जगातील सर्वात जास्त महागडा घटस्पोट, किंमत पाहून होणार हैराण

Most Expensive Divorce

आजपर्यंत आपण जगातील बऱ्याच गोष्टींची यादी पाहिली आहे, आणि येथून पुढे सुद्धा पाहत राहणार. पती पत्नीचे भांडण होताना आपण पाहिले आहे का? पाहिले काय आपले सुद्धा कधी ना कधी आपल्या पत्नीसोबत काही कारणावरून भांडण झाल असेलच.

पती पत्नीचे नाते हे तडजोड करून चालत नाहीच त्यासाठी एकमेकांवर विश्वास असायला हवा, पण या नात्यात बाकी काही अनावश्यक गोष्टींचा समावेश झाला, किंवा एकमेकांना समजून घेतल्या गेले नाही कि या नात्याला तडा पडण्यास सुरुवात होते, आणि त्या नंतर मग गोष्ट जाऊन पोहचते ती घटस्पोटापर्यंत.

घटस्पोट म्हटले कि त्यासाठी एक वगळा खर्च लागतो, हा खर्च पती जो पर्यंत आपल्या पत्नीला देत नाही त्याला पत्नीकडून घटस्पोट मिळवता येत नाही, आणि जेव्हा पती खर्चाची रक्कम पत्नीला देतो तेव्हा तो घटस्पोट मान्य ठरल्या जातो,

अशीच एक घटना काही दिवसांच्या अगोदर आपल्याला पहायला मिळाली, तर आजच्या लेखात आपण या घटनेकडे नजर टाकूया कारण हा असा तसा घटस्पोट नसून बिलियन रुपयांची संपत्ती या घटस्पोटात गेली आहे, मग आपण विचार करू शकता, कि हा घटस्पोट कसा असेल.

तर चला जाणून घेवूया याविषयी.

जगातील सर्वात जास्त महागडा घटस्पोट, किंमत पाहून होणार हैराण – Most Expensive Divorce

Most Expensive Divorce
Most Expensive Divorce

“अमेझॉन” चे जेफ बेजोस यांचा घटस्पोट – Jeff Bezos divorce

आपण कधीतरी ऑनलाई शॉपिंग केली असणारच, आणि केली असेल तर आपल्याला “अमेझॉन” नावाच्या ई कॉमर्स कंपनी विषयी माहिती असेलच. आता आपण म्हणणार कि या कंपनीचे या विषयाशी काय देण घेण.

तर मी आपल्याला सांगू इच्छितो कि जो हा जगातील सर्वात महाग घटस्पोट झाला तो या कंपनीच्या मालकाचा झाला आहे.

काही दिवसांच्या आधी जगातील सगळ्यात महागडा घटस्पोट हा ३.८ बिलियन इतक्या डॉलर्स चा झाला होता असे रेकॉर्ड आहे, जो फ्रांस मध्ये जन्मलेल्या अमिरीकेचे उद्योगपती एलेक वाइल्डेनस्टाइन आणि त्यांची पूर्व पत्नी जोसलिन वाइल्डेनस्टाइन यांच्या मध्ये झाला होता.

पण या रेकॉर्ड ला तोडत अमेझॉन कंपनीचे निर्माते जेफ बेजोस आणि त्यांच्या पत्नी मॅकेन्झी यांच्या मध्ये ३५ बिलियन डॉलर मध्ये झालेला घटस्पोट हा जगातील सर्वात जास्त किमतीचा घटस्पोट ठरला आहे.

बेझोस यांनी १९९४ मध्ये एक कंपनी सुरु केली होती, आणि त्यांच्या पत्नी या कंपनीच्या पहिल्या सदस्य राहिलेल्या आहेत. या दोघांना एकूण चार मुल आहेत. दोन मुली आणि दोन मूल.

फोर्ब्स च्या माहितीनुसार २०१९ मध्ये अमेझॉन कंपनीचे एका वर्षाचे वार्षिक उत्पन्न २३२. ८ मिलियन डॉलर इतके आहे. आणि त्यांच्या परिवाराची एकूण कमाई हि १३१ मिलियन डॉलर इतकी झाली आहे.

बेझोस यांच्या कंपनीची १६ टक्के हिस्सेदारी हि त्यांच्या पत्नीच्या नावावर होती, परंतु या घटस्पोटा नंतर त्यांची या कंपनी मध्ये फक्त ४ टक्क्यांचा हिस्सा राहील.

त्यांनी घटस्पोट झाल्यानंतर ट्विटर वर एक ट्वीट च्या माध्यमातून या घटस्पोटाला दोघांच्या संमतीने संपविल्या बद्दल त्यांनी धन्यवाद मानला आहे.

मॅकेन्झी हि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सुद्धा आलेली आहे, ती संपूर्ण जगात २२ व्या क्रमांकावर सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनली आहे. मॅकेन्झी हि एक क्रियेटीव्ह रायटर सुद्धा आहे, सोबतच या पूर्व पती पत्नीचा घटस्पोट हा जगातील सर्वात महागडा घटस्पोट ठरला आहे.

जगातील अश्याच काही अनोख्या गोष्टी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत राहू, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here