मातीचा वापर न करता फुलझाडे आणि फळभाज्या उगविण्याची ही एक वेगळी पध्दत

Neela Panchpor Organic Farm

घराच्या अंगणात आपण फुलांचे काही रोपटे तसेच फळझाडे लावत असतो, त्यापैकी काही भाजीपाल्याचे रोपटे सुध्दा आपण लावतो, पण काय आपण त्या रोपट्यांना विना मातीचा वापर करून लावतो का? नाही आपण आपल्या घराच्या अंगणात एखाद्या कुंडीत किंवा थोडीशी जागा करून रोपट्यांना लावतो. पण पुण्याच्या एका महिलेने फळझाडे आणि फुलांची झाडे उगवली, सोबतच काही भाजीपाला सुध्दा उगवला.

पण मातीचा उपयोग न करता. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की विना मातीचे एखादे रोपटे उगवणे कठीण आहे. हो कठीण आहे पण अशक्य नाही. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत मातीचा उपयोग न करता, महिलेने कश्या प्रकारे या फळझाडांना आणि फुलझाडांना मोठे केले.

पुण्यातील महिला करते अश्याप्रकारे सेंद्रिय शेती तेही मातीचा वापर न करता – Pune Woman grows organic fruits and vagitables at Home 

Nila Renavikar
Nila Renavikar

पुण्याच्या निला रेनावीकर नावाच्या महिलेने या पद्धतीने आपल्या घराच्या गच्चीवर गेल्या १० वर्षांपासून मातीचा वापर न करता फळे आणि भाजीपाला उगवत आहेत. निला यांनी स्वतःच्या राहत्या घराच्या गच्चीवर या पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांच्या घराच्या गच्चीचे क्षेत्रफळ जवळ जवळ ४५० स्क्वेयर फूट आहे. या संपूर्ण जागेत त्यांनी रोपटे फुलझाडे, फळझाडांच संगोपन केले आहे. निला ह्या एक प्रोफेशनल अकाऊंट आहेत, सोबतच त्यांना सेंद्रिय शेतीची आवड आहे, यामुळे त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर एक पूर्णपणे शेतीच बनवली आहे.

निला आपल्या घराच्या गच्चीवर रोपटे उगविण्यासाठी मातीचा वापर करत नसून त्या झाडाच्या सुकलेल्या पानांना एकत्र करतात, स्वयंपाक घरातील काही कचरा तसेच शेणाचे खत एका बकेट मध्ये घेऊन त्या बकेट मध्ये रोपट्याला लावून त्याचे संगोपन करतात, सुकलेल्या पानांमुळे तसेच शेणखतामुळे रोपट्याला पोषक वातावरण मिळते.

त्या बकेट मध्ये निर्माण झालेल्या खतामुळे गांडूळ सुध्दा निर्माण होतात, आणि रोपट्याला मोठे करण्यास मदत करतात. याप्रकारे निला आपल्या घराच्या गच्चीवर सेंद्रिय शेती करतात. या शेतीतून निघालेल्या फळभाज्या त्या आपल्या मित्रांना तसेच परिवारातील काही सदस्यांना सुध्दा खायला देतात. सेंद्रिय शेतीतून निघालेल्या फळभाज्या कोणाला आवडणार नाहीत.

या सर्व गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची आणि थोडीशी मेहनत घ्यायची आवश्यकता आहे. आपण आपल्या घराच्या मोकळ्या जागी या शेतीला करू शकता. असे निला यांचे मत आहे. या सर्व गोष्टींची सुरुवात कोठून झाली?

निला यांनी सुरुवातीला रोपट्यांना उगविण्याविषयी यु ट्यूब वर काही माहिती शोधली, तेव्हा त्यांनी पाहिले की रोपट्यांची योग्य वाढ होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात. रोपट्यांचे संगोपन कश्या प्रकारे चांगले करता येईल? या सर्व गोष्टींवर माहिती शोधल्या नंतर त्यांनी एका प्लास्टिक च्या बादलीत निश्चित माप घेऊन झाडाचा पाला पाचोळा एकत्र केला, त्यात शेणाची भर घातली, आणि स्वयंपाक घरातील केरकचरा त्या बादलीत टाकायला सुरुवात केली.

असे करता करता एका महिन्यात रोपट्यांसाठी खत तयार होतात त्यामध्ये निला यांनी रोपटे लावले. सोबतच अश्याच प्रकारची रोपटे त्यांनी त्यांच्या घराच्या गच्चीवर लावायला सुरुवात केली. या गच्चीवरील शेतीला ते मागील १०११ वर्षांपासून करत आहेत.

या विचारला त्यांनी लोकांपर्यंत पोहचविण्याचे ठरविले आणि फेसबुक ला एक ऑरगॅनिक गाईडिंग नावाचा ग्रुप तयार केला या ग्रुप मध्ये आतापर्यंत २८ हजार लोकांपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत.

तसे पाहिले असता नीला यांनी त्यांच्या राहत्या घराच्या गच्चीवर एक सेंद्रिय शेती बनविली आहे. आणि या शेतीतून त्या घरी भाजीपाला आणि फळं यांचा उपयोग करतात. याचा अनेक फायदा असा आहे की बाजारातुन आणलेल्या भाजीपाल्याला कश्या प्रकारे उगवलेलं असतं हे आपल्याला माहिती नसतं म्हणून त्यावर उपाय शोधत ही पद्धत खूप छान आहे. आज त्यांच्या घराच्या गच्चीच्या गार्डन मध्ये १०० पेक्षा अधिक बादली आहेत ज्यांच्या मध्ये फळझाडे आणि भाजीपाला उगवलेला आहे.

आपणही याप्रकारे आपल्या घराच्या अंगणात जागा असेल तर ही पध्दत अवलंबू शकता जेणेकरून तुम्हाला रसायन मुक्त भाजीपाला तसेच फळांचा आस्वाद घेता येईल.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top