Sunday, September 24, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

विश्वातील सर्वश्रेष्ठ बॉक्सर मेरी कोम चा जिवन परिचय

Mary Kom Mahiti

मेरी कोम ही संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ मुष्टीयुध्द पटुंपैकी एक आहे. तिने प्राप्त केलेल्या यशाकडे पाहुन म्हणावेसे वाटते की

“केवळ स्वप्न पाहाणं महत्वाचं नसुन पाहिलेल्या स्वप्नांना पुर्ण करण्याकरता अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश मिळतचं फक्त प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी.”

आज मेरी कोम ने केवळ आपल्यातील प्रतिभेच्या आणि प्रयत्नांच्या बळावर अनेक मेडल्स् मिळविले, अनेक रेकाॅर्डस् कायम केलेत असं नव्हें तर अवघ्या विश्वासमोर भारताला गौरवान्वित केले आहे.

चला तर, कशी आहे मेरी कोम? मणिपुर येथे जन्मलेल्या आणि अनेकदा वल्र्ड बाॅक्सिंग चॅम्पीयनशिप किताब जिंकणाऱ्या मेरी कोम विषयी जाणुन घेऊया या लेखातुन.

विश्वातील सर्वश्रेष्ठ बॉक्सर मेरी कोम चा जिवन परिचय – Mary Kom Information in Marathi

Mary Kom

मेरी कोम यांच्या जीवनावर थोडक्यात एक दृश्टीक्षेप – Mary Kom Biography

पुर्ण नाव (Real Name):मांगते चुंगनेजंग मेरी कोम
जन्म (Birthday):1 मार्च 1983, कन्गथेई, जिल्हा चुराचांदपुर, मणिपुर
वडिल (Father Name):मांगते तोंपा कोम
आई (Mother Name):मांगते अक्हम कोम
पति (Husband Name):करूंग ओंखोलर कोम
कोच (Coach)
  • गोपाल देवांग,
  • रोंगमी जोसिया,
  • चाल्र्स अत्किनसन,
  • एम नरजीत सिंह
पुरस्कार (Awards)
  • पद्मश्री
  • अर्जुन पुरस्कार
  • राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
  • पद्म भूशण
  • आॅलंपिक खेळांत बाॅक्सींग मध्ये पदक प्राप्त करणारी पहिली भारतिय महिला
मेरी कोम यांच्यावरचा चित्रपट (Movie): मेरी कोम (2014)

मेरी कोम चा जन्म, बालपण आणि प्रारंभिक जीवन – Mary Kom History

जागतिक किर्तीची बाॅक्सिंग चॅंपियन चा जन्म 1 मार्च 1983 साली भारतातील मणिपुर जवळ कन्गथेई मधील अतिशय गरीब कुटूुंबात झाला.

मांगते चुंगनेजंग मैरी काॅम हे तिचं पुर्ण नाव.

तिचे वडिल एक गरिब शेतकरी होते अत्यंत कश्टाने ते आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित होते.

मेरी कोम आपल्या आई वडिलांची सर्वात मोठी कन्या तिला आणखीन चार भाऊ बहिण होते.

आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह सुस्थितीत राहावा म्हणुन ती आपल्या आई वडिलांसमवेत शेतात काम करीत असे आणि आपल्या लहानग्या भावंडांचा चांगल्यारितीने सांभाळ करीत असे.

आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थीतीचा परिणाम मेरी कोम ने आपल्या शिक्षणावर कदापी पडु दिला नाही.

आपलं प्राथमिक शिक्षण तिने लोकटक क्रिस्चयन माॅडल हायस्कुल येथुन पुर्ण केले.

पुढे 8 वी पर्यंतचे शिक्षण मोइरंग येथील सेंट जेवियर कॅथलिक शाळेतुन केले त्यानंतर इम्फाल येथील एनआईओएस (Nios) मधुन आपले शालेय शिक्षण पुर्ण केले.

