• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
MPSC (PSI) Information in Marathi

M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती

February 5, 2021
Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

February 24, 2021
24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 24, 2021
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 23, 2021
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 23, 2021
Chetan Bhagat Books in Marathi

चेतन भगत यांची पुस्तके

February 22, 2021
22 February History Information in Marathi

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 22, 2021
Aruna Asaf Ali Information in Marathi

अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 21, 2021
21 February History Information in Marathi

जाणून घ्या 21 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 21, 2021
कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

February 20, 2021
20 February History Information in Marathi

जाणून घ्या २० फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 20, 2021
शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

February 19, 2021
19 February History Information in Marathi

जाणून घ्या 19 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 19, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Wednesday, February 24, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती

MPSC (PSI) Information in Marathi

MPSC (महाराष्ट्र लोक सेवा आयोग) मार्फत घेण्यात येणारी एक अतिशय महत्वाची आणि तितकीच प्रसिद्ध असलेली परीक्षा म्हणजे P.S.I. (पोलीस उप-निरीक्षक) पदा साठीची परीक्षा. महाराष्ट्रातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट बघत असतो.

ही परीक्षा ग्रामीण भागातील तरुणांच्या गळ्यातील जणू ताईतच. शहरी भागातील विद्यार्थीसुद्धा आता या स्पर्धेमध्ये मागे राहिलेले नाहीत. तर जाणून घेऊयात या परीक्षेबद्दल थोडी माहिती.

M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती – MPSC (PSI) Information in Marathi

MPSC (PSI) Information in Marathi
MPSC (PSI) Information in Marathi

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुष्कळ विद्यार्थी हे विविध नोकऱ्यांच्या शोधात असतात. यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे शासकीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छितात. नोकरीसाठी अर्ज भरतात, परीक्षा पण देतात. परंतु खूप जण दुर्भाग्याने कमी पडतात.

असे का बरं होत असेल. याचे एक मुख्य कारण म्हणजे परीक्षेबद्दलची अपूर्ण माहिती. अर्ज करायचा म्हणून करायचा असं करून चालत नाही. आपण ज्या परीक्षेसाठी अर्ज करत आहे, ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला माहित हवी.

हाच विषय घेउन आज आम्ही आलो आहोत. आम्ही आज आपल्याला MPSC – PSI (पोलीस उप-निरीक्षक) परीक्षेबद्दल महत्वपूर्ण माहिती देणार आहोत. तसेच परीक्षेचे स्वरूप, विषय, अभ्यास कसा करावा व पुस्तके कोणती वापरावी या बद्दल मार्गदर्शन करणार आहोत.

MPSC (PSI) काय आहे – What is MPSC (PSI)

मित्रांनो MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) हि एक संस्था आहे जी महाराष्ट्र शासना अंतर्गत कार्य करते. विविध स्पर्धा परीक्षेंचे आयोजन करून शासकीय अधिकाऱ्यांची निवड करणे हे MPSC चे मुख्य कार्य आहे. ह्या परीक्षा वेगवेगळ्या पदांकरिता आयोजित करण्यात येत असते. यातील काही पदे ही वर्ग १, वर्ग २ अधिकाऱ्यांसाठी तर काही पदे हि विविध विभागांतील अधिकारी पदांच्या भरतीसाठी आयोजित केली जाते.

यातीलाच एक महत्वाची परीक्षा म्हणजे पोलीस उप-निरीक्षक (PSI) पदासाठीची परीक्षा. जे तरुण PSI साठी तयारी करत आहेत अशा सर्वांना या माहितीचा खूप फायदा होणार आहे. PSI हे MPSC मधील वर्ग २ चे पद आहे. ह्या पदासाठी पात्र होण्यासाठी आपणाला

  • काय तयारी करावी लागेल?
  • परीक्षेचे स्वरूप काय असते?
  • पात्रतेचे नियम व अटी काय आहेत?
  • परीक्षेचा अभ्यासक्रम काय?
  • जाहिरात कुठे पाहायला मिळू शकते?
  • अभ्यास कसा करावा?

हे आणि या सारख्या आणखी प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

MPSC (PSI) पदासाठी लागणारी पात्रता – MPSC (PSI) Eligibility

ही परीक्षा महिला व पुरुष दोन्ही देऊ शकतात. फक्त त्यांनी खालील काही अटींची पूर्तता करावी.

