे.

भगवान महावीर यांच्याबद्दल थोडस – Mahavir Swami Story

त्यानुसार भगवान महावीर यांचा जन्म सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी सहाव्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे इ.स.पु. ५९९ साली वैशाली राज्याच्या कुंडलपूर याठिकाणी राज घराण्यात झाला होता. पूर्वी वैशाली म्हणून ओळखण्यात येत असलेले राज्य आताच्या बिहार राज्यात स्थित आहे.

भगवान महावीर यांचे वडिल सिद्धार्थ हे कुंडलपूर राज्याचे राजा होते तर आई त्रीशुलामाता या त्या राज्याच्या महाराणी होत्या. त्यामुळे भगवान महावीर यांचा जन्म क्षत्रिय कुटुंबात झाला होता. असे असले तरी भगवान महावीरांचे आपल्या राज दरबारात मन लागत नव्हते. परिणामी त्यांनी राज वैभवाचा त्याग करून आध्यात्मिक जागृतीचा प्रसार आणि आत्मकल्याण करण्यासाठी त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली.

भगवान महावीर हे जैन धर्माचे तेविसावे तीर्थकर भगवान पार्श्वनाथ याचे अनुयायी बनले. भगवान महावीर २८ वर्षांचे असतांना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले होते. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर ते बहुतांश वेळ ध्यानातच राहत असतं.

कालांतराने त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. भगवान महावीरांनी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सुमारे बारा वर्षे मौन पाळले होते. एखाद्या हटयोगी साधूप्रमाणे त्यांनी आपल्या शरीराला आतोनात त्रास दिला त्यानंतर, कोठे त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं. भगवान महावीरांनी आपल्या तपाच्या बळावर काम, क्रोध, लोभ, मोह माया, वासना यासारख्या मानसिक शक्तीवर विजय प्राप्त केला.

आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान महावीर तीस वर्ष जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत राहिले. आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. भगवान महावीरांनी आपल्या उपदेशांच्या माध्यमातून आपल्या अनुयायांना इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा मोलाचा उपदेश देत राहिले.

जैन धर्माचा प्रचार करतांना ते लोकांना सांगत की, इंद्रिय व वासनांचे सुख दुसऱ्याला दु:ख देऊनच मिळवता येते. त्यांच्या याच विचारधारेमुळे त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, आणि अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचा सुद्धा समावेश केला. यावरून असं म्हणता येईल की, भगवान महावीर यांच्या प्रवचनाचा सार म्हणजे काय तर, त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील आणि सदाचार होय.

मित्रांनो, लोकांच्या मनात त्याग, प्रेम, संयम, प्रेम, करुणा, शील आणि सदाचाराची बीज रोवणारे महान जैन धर्मीय तीर्थकर भगवान महावीर यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी इ.स.पू. ५२७ साली बिहार येथील पावापुरी या ठिकाणी निर्वाण केले.

भगवान महावीर यांनी ज्या दिवशी निर्वाण केले तो दिवस म्हणजे कार्तिक कृष्ण अमावस्येचा या दिवशी जैन धर्मीय बांधव आपल्या घरी भगवान महावीर यांचा निर्वाण दिन म्हणून दिवे लावतात.

मित्रांनो, या लेखातील माहिती आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून खास आपल्याकरिता या लेखाचे लिखाण केलं आहे. या लेखात लिखाण करण्यात आलेली भगवान महावीर आरतीला विशेष महत्व असून आपण नियमित तिचे पठन करायला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here