पी.टी.उषा माहिती

PT Usha Mahiti

तिच्या धावण्याच्या वेगाने अनेकांना आश्चर्यचकित केले. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके, पुरस्कार तिने प्राप्त केले. अनेक विक्रम केले, काही मोडीत काढले. त्या आहेत आपल्या भारताची ‘सुवर्णकन्या’ आणि ‘द क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक ऍण्ड फिल्ड’ अशी ओळख असलेल्या धावपटू पी.टी.उषा.

पी.टी.उषा माहिती – P.T. Usha Information in Marathi

नाव पिलाउल्लाकांडी थेक्केपरांबिल उषा
जन्म  27 जून 1964
वडिलांचे नाव  पैतल
आईचे नाव लक्ष्मी
खेळ धावपटू

PT Usha यांचा जन्म 27 जून 1964 रोजी केरळ राज्यातील कोजीकोड जिल्ह्यात पयोल्ली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव पिलावूळकट्टी तेक्केपरम्पील उषा.

पी.टी.उषा या सुरवातीपासूनच धावण्याच्या खेळामध्ये तरबेज होत्या. पण त्यांच्या जीवनाने खरे वळण तेव्हा घेतले, ज्यावेळी 1979 मध्ये त्यांनी राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये भाग घेतला होता, जिथे प्रशिक्षक ओ.एम. नंबियार यांचे त्यांनी लक्ष वेधले नंबियार यांनी त्यांच्यातला वेगवान धावपटू ओळखला. आणि तेव्हापासून नंबियार हे पी.टी.उषांचे प्रशिक्षक बनले. नंबियार हे त्यांचे शेवटपर्यंत प्रशिक्षक राहिले.

PT Usha धावपटू म्हणून त्यांची कारकीर्द – PT Usha Career

पी.टी. उषा ह्या केरळची भारताला आणि भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट आहेत. खेळाला पूर्णपणे वाहून घेतलेल्या त्यांच्या आयुष्यातील जिंकणे एकमेव ध्येय बनले होते.

1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये त्यांचे पदार्पण काही खास नव्हते. एशियाड, 82 पासून नंतरचा त्यांचा काळ चमत्कारिक कामगिरीने भरलेला आहे.

1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय स्तरावर, पी.टी.उषा यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरीची अनेक वेळा पुनरावृत्ती केली आणि 1984 लॉस एंजल्स ऑलिम्पिक गेम्समध्ये चौथे स्थान पटकावले. हा बहुमान मिळवणारी ती भारतातील पहिली महिला धावपटू ठरली.

ऑलिम्पिक स्पर्धेतील उपांत्य फेरी जिंकून भारतीय धावपटू अंतिम शर्यतीत पोहोचू शकतो, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

जकार्ता येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवूनही त्यांनी स्वत:ला सिद्ध केले.

लॉस एंजल्स ऑलिम्पिकमध्येही त्यांच्या शानदार कामगिरीने जगभरातील क्रीडा तज्ज्ञ अचंबित झाले होते.

PT Usha Achievements

1982 च्या नवी दिल्ली एशियाडमध्ये, त्यांनी 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये रौप्य पदके जिंकली, परंतु एका वर्षानंतर पी.टी.उषा यांनी कुवेतमधील आशियाई ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत नवीन आशियाई विक्रमासह 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले.

1983-89 दरम्यान, त्यांनी एटीएफ गेम्समध्ये 13 सुवर्ण जिंकले.

1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीच्या उपांत्य फेरीत त्या पहिल्या होत्या, पण अंतिम फेरीत त्या मागे पडल्या. 1960 मध्ये मिल्खा सिंग यांच्यासोबत घडलेल्या घटनेप्रमाणेच तिसर्‍या क्रमांकासाठी फोटो फिनिश झाले तेव्हा उषाने 1/100 सेकंदाने कांस्यपदक गमावले. (फोटो फिनिश म्हणजे शर्यतीमध्ये जेव्हा अनेक स्पर्धक जवळजवळ एकाच वेळी अंतिम रेषा ओलांडतात. स्पर्धकांपैकी कोणती रेषा आधी ओलांडली हे उघड्या डोळ्यांनी ठरवता येत नसल्यामुळे, अंतिम रेषेवर काढलेला फोटो किंवा व्हिडिओ अधिक अचूक तपासणीसाठी वापरतात.) 400 मीटर अडथळ्यांची उपांत्य फेरी जिंकून कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला आणि पाचवी भारतीय ठरली.

1986 मध्ये सेऊल येथे झालेल्या 10व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पीटी उषा यांनी 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले.

त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व शर्यतींमध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले.

जकार्ता येथे 1985 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी पाच सुवर्णपदके जिंकली. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इतके सुवर्ण जिंकणे हाही एक विक्रम आहे.

1986 मध्ये सेऊल येथे झालेल्या 10व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उषाने ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले.

1976 ते 2000 या तिच्या 24 वर्षांच्या सक्रिय कारकिर्दीत तिने 103 आंतरराष्ट्रीय पदके आणि 1042 राष्ट्रीय पदके जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट ऍथलेटिक कारकिर्दीत, पी.टी. उषा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता प्राप्त करणाऱ्या आहेत.

पी.टी. उषा यांना मिळाले पुरस्कार-  PT Usha Award

पुरस्कार वर्ष
अर्जुनपुरस्कार 1983
पद्मश्री  
सर्वोत्कृष्ट रेल्वे खेळाडूसाठींचा
‘मार्शल टिटो’ पुरस्कार
1984, 1985, 1989, 1990
सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम धावपटू म्हणून ‘आदिदास गोल्डन बूट’ पुरस्कार मिळाला. 1986
केरळ क्रीडा पत्रकार पुरस्कार 1999
सर्वोत्कृष्ट धावपटूसाठीचा ‘जागतिक करंडक’ 1985, 1986

खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा मानाचा असा अर्जुन पुरस्कार त्यानंतर पद्मश्री पुरस्कारांसह पी.टी.उषा यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर पीटी उषा यांनी क्रीडा विश्वात स्वत:चं स्थान निर्माण करून जगात भारताचा वेगळा ठसा उमटवला.
आपल्या प्रत्येकच भारतीयाला त्यांचा अभिमान आहे.

पीटी उषा बद्दल विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About PT Usha

प्रश्न. पी.टी.उषा यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यांत झाला?

उत्तर. केरळ.

प्रश्न. पी.टी.उषा ह्यांना भारताची काय म्हणून ओळखल्या जाते?

उत्तर. ‘सुवर्णकन्या’ म्हणून.

प्रश्न. पी.टी.उषा यांचे प्रशिक्षक कोण होते?

उत्तर. ओ.एम. नंबियार

प्रश्न. पी.टी.उषा यांना भारत सरकारचे कोणते मानाचे पुरस्कार मिळाले आहेत?

उत्तर. अर्जुन प्रस्कार – 1983 आणि पद्मश्री पुरस्कार – 1985

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here