एका माशीला मारणे पडले या व्यक्तीला महागात

Man Blows up House While Chasing Fly  

आपण आपल्या घरातील माश्या किंवा मच्छरांचा कशा प्रकारे नायनाट करता? प्रत्येकाच्या घरी यावर वेगवेगळे उपाय असतील कोणी त्यासाठी घरातील लादीला फिनाईल च्या पाण्याने पुसत असेल तर कोणी आणखी कशाने आणि मच्छरांसाठी काही लोक घरात इलेक्ट्रिक चे प्रोडक्ट वापरत असतील, तर काही वेगवेगळ्या अगरबत्या.

यामुळे आपल्या घरात येणाऱ्या मच्छरांच्या संख्येत कमतरता येतही असेल, पण एका चुकीमुळे आपल्या घराचे किती मोठे नुकसान होऊ शकते, या गोष्टीचा विचार आपण करायला हवा,

एका व्यक्तीने त्याच्या घरात केलेल्या एका चुकीमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे, आणि झालेल्या चुकिची खूप मोठ्या प्रमाणात भरपाई करावी लागली.

तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत कि एका व्यक्तीने घरातील माशीला मारायच्या नादात सगळे घर जाळून घेतले. तर चला पाहूया कशा प्रकारे हि घटना झाली, कुठे झाली आणि अशा घटनांपासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली जाते.

माशीला मारायच्या नादात जाळून घेतले स्वतःचे घर. पहा कसे झाले हे सर्व – Man Blows up House While Chasing Fly

Man Blows up House While Chasing Fly
Man Blows up House While Chasing Fly

फ्रांस च्या दोर्दोन शहरातील हि घटना आहे, येथे ८० वर्ष्याचा च्या एका वयोवृद्ध व्यक्तीला जेवण करत असताना एका माशीने त्रास दिला, आणि त्या माशीला मारण्यासाठी त्या व्यक्तीने मच्छरांना ज्या इलेक्ट्रोनिक रॅकेट ने मारतात त्याचा वापर केला.

पण रॅकेट ला जसे त्या व्यक्तीने सुरु केले, सुरु करताच त्याच्या घरात स्पोट झाला. कारण त्या व्यक्तीच्या घरात तेव्हा गॅस लिक झाला होता. आणि त्यामुळे त्याच्या किचन चे छत उडाले होते. आणि घराचा थोडसा भाग जळाला होता.

सोबतच त्या व्यक्तीच्या हाताला इजा सुद्धा झाली होती, फ्रान्सच्या काही लोकल न्यूज वाहिनीने जेव्हा या ठिकाणी जाऊन पाहिले तेव्हा त्या व्यक्तीच्या घराची बऱ्यापैकी दुर्दशा झालेली होती. तेथील लोकांचे म्हणणे होते कि,

हि वयोवृद्ध व्यक्ती खूप नशीबवान होती जी या स्पोटातून वाचली. त्या व्यक्तीला आता हॉस्पिटल मध्ये भर्ती केलेलं आहे.

या घटनेनंतर सगळीकडे असे वातावरण बनले, कि आपल्या घरातील गॅस ला काम झाल्या नंतर बंद करावे, कारण अशा घटनांना व्हायला वेळ लागत नाही.

बरेचदा आपल्या घरातील गॅस व इलेक्ट्रिक उपकरणे सुद्धा आपल्यासाठी घातक ठरू शकतात, म्हणून आपल्या घरातील या वस्तूंना काम झाल्यावर व्यवस्थित बंद करायला विसरू नये. आपण घेतलेली खबरदारी अश्या घटनांना वास्तवात उतरूच देत नाही,

म्हणतात ना Precaution Is Better Than Cure. तेही खरेच आहे. म्हणून आपली सुद्धा काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here