• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

मीराबाई चानू यांची बायोग्राफी

Mirabai Chanu Biography

साइखोम मीराबाई चानू एक भारतीय वेटलिफ्टर आहेत. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक इथे वेटलिफ्टिंग या खेळामध्ये ४९ किलो वर्गात भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. हा पराक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खिलाडी आहेत.

मीराबाई चानू यांची बायोग्राफी – Mirabai Chanu Biography in Marathi

Mirabai Chanu Biography in Marathi
Mirabai Chanu Biography in Marathi

मीराबाई चानू यांच्याबद्दल – About Mirabai Chanu Information

नाव (Name)साइखोम मीराबाई चानू (Saikhom Mirabai Chanu)
जन्म (Birthday)८ ऑगस्ट १९९४ ( 8 August 1994)
जन्मस्थान (Birth place)इम्फाल,मणिपूर (Emphal, Manipur)
वडील (Father)साईखोम कृति मैतेई (Saikhom Kriti Meitei )
आई (Mother)साईखोम ऊँगबी तोम्बी लीमा (Saikhom Ongbi Tombi Leima )
प्रशिक्षक(Coach) विजय शर्मा (Vijay Sharma)
भावंडे (Siblings)२ भाऊ आणि ३ बहिण (2 brother and 3 sister)
पेशा (Occupation)खेडाळू (sportsman)
खेळ (Sport) वेटलिफ्टिंग (Weight-lifting)

साइखोम मीराबाई चानू यांचा जन्म आणि कुटुंब- Saikhom Meerabai Chanu Birth and Family

मीराबाई चानू यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ मध्ये मणिपूरची राजधानी इम्फाल इथे झाला होता. त्यांचे वडिलांचे नाव साईखोम कृति मैतेई असे आहे आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. त्याच्या आईचे नाव साईखोम ऊँगबी तोम्बी लीमा आहे आणि त्या चहाची छोटी दुकान चालवतात. मीराबाई आणि त्यांचे भाऊबहीन मिळून ६ जन आहेत आणि त्या सर्वात छोट्या आहेत.

साइखोम मीराबाई चानू यांच्या करियरची सुरवात – Meerabai Chanu’s Carrier

मीराबाई जेव्हा १२ वर्षाच्या होत्या तेव्हा त्या आपल्या भावासोबत जंगलात लाकूड आणायला जायच्या या लाकडाचा उपयोग त्यांचा परिवार इंधन म्हणून करायचा. मीराबाईच्या भावाला जो लाकडाचा गठ्ठा उचलणे जड जात होते ते मीराबाई सहज उचलत होत्या. तेव्हा त्यांच्या परिवाराला प्रथम कळले की मीराबाई यांच्यात असाधारण शारीरिक शक्ती आहे.

२००७ मध्ये आपण वेटलिफ्टिंग मध्ये करियर करावं असं मीराबाई चानू याना वाटल आणि त्या इम्फाळ स्तीत असलेल्या खुमन लॅम्प स्पोर्ट कॉम्लेक्स मध्ये प्रशिक्षण घेऊ लागल्या. अनिता चानू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली. सात वेळा विश्व विजेता असलेल्या आणि रजत पदक विजेता तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक कुंजरानी देवी यांनी मीराबाई चानू याना वेटलिफ्टिंग मध्ये करियर करण्यासाठी प्रेरित केले.

२०१७ मध्ये अमेरिकेत ‘ वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पयनशिप ‘ चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत मीराबाई ने सुवर्ण पदक जिंकले. इतकेच नाही तर मीराबाई चानू यांची निवड Rio Olympics मध्ये झाली. पण या स्पर्धेत त्या भारतासाठी कोणताच पदक जिंकू शकले नाही.

२०१८ च्या ‘Commonwealth‘ स्पर्धेत तिने भारतासाठी वेटलिफ्टिंग मध्ये पहिला सवर्ण पदक जिंकला. मीराबाई चानू यांच्या जीवनातील सर्वात मोठे यश म्हणजे २०२० च्या टोक्यो Olympics मध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणे. हा पराक्रम करून धाखावणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे. Olympics मध्ये या आधी फक्त कर्णम मल्लेश्वरी ह्या महिला भारतीय खेळाडूने कांस्य पदक जिंकले आहे.

मीराबाई चानू यांना मिळालेले बक्षिसे व सन्मान – Mirabai Chanu Awards

  • राष्ट्रीय
  1. ‘मेजर ध्यान चांद खेळ रत्न पुरस्कार ‘ भारताचा सर्वोत्तम खेळ पुरस्कार
  2. ‘पद्मा श्री’ भारताचा ४था सर्वोत्तम नागरिक पुरस्कार
  • इतर
  1. मणिपूर राज्य सरकारने २०१७ च्या विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू यांनी सवर्ण पदक मिळवले त्याबद्दल त्यांना २० लाख रुपय पारितोषिक म्हणून दिले.
  2. २०२० टोकियो ऑलिंपिक मध्ये निवड झाल्या बदल त्यांना मणिपूर सरकारने परत एकदा १० लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले.
  3. २०२० टोकियो ऑलिंपिक मध्ये भारताचे नेतृत्व केल्या बदल मणिपूर सरकारने त्यांना २५ लोख रुपये पारितोषिक म्हणून दिले.
  • २०२० टोकियो ऑलिंपिक मध्ये रौप्य पदक जिंकल्या बदल मिळालेले पारितोषिक
  1. byjus मार्फत १ कोटचे पारितोषिक.
  2. भारत सरकार कडून ५० लाखाचे पारितोषिक.
  3. मणिपूर सरकार कडून १ कोटीचे पारितोषिक आणि मणिपूर पोलीस मध्ये अतिरिक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती.
  4. रेल्वे मंत्रालयाकडून २ कोटी.
  5. BCCI कडून ५० लाख.
  6. भारतीय ऑलिम्पिक संघटने कडून ४० लाख.

मीराबाई चानू यांच्या बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – Questions about Mirabai Chanu

१. मीराबाई भाई चानू यांच्या आईचे नाव काय आहे?                                                                                              उत्तर: साईखोम ऊँगबी तोम्बी लीमा.

२. मीराबाई भाई चानू यांच्या वडिलाचे नाव काय आहे?                                                                                                उत्तर: साईखोम कृति मैतेई.

३. साईखोम मीराबाई चानू यांना किती भाऊ बहीन आहेत?                                                                                           उत्तर: साईखोम मिराभाई चानू यांना दोन भाऊ आणि तीन बहीन आहेत.

४. साईखोम मीराबाई चानू यांची पराशिक्षकाचे नाव काय आहे?                                                                                      उत्तर: विजय शर्मा

५. साईखोम मीराबाई चानू कोणत्या भारताच्या कोणत्या राज्यातल्या रहवासी आहेत?                                                      उत्तर: साईखोम मीराबाई चानू भारताच्या मणिपूर राज्यातल्या रहवासी आहेत.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

वि.स. खांडेकर – मराठी साहित्यिक

V.S. Khandekar Mahiti मराठी कथा, कादंबरीकार म्हणून सर्वांनाच परिचित असणारं नाव वि.स. खांडेकर. भारतात साहित्य क्षेत्रात सर्वोच्च असा समजला जाणारा...

by Editorial team
May 19, 2022
Marathi Biography

बहिणाबाई चौधरी माहिती

Bahinabai Chaudhari Biography in Marathi अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी हाताले चटके तवा मियते भाकर. बहिणाबाई चौधरी यांच्या या...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved