प्रवरा नदीची माहिती

Pravara Nadi

अहमदनगर जिल्ह्यातून वाहत जाणारी सुप्रसिद्ध प्रवरा नदी ही गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी आहे.

प्रवरा नदीची माहिती – Pravara River Information in Marathi

Pravara River Information in Marathi
Pravara River Information in Marathi
नदीचे नाव प्रवरा
नदीचे उगमस्थान सहयाद्री डोंगररांगांमधील रतनगड, जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
नदीची लांबी 200 कि.मी.
उपनद्या मुळा, आढळा, म्हाळुंगी
प्रवरा नदीवरील धरण भंडारदरा, ता. अकोले, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्व उतारावर कळसूबाई शिखराजवळील रतनगड आणि कुलंगगडाच्या दरम्यान सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर प्रवरा नदी उगम पावते.

दक्षिण बाजूला बाळेश्वर डोंगराची रांग आणि उत्तरेस कळसूबाईचे शिखर यांच्याजवळून प्रवरा पूर्ववाहिनी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी आणि नेवासा तालुक्यांना प्रवरेने सुफल-संपन्न बनविले आहे.

प्रवरेच्या काठावर वसलेले नेवासा याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा मराठी रुपांतरीत असलेला ‘भावार्थदीपिका’ हा ग्रंथ लिहिला.

त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा सहवास या ठिकाणाला आणि प्रवरा नदीला लाभला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून वाहत जाणारी सुप्रसिद्ध प्रवरा नदी ही गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी आहे.

प्रवरा नदी उगमापासून गोदावरीला मिळेपर्यंत ती सुमारे दीडशे किलोमीटरपर्यंत वाहत येते. नेवाशाजवळ प्रवरा गोदावरी नदीत विलीन होते. प्रवरा नदीला अदुला, म्हाळुंगी, मारसिंग आणि गोरा या छोट्या नद्या व मुळा या उपनद्या येऊन मिळतात.

प्रवरेच्या खोऱ्याने खूप मोठा भूभाग व्यापला आहे. नदीच्या उगमाजवळच एक सुंदर शिवालय आहे.

Pravara Nadi Information

प्रवरा नदीच्या प्रथम भागात अकोले तालुक्यातील ‘भंडारदरा’ येथे नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या पाण्याचा प्रचंड जलाशय तयार झाला आहे. याच ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे.

भंडारदरा धरणामुळे हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. या धरणामुळे येथील परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे येथे भेट देण्याकरिता अनेक पर्यटक असतात.

धरणातील पाणी नदीमध्ये सोडून ओझर या ठिकाणी एका बंधाऱ्यात अडविले आहे. तेथून ते कालव्यातून संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी आणि नेवासे तालुक्यांतील शेतीस पुरविले जाते.

या नदीच्या पाण्यावर सुमारे तेवीस हजार हेक्टर जमिनीला जलसिंचनाचा लाभ झाला आहे. येथील परिसर प्रवरेच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्याची खऱ्या अर्थाने प्रवरा ही जलदायिनी, वरदायिनी आहे. अहमदनगर जिल्हा म्हणजे ऊस-साखरेचे आगरच. सुमारे सात साखर कारखाने प्रवराकाठीच उभारले गेले आहेत.

प्रवरेच्या काठावर प्राचीन देवालये आहेत. प्रवरा नदीने अकोले, संगमनेर आणि नेवासा शहरांच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे.

अशा रीतीने प्रवरेने आपल्या जलाने अहमदनगर जिल्ह्याला आणि तेथील जनतेला सुख-समृद्धीचे वरदानच दिले आहे.

प्रवरा नदी विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Pravara River

प्रश्न. प्रवरा नदीचा उगम कोठे आहे?

उत्तर: सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्व उतारावर कळसूबाई शिखराजवळील रतनगड, जिल्हा अहमदनगर येथे.

प्रश्न. प्रवरा नदी हि कोणत्या एका प्रमुख नदीची उपनदी आहे?

उत्तर: गोदावरी नदीची.

प्रश्न. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर कोणते मोठे धरण बांधले आहे?

उत्तर: भंडारदरा.

प्रश्न. ज्ञानेश्वरांनी प्रवरेच्या काठी कोठे आणि कोणत्या ग्रंथाची निर्मिती केली?

उत्तर: नेवासा या ठिकाणी ‘भावार्थदीपिका’ ग्रंथाची.

प्रश्न. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर: साखर कारखाने.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top