एक होता मायकल जैक्सन…विश्वविख्यात पॉप सिंगर आणि डांसर ची गोष्ट

Michael Jackson Life Story 

मायकल जैक्सन हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. यांच्याबद्दल माहिती नाही असा मनुष्य शोधून देखील सापडायचा नाही, पॉप संगीताला विश्वपटलावर उच्च स्थानी पोहोचविण्यात मायकल जैक्सन या जगद्विख्यात पॉप सिंगर आणि डांसर चा खूप मोठा वाटा आहे.

अगदी लहानग्या वयात संगीताच्या जगात पाऊल ठेवणाऱ्या मायकल जैक्सनचा “किंग ऑफ पॉप” होईपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याच्या जीवनाशी संबंधित महत्वपूर्ण गोष्टींचा प्रवास या लेखातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

विश्वप्रसिद्ध पॉप गायक आणि डांसर मायकल जैक्सनचा जीवन परिचय – Michael Jackson Biography in Marathi

Michael Jackson

मायकल जैक्सन विषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती – Michael Jackson Information in Marathi

पूर्ण नांव (Name) मायकल जोसेफ जैक्सन
जन्म (Birthday) 29 ऑगस्ट 1958, अमेरिका
वडील (Father Name) जोसेफ वाल्टर जैक्सन
आई (Mother Name) लिसा प्रेस्ली, डेबी रो
मुलं (Childrens) प्रिंस मायकल जैक्सन ज्युनियर,  पेरिस मायकल केथरीन
मृत्यू (Death)   25 जून 2005 (हार्ट अटैक)
पुरस्कार (Awards)

सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणारा पॉप सिंगर,

23 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स देखील मायकल जैक्सनच्या नावावर जमा आहेत

मायकल जैक्सनचा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Michael Jackson History in Marathi

29 ऑगस्ट 1958 ला शिकागो नजीक एका लहानश्या गावात मायकल जैक्सन चा जन्म झाला.आपल्या माता-पित्याचे ते सर्वात लहान अपत्य होते. केथरीन या मायकल च्या आईला संगीताची फार आवड होती आणि त्यातून त्या आपल्या मुलांना चांगलं संगीत ऐकवीत…त्यांचे वडील क्रेन ऑपरेटर म्हणून काम करीत परंतु त्यापूर्वी ते देखील स्थानिक संगीताच्या “फॉल्कन” पथकात गिटार वाजवीत असत, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मायकल ला संगीताची आवड …बाळकडू हे घरातूनच मिळत गेलं.

माझ्या सारखं बालपण कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं का म्हणायचे मायकल जैक्सन  –  Michael Jackson Life Story

मायकल जैक्सनचे आणि त्याच्या पित्याचे संबंध सुरुवातीपासून ताणलेले होते. एका इंटरव्यू दरम्यान मायकल म्हणाला होता…त्याचे वडील फार हिंसक वृत्तीचे आणि मुलांना पैसे कमावण्याची मशीन समजत असत. मायकल म्हणाला की त्याला कधी त्याचं लहानपण जगायलाच मिळालं नाही, बालपणी जवळपास 3 तास घरी ट्युशन टीचर कडून अभ्यास करून पुढे दिवसभर स्टुडियोत रेकॉर्डिंग करायचे आणि थकून-भागून झोपी जायचं. लहानपणी खेळण्याकरता तो कायम आसुसलेला रहायचा.

आपल्या वडिलांच्या कडक आणि हिंसक स्वभावाने तो कायम दुखी राहीला, त्याचे वडील नेहमी त्याला त्याच्या चेहरा आणि नाकावरून घालून-पाडून बोलायचे आणि तो विद्रूप असल्याची सतत त्याला जाणीव करून द्यायचे. त्याला त्याच्या वडिलांची इतकी भीती वाटायची कि तो त्यांच्या दहशतीने सतत आजारी पडायचा.

आता-आता पर्यंत डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर केस घेण्याची सवय ज्याला आपण त्याची स्टाईल समजत होतो, ती खरंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या आत्मविश्वासाचे केलेले खच्चीकरण होते. मायकल ला कायम त्याच्या वडिलांनी बोलल्यामुळे असे वाटत राहिले कि तो विद्रूप आहे…तो लोकांशी कधी नजरेला नजर देत बोलू सुद्धा शकला नाही, आणि म्हणून तो डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर केस आणून स्वतःला आयुष्यभर लपवित राहीला. तसं तर मायकल ने आपल्या यशाचं श्रेय देखील आपल्या वडिलांच्या कडक आणि अनुशासन प्रिय स्वभावाला दिलंय.

मायकल जैक्सनचा विवाह आणि मुलं –  Michael Jackson Marriage, Family, Children

पॉप सिंगिंग आणि अद्भुत मूनवॉक करता ओळखल्या जाणाऱ्या मायकल जैक्सन ने 18 मे 1995 ला वयाच्या 35 व्या वर्षी लिसा प्रेस्ली शी विवाह केला, मात्र त्याचा हा विवाह फार काळ टिकला नाही.

18 जून 1996 ला दोघांचा काडीमोड झाला. यानंतर अवघ्या काही दिवसांनीच मायकल आपली नर्स डेबी रो शी विवाहबद्ध झाला लग्नानंतर त्यांना प्रिंस मायकल जैक्सन ज्युनियर आणि पेरिस मायकल केथरीन नावाची मुलं झालीत. मायकल चा हा विवाह देखील जास्त टिकला नाही 1999 साली  दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मुलं मात्र मायकल जवळच राहीलीत.

मायकल जैक्सनची कारकीर्द आणि यश – Michael Jackson Career

वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी आपल्यातील गायनाच्या अद्भुत कौशल्याने त्याने सर्वांना आश्चर्यचकित केलंआपल्या वडिलांच्या मार्गदर्शनात आपल्या मोठ्या भावंडांसमवेत ” जैक्सन ब्रदर्स” बैंड ने संगीताच्या विश्वात पाऊल टाकलं. मोटाउन रेकॉर्ड्स ने मायकल मधील अनोख्या  डांसिंग व सिंगिंग प्रतिभेला ओळखत लहान वयातच त्याला करारबद्ध केलं होतं.

1966 साली जैक्सन च्या बँड चे नांव बदलून ” जैक्सन 5” असं ठेवण्यात आलं. 1969 साली ज्यावेळी मायकल केवळ 11 वर्षांचा होता, तेंव्हा त्याचे पहिले सॉंग “आई  वोन्ट यु बैक” प्रदर्शित झाले आणि खूप यशस्वी देखील ठरले.पुढे 1970 ला मायकल चे “द लव यू सेव” आणि “इट विल बी देयर” गाण्यांनी संगीत क्षेत्रात तुफान यश मिळवले आणि त्यानंतर मायकल ने कधीही मागे वळून बघितले नाही.

त्यानंतर 1975 मध्ये एपिक रेकोर्ड या कंपनी सोबत मायकल जैक्सन जोडल्या गेले आणि आपल्या ग्रुप चे नाव बदलून मायकल ‘जैक्सन्स’ केलं. या दरम्यान त्याने “शेक य्योर बॉडी” आणि “एंजॉय य्योरसेल्व” सारखी हिट पॉप गाणी गाऊन यशाचा नवा इतिहास रचला.1979 ला मायकल जैक्सन ने एपिक रेकोर्ड समवेत स्वतःचा पहिला सोलो अल्बम “ऑफ द वॉल” काढला.

या अल्बममधे ‘रॉक विथ यू’ , ‘डोन्ट स्टोप” आणि “टील यू गेट इनफ” सारख्या प्रसिद्ध पॉप गीतांचा समावेश होता. हा अल्बम देखील लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरला, या अल्बमच्या जवळ-जवळ 7 मिलियन कॉपी बाजारात विकल्या गेल्या.मायकलच्या यशाची कमान सतत चढती होती त्यानंतर तीन वर्षांनी 1982 ला त्याने आपला दुसरा सोलो अल्बम “थ्रिलर” रिलीज केला.

या अल्बम मधील “बीट इट” आणि “बिली जीन” सारख्या सुपरहिट गाण्यांनी मायकलला जगातील सर्वाधिक पॉप्यूलर सुपर स्टार बनवले. या अल्बम मधील गाणी पुढे कित्येक वर्ष प्रसिद्धीच्या शिखरावर राहीलीत.याशिवाय त्याचा “थ्रिलर” हा अल्बम आजतागायत सर्वात जास्त विकला गेलेला अल्बम ठरला आहे.

त्यानंतर मायकल जैक्सन च्या “बैड” अल्बम मधील “डर्टी डायना”, “मैन इन द मिरर” सारख्या गाण्यांनी अपार यश मिळवलं. मायकल जैक्सन ने 1990 मधे स्वतःचा चौथा “डेंजरस” हा अल्बम काढला. हा अल्बम देखील तुफान गाजला, या अल्बम च्या जवळपास 20 मिलियन कॉपी बाजारात विकल्या गेल्या.

मायकल जैक्सन ला मिळालेले पुरस्कार आणि सन्मान – Michael Jackson Awards

 • मायकल जैक्सन च्या ‘थ्रिलर’ अल्बम करता त्याला 1984 ला 11 पैकी 8 ग्रेमी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
 • पॉप संगीताला नव्या शिखरावर पोहोचविणाऱ्या जैक्सन ला 1987 साली “किंग ऑफ  पॉप” या उपाधीने गौरवान्वित केल्या गेले
 • मायकल ला आपल्या “बैड” अल्बम करीता 4 प्लेटीनम प्रमाणपत्र मिळाले तसच त्याच्या थ्रिलर अल्बम करता 20 प्लेटीनम ने सर्टीफाइड करण्यात आले.
 • पॉप सिंगर आणि डांसर मायकल जैक्सन ला आतापर्यंत सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय त्याने स्वतःच्या नावावर 23 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेत.

मायकल जैक्सनशी संबंधित विवाद – Michael Jackson Controversy

 • 1994 साली एका कुटुंबाने मायकल जैक्सन वर लहान मुलाच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप लावले.
 • त्यानंतर मायकल जैक्सन ने त्या परीवाराला प्रकरण आपसात घेण्यासाठी तडजोडीपोटी 20 मिलियन डॉलर एवढी रक्कम दिली होती.
 • मायकल वर त्यानंतर गुन्हा दाखल झाला नसला तरी त्याच्या प्रतिष्ठेला आणि प्रसिद्धीला मात्र चांगलाच तडा गेला होता.
 • 2002 साली मायकल जैक्सन ला लोकांच्या तीव्र रोषाचा आणि तिखट प्रतिक्रियांचा तेंव्हा सामना करावा लागला जेंव्हा त्याने आपल्या मुलाला घराच्या बाल्कनी बाहेर लटकवले होते.
 • 2003 साली मायकल जैक्सनला मुलाच्या यौन शोषणाच्या आरोपाखाली दोन दिवस तुरुंगाची हवा खावी लागली,
 • या दरम्यान त्याच्या ऑफिस आणि घरावर टाकलेल्या धाडीत काही मुलांची नग्न छायाचित्र देखील आढळून आलीत.
 • 2005 साली मायकल जैक्सन ला सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आले. त्यामुळे त्याला मोठा दिलासा मिळाला होता.

मायकल जैक्सन चा मृत्यू – Michael Jackson Death

 • आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये मायकल जैक्सनला मादक द्रव्यांचे व्यसन जडले होते.
 • त्यानंतर 25 जून 2009 ला लॉस एंजिल्स येथे स्थित स्वतःच्या घरात मायकल जैक्सनचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
 • आणि अश्या तऱ्हेने पॉप संगीताला एक दर्जा प्राप्त करून देणाऱ्या मायकल जैक्सनचा दुर्दैवी अंत झाला.
 • त्याच्या मृत्युच्या बातमीने अवघ्या चाहत्यांना तीव्र दुखः झालं.
 • आपल्या मृत्यू पूर्वी काही दिवस अगोदर त्याने आपला अखेरचा “दिस इज इट” हा शो करण्याचे वचन दिले होते.
 • आज जरी मायकल जैक्सन आपल्यात नसले तरी अवघे विश्व त्याच्या अनोख्या मून वॉक डांसिंग स्टाइलला आजही विसरलेले नाही.
 • सिंगर आणि डांसर म्हणून मायकल जैक्सनने जी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली ती आजतागायत कोणत्याही गायकाला मिळालेली नाही.

मायकल जैक्सन संबंधित काही विशेष बाबी – Facts About Michael Jackson

 • 1984 साली पेप्सीच्या जाहिराती दरम्यान मायकल जैक्सन गंभीर जखमी झाले होते.
 • जखमांचे व्रण मिटवण्या साठी जैक्सन ने प्लास्टिक सर्जरी चा उपयोग केला होता.
 • जैक्सन चा देवावर अत्यंत विश्वास आणि श्रद्धा होती.
 • प्रत्येक शो पूर्वी तो देवाची प्रार्थना करीत असे आणि पुरस्कार घेताना देखील देवाप्रती आभार व्यक्त करत असे.
 • नाकाचे हाड तुटल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत असे त्यामुळे त्याने नाकाची देखील सर्जरी केली होती.
 • जैक्सन ला “Alpha -1 Antitrysin Deficiency” नावाचा गंभीर आजार होता.
 • मायकल जैक्सन सर्वाधिक कमाई करणारा मृत कलाकार आहे.
 • त्यांनी आपल्या लाइव परर्फोर्मंस साठी एंटी ग्रेविटी बूट बनविले होते, हे घातल्याने त्याला बरंच समोर वाकता येत असे
 • मायकल जास्त कालावधी पर्यंत जगता यावं याकरता ऑक्सिजन चेंबर मधे झोपत असे.
 • जैक्सनच्या अंत्ययात्रेला जवळजवळ अडीच अरब प्रेक्षकांनी लाइव पाहीले होते. आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली ही लाइव ब्रॉडकास्ट ठरली आह

मायकल जैक्सनच्या डांस चे गारुड आजदेखील समस्त जगावर पसरलेले पाहायला मिळते. आजही लोकांना त्याच्या गाण्याची नृत्याची सतत आठवण येते.

त्यासुमारास त्याची नृत्यशैली खूप प्रसिद्ध झाली होती. क्वचितच कधी कुणी इतका प्रसिद्ध गायक, गीतकार, आणि डांसर इतिहासात झाला असेल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top