या नंतर तीने राजधानी इम्फाल येथील चुराचांदपुर काॅलेजमधुन ग्रॅज्युऐशन पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.

मेरी कोमचे वैयक्तिक जिवन आणि विवाह – Mary Kom Marriage

2001 सालची गोश्ट असेल, मेरी कोम ज्यावेळी पंजाब नॅशनल गेम्स खेळण्याकरता जात होती त्यावेळी तिची भेट ओन्लर शी झाली होती.

त्या सुमारास ओन्लर दिल्ली युनिवर्सिटीत वकिलीचे शिक्षण घेत होता, सुरूवातीला ते दोघे चांगले मित्र झाले आणि जवळपास वर्शांनतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

पुढे 2005 साली दोघही विवाहबंधनात अडकली.

विवाहापश्चात दोघांना तिन मुलं झालीत. 2007 ला मेरी कोम ने जुळया मुलांना जन्म दिला. त्यानंतर 2013 ला ती पुन्हा एका मुलाची आई झाली.

बाॅक्सिंग रिंग मधली मेरी कोमची शानदार कारकिर्द – Mary Kom Career

मेरी कोम ला बालपणापासुन खेळण्याची फार आवड होती लहानपणापासुन एथलिट होण्याचे तिचे स्वप्नं होते.

शाळेत असतांना फुटबाॅल सारख्या खेळांमधे ती भाग घेत असे.

तिच्या बाबतीत आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे तिने कधीही बाक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला नव्हता.

1998 ला ज्यावेळी मणिपुरच्या डिंग्को सिंह या बाॅक्सरने एशियन गेम्स मधील सुवर्ण पदक जिंकले त्यावेळी मेरी कोम त्याच्या यशाने फार प्रभावित झाली.

आणि त्यावेळीच तिने बाॅक्सिंग क्षेत्रात कारकिर्द घडविण्याचा निश्चय केला.

एक महिला असल्याने बाॅक्सिंग मध्ये कारकिर्द घडविणे म्हणावे तितके सहज आणि सोपे अजिबात नव्हते परंतु सुरूवातीपासुन दृढ निश्चयाची धनी असणे आणि प्रामाणिक प्रयत्नांनी आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या स्वभावाने तिला सर्वश्रेष्ठ मुष्टीयोध्दयांच्या रांगेत नेऊन बसवले.

खरंतर सुरूवातीच्या काळात मेरी कोमचे कुटूंबिय तिच्या या निर्णयाच्या पुर्णतः विरोधात होते त्याचं एक कारण असंही होतं की पुर्वी लोक बाॅक्सिंग ला केवळ पुरूशांचाच खेळ समजत असत, आणि अश्यात या क्षेत्रात करियर करणे मेरी कोम करता आव्हानापेक्षा कमी नव्हते.

तर दुसरीकडे कुटूंबाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने मेरीकाॅम करता बाॅक्सिंग क्षेत्रात प्रोफेशनल ट्रेनिंग घेणे देखील अत्यंत कठीण होऊन बसले होते परंतु आपल्या निश्चयावर ठाम असलेल्या मेरी कोम ने आपल्या समस्यांचा सुलभतेने सामना केला आणि जगातील सर्वोत्तम बाॅक्सिंग खेळाडु म्हणुन पुढे आली.

बाॅक्सिंग मध्ये कारकिर्द घडविण्याचा निश्चय केलेल्या मेरी कोम ने आपल्या घरच्यांना न सांगताच प्रशिक्षण घेण्यास सुरूवात देखील केली होती.

1999 साली मेरी कोम ने ‘‘खुमान लंपक स्पोर्टस् काॅम्पलेक्स्’’ मध्ये मुलींना मुलांसमवेत बाॅक्सिंग करतांना पाहिले.

हे पाहुन ती फार प्रभावित झाली आणि आपल्या बाॅक्सर होण्याच्या निश्चयाला कोणत्याही परिस्थतीत प्राप्त करायचे असा निश्चयत तिने केला.

