भगवान महावीरांची महान जीवन गाथा

Mahavir Swami Life Story 

जैनांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीरांनी उभे आयुष्य संपूर्ण मानव जातीला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून जाण्याचा मार्ग दाखविला. आपापसात एकजुटीने रहाण्यास शिकविले, पशुहत्येचा, जातीपातीच्या भेदभावाचा कडाडून विरोध केला. भगवान महावीरांनी मानवतेच्या कल्याणासाठी ऐहिक वैभवाचा…समस्त सुख-सोयींचा त्याग करून तप-त्यागाचा मार्ग अवलंबिला होता.

भगवान महावीरांचे अवघे जीवनच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. राजमहालात राहणाऱ्या महावीरांनी सगळ्या राजसुखाचा त्याग करून सत्याचा शोध घेतला आणि परम ज्ञानाची प्राप्ती करून घेतली त्याची जेवढी स्तुती गावी तितकी कमी आहे…या लेखातून भगवान महावीरांच्या जीवनाशी निगडीत महत्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलाय.

 भगवान महावीरांची महान जीवन गाथा – Bhagwan Mahavir Swami Information in Marathi

Bhagwan Mahavir Swami Information in Marathi

महावीरांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Mahavir Swami Biography in Marathi

ई.स. 599 पूर्वी वैशाली राज्यात, क्षत्रियकुंड नगरीत, इक्ष्वाकू वंशाचे राजा सिद्धार्थ आणि त्रिशला राणीच्या पोटी चैत्र महिन्यातील त्रयोदशीला भगवान महावीरांचा सामान्य बालकाच्या रुपात जन्म झाला. स्वामी महावीर हे बालवयापासून अत्यंत तेजस्वी आणि कुशाग्र बुद्धीचे बालक होते. कठीण तपोबलाच्या सहाय्याने त्यांनी आपल्या जीवनाला महान बनविले.

भगवान महावीरांना सन्मती, महावीर श्रमण, वर्धमान या नावांनी देखील ओळखलं जातं. त्यांच्या या वेगवेगळ्या नावांमागे देखील काही कथा जोडल्या गेल्या आहेत. असं म्हणतात कि त्यांच्या जन्मानंतर राज्यात खूप सुख-संपन्नता आणि वृद्धी झाली, त्यामुळे त्याचं नाव वर्धमान ठेवण्यात आलं.बालपणापासून त्यांच्यातील साहस, तेज, बल यामुळे त्यांना महावीर असं म्हंटल्या गेलं. आपल्या सगळ्या इच्छा आणि इंद्रियांवर त्यांनी विजय प्राप्त केल्यानं त्यांना “जितेंद्र” म्हंटल्या गेलं.

महावीर स्वामींचा विवाह –  Lord Mahavir Marriage

राजपुत्र म्हणून जन्माला आलेल्या महावीरांना संसारिक सुखाविषयी विशेष आसक्ती कधीच नव्हती, परंतु आई-वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी वसंतपूर येथील महासामंत समरवीरांची कन्या यशोदाशी विवाह केला. लग्नानंतर त्यांना प्रियदर्शनी नावाची एक कन्या देखील झाली.

भगवान महावीरांचे संन्यासी जीवन –  Bhagwan Mahavir Story in Marathi

भगवान महावीरांना सुरुवातीपासून संसारिक सुखाची आसक्ती नव्हती, आई-वडिलांच्या मृत्युपश्चात त्यांना संन्यासी जीवनाची ओढ लागली होती परंतु भावाच्या विनंतीला मान देत ते काही दिवस थांबले.पुढे वयाच्या 30 व्या वर्षी महावीरांनी सर्व संसारीक मोह-मायेचा त्याग करून घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि वैराग्य स्वीकारले.

घनदाट अरण्यात त्यांनी सलग 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांची ख्याती चोहोदिशांना होऊ लागली. त्यांच्या महान उपदेशांमुळे आणि त्यांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन मोठ-मोठे राजा-महाराजा त्यांचे अनुयायी झाले. आपल्या उपदेशांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना प्राणीमात्रांवर दया, आपापसातील बंधुभाव, सत्य-अहिंसेचा मार्ग स्वीकारण्यास प्रेरित केलं.

भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्यातील विशेष –  Mahavir And Buddha

 • भगवान महावीर आणि गौतम बुद्ध हे दोघेही सुख-संपन्न परिवारात राजघराण्यात जन्माला आले होते. अनेक प्रकारची सुखं पायाशी लोळण घेत असतांना देखील दोघानाही त्याचा कधी मोह झाला नाही उलट त्यांनी सत्याच्या शोधासाठी आपल्या ऐशो-आरामी जीवनाचा त्याग केला व घनदाट जंगलात कठोर तप केलं आणि लोकांना समान उपदेश केला.
 • याशिवाय भगवान महावीर आणि गौतमबुद्ध यांच्यातील आणखीन एक साम्य असे की दोघांची विचारधारा देखील अहिंसेवर आधारीत होती.
 • भगवान महावीरांची दर्शन स्यादवाद, अनेकांतवाद, त्रिरत्न, पंच महाव्रत ही तत्व असून गौतम बुद्धांची मुख्य तत्व अष्टांगिक मार्ग, प्रतीत्यसमुत्पाद, बुद्ध कथा, अनात्मवाद, आव्याकृत प्रश्नांवर बुद्धांचे मौन आणि निर्वाण आहे.
 • बौद्ध आणि जैन धर्मात आपल्याला बऱ्याच समानता पाहायला मिळतात. दोन्ही धर्मात सत्य, अपरिग्रह, अस्तेय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, ब्रम्हचर्य, अहिंसा, सम्यक चरित्र, अनिश्वरवाद, तप आणि ध्यान विद्यमान आहेत. दोन्ही धर्म मानवाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा संदेश देतात.
 • भगवान महावीर आणि गौतम बुद्धांमध्ये साल वृक्ष, तप, अहिंसा, आय समानता आढळतात. शिवाय दोघांची कर्मभूमी ही बिहार आहे.

भगवान महावीरांची शिकवण –  Teachings Of Mahavir

 • जैनांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीरांनी आपल्या शिकवणुकीतून आणि उपदेशाच्या सहाय्याने लोकांना जीवन जगण्याची कला शिकवली आणि सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला.
 • भगवान महावीरांची शिकवणच जैन धर्माची मुख्य पंचशील सिद्धांत बनले. या सिद्धांतात सत्य, अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा आणि ब्रम्हचर्य आहेत.
 • पशुहत्या आणि हिंदू समाजात पसरलेल्या जाती व्यवस्थेचा विरोध करणारे भगवान महावीर यांच्या सिद्धांताना आणि शिकवणुकीला स्वीकारून कोणताही मनुष्य सच्चा जैन अनुयायी होऊ शकतो.

महावीर जयंती – Mahavir Jayanti Information

 • जैन धर्माचे प्रमुख तीर्थंकर भगवान महावीरांची जयंती हिंदू धर्माच्या तिथीप्रमाणे चैत्र महिन्यातील शुक्लपक्षात त्रयोदशीला साजरी केली जाते
 • ई.स. 599 पूर्वी चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी बिहार राज्यातील वैशाली इथं कुंडलपूर गावी भगवान महावीरांचा जन्म झाला होता.
 • म्हणून त्यांच्या जन्मदिवसाला जैनधर्मीय लोक महावीर जयंती आणि जैन महापर्व म्हणून साजरा करतात
 • महावीर जयंतीच्या दिवशी जैन मंदिरांमध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात येते, शिवाय जैन समुदाय या दिवशी भव्य शोभायात्रेचे आयोजन देखील करत असतं
 • महावीर जयंतीच्या पावन पर्वावर जैन धर्मीय लोक भगवान महावीरांनी दिलेल्या शिकवणुकीवर चालण्याचा प्रण करतात आणि त्यांच्या उपदेशाचे स्मरण करतात.
 • भगवान महावीर जयंतीच्या दिवशी भारत सरकार तर्फे आधिकारिक सुट्टीची घोषणा करण्यात आलेली आहे.
 • या दिवशी सगळ्या शाळा, कॉलेज, ऑफिस, कोर्ट, बँक, सहीत सगळी शासकीय कार्यालये बंद असतात.

भगवान महावीरांचे मुख्य कार्य – Mahavir Swami Main Work

अहिंसेवर महावीरांचा सर्वोच्च अधिकार असल्याने त्यांच्याप्रती सगळ्यांना अपार आदर आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडलेला नाही, त्यांच्या या शिकवणुकीचा महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या महान व्यक्तींवर मोठा प्रभाव होता.

भगवान महावीरांच्या काळात सभोवतालचे वातावरण अत्यंत अशांत होते…

सर्वदूर ब्राम्हणांचे वर्चस्व असल्याने ते अन्य जातींच्या तुलनेत स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असत, आपल्या धार्मिक होम-यज्ञात टे प्राण्यांचा बळी देत असत. त्यांच्या या कृत्यांचा क्षत्रिय देखील विरोध करत असत.

भगवान महावीरांनी अहिंसेचे समर्थन करून मुक्या जीवांचा बळी देण्याच्या प्रथेचा कडाडून विरोध केला.

भगवान महावीरांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून आपली शिकवण लोकांपर्यंत पोहोचविली. त्यांचे तत्वज्ञान आठ विश्वासांवर आणि पाच नैतिक तत्वांवर आधारीत आहे.

“अहिंसा” म्हणजे हिंसा न करणे, “

सत्य” म्हणजे नेहमी खरे बोलणे,

“अस्तेय” चोरी न करणे,

“ब्रम्हचर्य” म्हणजे शुद्ध आचरण आणि

“अपरिग्रह” म्हणजे संपत्ती जमा न करणे.

भगवान महावीरांचे निर्वाण –  Mahavir Nirvan

 • समस्त मानवजातीला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा उपदेश करणारे भगवान महावीर यांनी ई.स. 527 पूर्व कार्तिक महिन्यातील अमावस्येला बिहार मधील पावापुरी येथे आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला आणि त्यांचे निर्वाण झाले.
 • या स्थळाला जैन धर्मीय त्यांच्या प्रमुख स्थळांपैकी एक मानतात…त्यांच्या निर्वाणदिनी जैन समुदाय दिवे लावतात.
 • भगवान महावीरांच्या निर्वाणा नंतर जवळ-जवळ 200 वर्षांनंतर जैन धर्म दिगंबर आणि श्वेतांबर अश्या दोन वेगवेगळ्या संप्रदायात विभागला गेला.
 • दिगंबर संप्रदायाचे जैन संत आपल्या वस्त्रांचा त्याग करतात आणि श्वेतांबर संप्रदाय पांढरे वस्त्र धारण करतात.

भगवान महावीरांचे अनमोल विचार –  Mahavir Quotes

भगवान महावीरांनी आपल्या शिकवणुकीतून आणि आपल्या उपदेशानंमधून लोकांना जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला आहे.

महावीरांचे काही प्रेरणादायक आणि अनमोल विचार असे आहेत…

 • मनुष्याला “जगा आणि जगु द्या” या संदेशावर कायम रहायला हवे कुणालाही दुखं पोहोचवू नये, प्रत्येकाचे जीवन त्याच्यासाठी अनमोल आहे.
 • “स्वतःवर विजय प्राप्त करणे हे लाखो शत्रूंवर विजय प्राप्त करण्यापेक्षा उत्तम आहे”.
 • “प्रत्येकाप्रती दयेचा भाव ठेवा, राग आणि घृणेने सर्वनाश होतो”.
 • “आत्मा अजर-अमर आहे ती एकटीच येते आणि एकटीच जाते, तिला कुणीही सोबत करत नाही आणि कुणी मित्र देखील बनत नाही”.
 • “क्रोध नेहमी अधिक क्रोधाला जन्म देतो, आणि क्षमा व प्रेम अधिक क्षमेला व प्रेमाला जन्म देते”.

जैन धर्माचे प्रमुख उत्सव –  Jain Festival

 • महावीर जयंती- Mahavir Jayanti
 • पर्युषण पर्व प्रारंभ दिवस- paryushan
 • वर्षीतय प्रारंभ दिवस – varshitay day
 • अक्षय तृतीया- Akshay Tritiya
 • भगवान पार्श्वनाथ जन्मदिवस- Bhagwan Parshvanath Jayanti
 • संवत्सरी महापर्व- Samvatsari Mahaparva

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top