  • वय (MPSC PSI Age Limit): असे सर्व विद्यार्थी कि ज्यांनी आपल्या वयाची १९ वर्षे पूर्ण केली आहेत आणि ज्यांचे वय ३१ वर्षांपेक्षा कमी आहे, ते सर्व या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. (जाती वर्गानुसार वायोमार्यादेचे आरक्षण येथे लागू आहे)
  • शिक्षण : १. उमेदवार हा कमीत की पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    २. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात.
  • शारीरिक पात्रता: (पुरुषांसाठी): १. उमेदवाराची उंची कमीत कमी १६५ इंच असावी.                                                                                                         २. उमेदवाराची छाती (न फुगवता ) : ७९ सेमी,                                                                                                               ३. उमेदवाराची छाती (फुगविल्यानंतर) : ८४ सेमी. ( फुगविण्याची  ची क्षमता कमीत कमी ५                       सेमी आवश्यक)
  • महिलांकरिता : उंची १५७ सेमी.

सूट : शासनाने वेळो वेळी जाहीर केलेल्या निर्देशांनुसार वायोमर्यादेमध्ये व जातीनुसार सूट देण्यात आली आहे.

* दिव्यांग उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.

MPSC (PSI) परीक्षेचे स्वरूप कसे असते : MPSC PSI Exam Pattern

ही परीक्षा मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येते.

  • पूर्व परीक्षा (Pre-Exam) : ही लेखी स्वरुपाची असून प्रश्न बहुपर्यायी असतात. ४ पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उत्तर द्यावे लागते. यामध्ये एकूण १०० प्रश्न असून १०० गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये सामान्य क्षमता चाचणी तपासल्या जाते.
  • मुख्य परीक्षा (Mains-Exam) : पूर्व परीक्षा पास झालेले उमेदवार मुख्यपरीक्षेकरिता पात्र ठरतात. ही सुद्धा लेखी स्वरुपाची असून पूर्व परीक्षेच्या मानाने थोडी कठीण असते. यामध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर १०० गुणांचा असतो ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेवरील प्रश्न असतात. दुसरा पेपर सुद्धा १०० गुणांचा असतो ज्यामध्ये मानसिक चाचणी, सामान्य ज्ञान इ. विषयांवर प्रश्न असतात.
  • शारीरिक पात्रता परीक्षा (Physical Test) : मुख्य परीक्षा पास झालेले उमेदवार हे पुढे शारीरिक पात्रता परीक्षेसाठी निवडले जातात.यामध्ये :
  • लांब उडी (Long Jump) : (३० गुण)
  • शॉर्ट पूट (Short Puts) : (३० गुण)
  • पूल अप (Pull Ups) : (४० गुण)
  • धावणे (Running) : (८०० मी, ०२:३० मिनिट मध्ये : १०० गुण)

इ. घटक असतात. ही परीक्षा एकूण २०० गुणांसाठी असते.

MPSC (PSI) परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो – MPSC PSI Exam Syllabus

परीक्षेचा अभ्यासक्रम हा सर्वसमावेशक प्रकारचा आहे. ज्यामध्ये :

  • इतिहास : भारताचा व महाराष्ट्राचा(प्राचीन, मध्ययुगीन, स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्योत्तर भारत इ.)
  • भूगोल : भारताचा व महाराष्ट्राचा (क्षेत्रफळ, स्थान, शेती, दळणवळण,नद्या, पर्वत, टेकड्या, लोकसंख्या इ.)
  • विज्ञान : (जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, इ)
  • सामान्यज्ञान : यामध्ये जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठे-लहान, लांब-आखूड,उंच-ठेंगणे इ. बाबींवर प्रश्न विचारल्या जातात.
  • मराठी : व्याकरण, साहित्य, लेखक व त्यांची टोपणनावे इ.
  • इंग्रजी: व्याकरण, साहित्य, शब्द रचना, इ.
  • चालू घडामोडी : जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील घडामोडींवरील प्रश्न.
  • राज्यशास्त्र : राज्यातील कारभार, मंत्री मंडळ, राज्यघटना, इ.
  • तर्कशास्त्र

अशा प्रकारचा सर्व समावेशक अभ्यास आपल्याला करावा लागेल.

MPSC (PSI) जाहिरातीबद्दल कुठे माहिती मिळणार – MPSC PSI Advertisement

शासनाच्या वेबसाईट वर (mahampsc.mahaonline.gov.in) आपण बघू शकता. शिवाय दैनिक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा या पदाच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळू शकतात.

MPSC (PSI) परीक्षेची तयारी कशी करावी – How to Prepare for MPSC PSI Exam

मित्रांनो हि परीक्षा जर आपल्याला पास करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे कठोर परिश्रम घेण्याची तयारी. जर मनाशी ठरवलं तर कोणतीही गोष्ट कठीण नसते हे आपणा सर्वांना माहिती आहे.