त्यानंतर मेरी कोम ने आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याकरीता मणिपुर राज्यातील इम्फाल इथं एम नरजीत सिंह या बाॅक्सींग कोच कडे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली.

2000 साली मेरीकाॅम च्या बाॅक्सिंग कारकिर्दी ला सुरूवात झाली तिने मणिपुर येथील ‘‘वुमन बाॅक्सिंग चॅंपियनशिप’’ व पश्चिम बंगाल मधल्या क्षेत्रीय चॅंपियनशिप मधे विजय प्राप्त केला.

या दरम्यान तिने बाॅक्सर म्हणुन देखील पुरस्कार पटकवला आणि त्याच दरम्यान तिच्या कुटूंबियांना ती बाॅक्सर असल्याचे समजले.

Mary Kom Mahiti 

वयाच्या अवघ्या 18 व्या वर्शी मेरीकाॅम ने 2001 साली आंतरराश्ट्रीय स्तरावर आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली.

तिने अमेरिकेत आयोजित झालेल्या ।प्ठ। वुमन्स बाॅक्सिंग चॅम्पीयन शिप मधे 48 किलो वजनगटात सिल्व्हर मेडल जिंकुन भारताची शान वाढविली.

2002 मध्ये मेरी कोम ने तुर्की येथे व्दितीय AIBA महिला विश्व बाॅक्सिंग चॅंपियनशिप मध्ये 45 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळविले.

याच वर्शी हंगेरी येथे आयोजित ‘‘विच कप’’ स्पर्धेत देखील मेरी कोम ने विजय मिळविला. 45 किलो वजन गटात गोल्ड मेडल जिंकत भारताचा मान वाढविला.

2003 साली भारतात आयोजित ‘‘एशियन वुमन बाॅक्सिंग चॅंपियनशिप’’ 46 किलो वजन गटात मेरी कोम ने सुवर्ण पदक प्राप्त केले व बाॅक्सिंग क्षेत्रात भारताचा दबदबा संपुर्ण विश्वात कायम राखला.

2004 साली नाॅर्वे येथे आयोजित महिला बाॅक्सिंग विश्वकप स्पर्धेत मेरी कोम ने गोल्ड मेडल आपल्या नावावर केले.

2005 साली देखील मेरी कोम ची यशाची कमान चढतीच राहिली, ताइवान मध्ये आयोजित ‘‘एशियन वुमन बाॅक्सिंग चॅंपियनशिप मध्ये 46 किलो वजन गटात सुवर्ण पदक आपल्या नावावर करीत भारताला पुन्हा गौरव प्राप्त करून दिला.

या सोबतच मेरीकाॅम ने 2005 साली रशियात AIBA महिला विश्व बाॅक्सिंग चॅंपियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवत महिलांची हिंमत आणि उत्साह वाढविला.

2006 साली मेरी कोम ने भारतात आयोजित AIBA वुमन बाॅक्सिंग चॅंपियनशिप आणि डेनमार्क मध्ये झालेल्या ‘‘व्हिनस वुमन बाॅक्सींग कप’’ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकुन पुनश्च आपल्या बाॅक्सिंग खेळाचे शानदार प्रदर्शन केले.

2007 साली प्रेग्नंसी मुळे मेरी कोम जवळजवळ वर्शभर बाॅक्सिंग पासुन दुर राहिली पण पुन्हा 2008 साली जोरदार पुनरागमन करीत भारतात आयोजित ‘‘एशियन वुमन बाॅक्सिंग चॅंपियनशिप’’ मध्ये सिल्व्हर मेडल आपल्या नावावर केले.

या व्यतिरीक्त याच वर्शी तीने चीन येथे आयोजित AIBA महिला विश्व बाॅक्सिंग चॅंपियनशिप मध्ये 46 किलो वजन गटात गोल्ड मेडल जिंकले आणि भारताची मान अभिमानाने उंच केली.

मेरी कोम ची कहाणी – Mary Kom Story

कधीही न हरणाऱ्या मेरी कोम ने 2009 मध्ये देखील अत्युत्तम प्रदर्शन करत व्हिऐतनाम मध्ये आयोजित ‘‘एशियन इंडोर गेम्स’’ मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.

2010 साली मेरी कोम ने मुष्टीयुध्दात आपल्या खेळाचे अत्युत्तम प्रदर्शन करत कजाखस्तान येथे आयोजित ‘‘एशियन वुमन बाॅक्सिंग चॅम्पियनशिप’’यशस्वीरीत्या जिंकली आणि सुवर्ण पदक मिळविले.

या सोबतच मेरी कोम ने याच वर्शी AIBA वुमन बाॅक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सलग पाचव्यांदा सुवर्ण पदक जिंकले या शिवाय याच वर्शी तिने एशियन गेम्स मधे 51 किलो वजन गटात ब्राॅन्ज मेडल स्वतःच्या नावावर केले.

2010 साली मॅरी कोम ला राजधानी दिल्ली मध्ये आयोजित काॅमनवेल्थ गेम्स् च्या उद्घाटन समारोहात विजेंदर सिंह समवेत स्टेडियमवर क्वींस बैटन पकडण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.

खरंतर या दरम्यान ती आपल्यातील प्रतिभेचे प्रदर्शन करू शकली नाही कारण या खेळांमध्ये महिलांच्या बाॅक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते.

2011 साली मेरी कोम ने चीन येथे आयोजित ‘‘एशियन वुमन कप’’ स्पर्धेत 48 किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले.

वल्र्ड चॅंपियनशिप जिंकलेल्या मेरी कोम ने 2012 साली मोंगोलिया येथे आयोजित ‘‘एशियन वुमन बाॅक्सिंग चॅंपियनशिप ’’स्पर्धेत 51 किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले.

याच बरोबर ती लंडन येथे आयोजित आॅलंपिक स्पर्धेत क्वालिफाय करणारी आणि 51 किलो वजन गटात ब्राॅन्ज मेडल जिंकणारी पहिली भारतिय महिला मुष्टीयोध्दा ठरली.

तसच आॅलंपिक मध्ये व्यक्तिगत पदक जिंकणारी ती तिसरी भारतिय महिला ठरली.

2014 साली देखील यशस्वी मुष्टीयोध्दा मेरी कोम ची यशस्वी घोडदौड कायम राहिली.

साउथ कोरिया येथे आयोजित एशियन गेम्स मधे वुमन फ्लाईवेट (48-52 किलोग्राम) वर्गात गोल्ड मेडल जिंकुन इतिहास रचला.

2018 मधे मेरी कोम ने नई दिल्ली येथे आयोजित 10 व्या ।प्ठ। महिला विश्व बाॅक्सिंग चॅम्पीयनशिप मधे भाग  घेतला आणि 6व्यांदा वल्र्ड चॅम्पियनशिप किताब आपल्या नावावर करत इतिहास रचला.

महान बाॅक्सर मेरी कोम ला मिळालेले सन्मान आणि पुरस्कार – Mary Kom Awards

  • 2003 साली मेरी कोम ला तिच्या शानदार प्रदर्शनामुळे अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2006 ला बाॅक्सिंग क्षेत्रातील तिच्या शानदार प्रदर्शनामुळे तिला पद्म पुरस्कार देण्यात आला.
  • 2007 साली मेरीकाॅम ला क्रिडाक्षेत्रातील तिच्या महत्वपुर्ण योगदानामुळे खेळातील सर्वोच्च ‘‘राजीव गांधी खेल रत्न’’ पुरस्काराकरता नाॅमिनेट करण्यात आले.
  • 2007 ला मेरीकाॅम ला लिम्का बुक आॅफ रेकाॅर्ड तर्फे पीपल आॅफ द ईयर ने सन्मानित करण्यात आले.
  • 2008 या वर्षी CNN-IBN आणि रिलायंस इंडस्ट्रीज व्दारा ‘‘रियल हाॅर्स अवाॅर्ड’’ ने सन्मानित करण्यात आले.
  • मेरी कोम ला 2008 मधे AIBA व्दारे ‘‘मैग्निफिसेंट मैरी’’ अवाॅर्ड ने गौरविण्यात आले.
  • 2008 ला च मेरी कोम ला पेप्सी डज्ट युथ आइकाॅन ने सन्मानित करण्यात आले.
  • 2009 साली महान मुष्टीयोध्दा असलेल्या मेरी कोम ला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • 2010 ला मेरी कोम ला सहारा स्पोर्टस् अवाॅर्ड व्दारा स्पोर्टस्मॅन आॅफ द ईयर हा सन्मान देण्यात आला.
  • 2013 साली मेरी कोम ला देशातील तिसरा सर्वात मोठा समजला जाणारा सन्मान ‘पद्मभूषण’ ने सन्मानित करण्यात आले.
  • 2018 ला मेरी कोम ला मध्यप्रदेश सरकारने विरांगना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

Mary Kom Book – मेरी कोम च्या जीवनावर आधारित पुस्तक

मेरी कोम चे प्रेरणात्मक जीवन पाहाता तिची आत्मकथा “Unbreakable” या नावाने 2013 ला प्रकाशित करण्यात आली आहे.

हे पुस्तक प्रसिध्द बाॅक्सर मेरी कोम ने डीनो सरटो यांच्या समवेत लिहीले आहे.

मेरी कोम च्या जीवनावर आधारीत चित्रपट – Mary Kom Movie

विश्व प्रसिध्द मुष्टीयोध्दा मेरी कोम च्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘‘मेरी कोम’’ 2014 साली प्रदर्शित झाला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले होते.

या चित्रपटात मेरी कोम ची भुमिका बाॅलिवुड आणि हाॅलिवुड चित्रपटांची प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोपडा हीने साकारली होती.

हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता.

मेरी कोम च्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे सर्वच स्तरावर कौतुक झाले.

राज्यसभा सदस्याच्या रूपात महान मुष्टीयोध्दा मेरी कोम:

मेरी कोम ला 26 एप्रील 2016 ला राज्यसभा सदस्य म्हणुन सन्मानित करण्यात आले.

याशिवाय मार्च 2017 ला भारत सरकार ने मेरी कोम ला ‘‘युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय’’ व्दारे बाॅक्सिंग ची राष्ट्रीयस्तरावर परिक्षक म्हणुन सन्मान दिला.

बाॅक्सिंग क्षेत्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारी आणि भारताचे नाव संपुर्ण विश्वात गौरवान्वित करणारी महिला मुष्टीयोध्दा मेरी कोम पासुन प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे.

आज मेरी कोम ने अनेक संघर्षाचा सामना करीत बाॅक्सिंग करता पाहिलेले स्वप्नं सत्यात उतरविले आणि मुष्टीयुध्द केवळ पुरुषांचे साम्राज्य आहे हा समाजाचा झालेला गैरसमज दुर सारत स्वतःला अव्वल स्थानी पोहोचवले आणि महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे पुन्हा एकदा सिध्द केले.

Previous Post

कुस्तीतला एक पुरक व्यायाम प्रकार … मल्लखांब

Next Post

नटसम्राट- डॉ. श्रीराम लागु यांची संपूर्ण माहिती

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
June 17, 2023
Next Post
Shriram Lagoo

नटसम्राट- डॉ. श्रीराम लागु यांची संपूर्ण माहिती

Gopal Ganesh Agarkar

गोपाळ गणेश आगरकर यांच्या विषयी माहिती

Dhuribhai ambani

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती धिरूभाई अंबानींचा जीवन परिचय

Mahadev Govind Ranade

सामाजिक कार्यकर्ता ’’महादेव गोविंद रानडे’’

Pongal Festival in Marathi

“पोंगल” या सणाची संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved