किराणा दुकानापासून सुरुवात करून आज उभी केली १०० कोटींची कंपनी. ध्येय असावे तर असे

A success story of Ganesh Prasad Agarwal in Marathi

आपण बरेचदा एक प्रेरणादायी वाक्य ऐकले असेल की….

“मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मैं जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नही होता, हौसलो से उड़ान होती है।”

जीवनात आपल्याला पुढे जाण्यासाठी एका मजबूत ध्येयाची गरज असते जे ध्येय आपल्याला नेहमी आठवण देत राहतील की आपल्याला जीवनात काय करायचे आहे. ज्याप्रमाणे अब्दुल कलाम म्हणतात की..

“स्वप्न ते नाहीत की जे आपल्याला रात्री झोपेत येतात तर खरे स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत”

अशीच एक स्टोरी आहे कोलकत्ता पासून २० किलोमीटर दूर गाव असलेल्या एका व्यक्तीची ज्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनाची सुरुवात एका छोट्याश्या किराणा दुकानातून करून आज देशाच्या पूर्वोत्तर भागात आपल्या ब्रँड चा दबदबा निर्माण केला आहे.

 किराणा दुकानापासुन तर १०० कोटीची कंपनी पर्यंतरची स्टोरी – Priya Foods Success Story in Marathi Language

Success story of Ganesh Prasad Agarwal
The success story of Ganesh Prasad Agarwal

ही स्टोरी आहे प्रिया फूड्स प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीला जन्म देणाऱ्या गणेश प्रसाद अग्रवाल यांची. गणेश यांचा जन्म एका छोट्याश्या मध्यमवर्गीय परिवारात झाला. त्यांचे वडील परिवाराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी किराणा दुकान चालवत असत. आणि गणेश यांचे वडील त्यांना नेहमी शिक्षणावर जोर द्यायला सांगत असत. कारण त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती होते त्यांना कळून चुकले होते की जीवनात शिक्षण खूप महत्वाचे आहे जेव्हाही गणेश त्यांना दुकानात मदत करत असत तेव्हा ते त्यांना अभ्यास करायला पाठवून देत असत. आणि त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यायला सांगत असत.

गणेश यांनी त्यांची डिग्री कोलकत्ता सिटी कॉलेज मधून पूर्ण केली, ७ जनांचा परिवार चालविण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांना किराणा दुकानांमध्ये मदत करणे सुरू केले. त्यांनी जेव्हा दुकानात काम केले तेव्हा त्यांना एक गोष्ट कळली की जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाला आणि व्यवसायाला कोणत्याही प्रकारची बाजारात मंदी येत नाही. त्यांनी १४ वर्षापर्यंत हे कार्य सुरू ठेवले. त्यांनंतर त्यांनी एक स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारचे भांडवल उपलब्ध नव्हते.

पण म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग असतोच तसेच काहीतरी त्यांनी स्वतःच्या नावावरील जमीन गिरवी ठेवली. आणि आपल्या मित्रांजवळून काही पैसे उधारीत घेऊन बँकेकडून २५ लाख रुपयांची मदत घेतली. त्यांनंतर त्यांनी या पैशांच्या साहाय्याने स्वतःची बिस्किट बनविण्याची कंपनी सुरू केली. यांची ह्या कंपनी ची सुरुवात २ एकर शेतातून झाली त्यांनी त्या कंपनीत सुरुवातीला ५० कामगार ठेवून घेतले आणि आपल्या कंपनीमध्ये बिस्किटांचे निर्माण करून एक मोठे ब्रँड बनविण्याचे ठरवले.

सुरुवातीला जास्तीत जास्त काम ते स्वतः करत दिवसभर कंपनी मध्ये फिरून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत असतं. कधी कधी तर त्यांची सकाळ ही कंपनी मध्ये व्हायची तरी सुध्दा त्यांना माहिती होत नव्हतं. सुरुवातीचे दिवस खूप कठीण परिस्थितीत काढल्याचे ते सांगतात. आणि त्या वेळेस मार्केट मध्ये आधीच पारले आणि ब्रिटायनिया सारखे मोठं मोठे ब्रँड उपलब्ध होते, मग त्यांना त्यांचे ब्रँड निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. कारण त्यांना एक गोष्ट कळाली होती की त्यांना स्वतःचे ब्रँड बनवायचे आहे तर मार्केटिंग करणे खूप गरजेचं आहे. त्यांनी थोडाही वेळ वाया न घालवता लगेच ५-६ जणांची टीम बनवली आणि घरोघरी जाऊन त्यांच्या प्रॉडक्ट्स ची मार्केटिंग करू लागले. सुरुवातीला त्यांनी नारळाचे आणि ग्लुकोज चे बिस्कीट बनविले आणि काही लोकांना सुरुवातीला कमी पैशांमध्ये हे सर्व बिस्किटे पुरवली गेली. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाने जोर पकडला.

त्यानंतर त्यांनी एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात पाय टाकण्याचे ठरवले. २००५ मध्ये त्यांनी रीलायेबल नावाचे एक नवीन ब्रँड सुरू केले ज्यामध्ये त्यांनी चिप्स, स्नॅक्स, या प्रकारचे प्रोडकट्स उपलब्ध केले. त्यांनंतर २०१२ मध्ये सोया नट्स या कंपनीची सुरुवात केली ज्या कंपनीला त्यांचे दोन मुलं आज सांभाळत आहेत.

आज कोलकत्ता, झारखंड, ओडिशा, या राज्यांमध्ये त्यांच्या ब्रँड चे बिस्किटे मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. आज त्यांची कंपनी १०० करोड ची बनली आहे. ते फक्त मेहनतीने. आज ते या पदावर पोहचले आहेत की नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या युवा वर्गासाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

आशा करतो आपल्याला ही स्टोरी एक प्रेरणा देईल, आणि ही स्टोरी आवडल्यास या स्टोरी ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच प्रेरणादायी स्टोरी आणि लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here