सुरुवातीला शासनाचे ५ वी ते १२ वी ची पुस्तके आपण वाचू शकतो. तसेच मी खाली काही पुस्तकांची यादी दिली आहे त्यातून सुद्धा आपण अभ्यास करू शकतो.

अभ्यास सुरु करण्यापूर्वी परीक्षेची स्वरूप जाणून घ्यावे. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका काढाव्यात. त्यातील प्रश्नांचे स्वरूप बघा. त्यानुसार त्या विषयाचा अभ्यास करा. इंटरनेटवर सुद्धा या बद्दल खूप वीडीओ पाहू शकतो. त्यानुसार स्वतःच्या नोट्स तयार करून आपण याचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकतो.

MPSC (PSI) परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावे – Books for MPSC PSI Exam

मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कि, या परीक्षेसाठी ठराविक असे कुठलेही पुस्तक नाही. एका पेक्षा जास्त पुस्तक वापरून किवा ऑनलाईन अभ्यासातून तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार कराव्या लागणार.

तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी माहिती आपण वाचणार आहोत ती बरोबर आहे कि नाही हे सुद्धा तुम्हाला तपासून पाहावे लागणार आहे.

काही महत्वाची पुस्तके : Some Suggested Books

  • भूगोल: के सागर चा ठोकळा
  • मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे
  • भारताचा भूगोल: सवदि सर
  • चालु घडामोडींसाठी: लक्ष्यवेध
  • NCERT ची 5वी ते १२ वी ची पुस्तके

इ. आणि असे काही पुस्तके आपण वापरू शकतो.

MPSC (PSI) परीक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स – Important Tips for MPSC PSI Exam

  • स्वतःच्या नोटस तयार करा.
  • मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा.
  • योग्य मार्गदर्शन घ्या.
  • मैदानाची तयारी सुरुवातीपासूनच सुरु करा.

निष्कर्ष : Conclusion

मित्रांनो शेवटी मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो कि जरी परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा असला तरी तो आपण व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून पूर्ण करू शकतो. तर मग वाट कसली बघता चला लागा तयारीला.
ALL THE BEST………….

नेहमी विचारल्या जाणारी प्रश्ने : (FAQs)

१. बाहेरील राज्यातील रहिवासी विद्यार्थी एम. पी. एस. सी. परीक्षा देऊ शकतात का ?
उत्तर : नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) आहे फक्त तेच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात.

२. पी. एस. आय. (P.S.I.) हे कोणत्या वर्गाचे पद आहे ?
उत्तर : पी. एस. आय. हे वर्ग २ अधिकारी चे पद आहे.

३. पी. एस. आय. ((P.S.I.)) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उत्तर : किमान पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.

४. पी. एस. आय. (P.S.I.) (महिला) करिता उंची किती असावी लागते?
उत्तर : १५७ सेमी.

५. राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) म्हणजे काय ?
उत्तर : राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) म्हणजे असे अधिकारी ज्यांना देशाचे राष्ट्रपती किंवा राज्याचे राज्यपाल यांच्या कडून अधिकृत शिक्का (Stamp) देण्याचे अधिकार प्राप्त असतात.

६. पी. एस. आय. (P.S.I.) हे राजपत्रित अधिकारी पद आहे का ?
उत्तर : नाही.

७. MPSC मार्फत आणखी कोणत्या परीक्षा घेण्यात येतात ?

उत्तर : MPSC मार्फत विविध परीक्षांचे आयोजन केले जाते ज्यामध्ये राज्यसेवा, विक्री कर निरीक्षक, उप जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, तहसीलदार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, सहायक विक्रीकर आयुक्त अशा अनेक पदांसाठी परीक्षा आयोजित केली जाते.

Editorial team

Editorial team

Related Posts

कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती
Information

कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

Kapil Dev Information in Marathi क्रिकेट जगतातील एक दिग्गज नाव म्हणजे कपिल देव. उत्कृष्ट फलंदाजी (Batting) सोबत गोलंदाजी (Bowling) मध्ये...

by Editorial team
February 20, 2021
valentine day
Information

“काय आहेत हे व्हॅलेंटाईन डे जाणून घ्या या लेखाद्वारे.”

Valentine Day in Marathi व्हॅलेंटाईन डे म्हटलं कि सर्वांनाच आपल्या प्रियकराची आठवण येऊन राहवत नाही, तसेच सोबतच बऱ्याच आठवणी हि...

by Editorial team
February 13, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved