Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिन्धू

PV Sindhu Information in Marathi

2016 च्या खेळांचा महाकुंभ म्हंटले जाणा-या ऑलिंपिक मध्ये भारतीय महिलांचे प्रदर्शन भारतीयांसाठी नक्कीच सन्मानाचे ठरले. त्यांनी कमावलेल्या दोन पदकांनी भारतीयांची मान सन्मानानी उंचावली.

बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिन्धू आणि कूस्तीपटू साक्षी मलीक यांनी अनुक्रमे रौप्य आणि रजत पदक मिळवून भारताची ऑलिंपिकमधली कामगिरी उंचावली.

P. V. Sindhu

बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिन्धू – Badminton Player PV Sindhu Information in Marathi

पुर्सला वेंकटा सिन्धू एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.  2016 ऑलिंपिक खेळात बॅडमिंटन मध्ये तीने रौप्य पदक जिंकून देशाचा मान वाढविला. ऑलिंपिक मध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतिय खेळाडू ठरली.

पी.व्ही सिंधू ने आंतरराष्ट्रीय ख्याती तेव्हां प्राप्त केली जेव्हां ती 17 वर्षांची होती. 2012 मध्ये तिथे जगातील टाॅप 20 वर्ल्ड बैडमिंटन रैंकिंग मिळविली होती. असे करणारी ती पहिली कमी वयाची बॅडमिंटन खेळाडू ठरली.

2013 मध्ये वल्र्ड चॅंपियनशिप मध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला एकल खेळाडू बनली होती. मार्च 2015 मध्ये ती भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री प्राप्त करणारी पहिली कमी वयाची खेळाडू ठरली. जुलै 2013 पासून सिन्धू भारत पेट्रोलियम मध्ये कार्यरत आहे.

भारत पेट्रोलियमच्या हैदराबाद येथील मुख्य कार्यालयात असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. रियो ऑलिंपिक 2016 मध्ये पदक जिंकल्यामुळे तिचे प्रमोशन होउन ती आता डिप्टी स्पोर्ट मॅनेजर झाली आहे.

पी.व्ही. सिन्धू चे बालपण व प्रारंभिक प्रशिक्षण – PV Sindhu’s Childhood and Early Training

पूर्सला वेंकटा सिन्धु चा जन्म एका तेलगु परिवारात झाला. तीचे वडील पी.व्ही रमण आणि आई चे नाव पी. विजया. असे आहे. हे दोन्ही माजी व्हाॅलीबाॅल खेळाडू आहेत.  2000 मध्ये पी.व्ही. रमण यांना त्यांच्या खेळासाठी अर्जुन अवाॅर्ड ने सन्मानीत केले गेले होते.

आई वडील व्यावसायीक व्हाॅलीबाॅल खेळत असतांना पिव्ही सिंधूने आपण बॅडमिंटन खेळण्याचा निर्णय घेतलेला होता. आपल्या यशाचे प्रेरणास्त्रोत ती 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅंपियन पुल्लेला गोपीचंद यांना मानते.

सिन्धू ने वयाच्या 8 व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरूवात केली होती.

पी. व्ही. सिंधूने सर्वप्रथम महबूब अली यांच्या प्रशिक्षणाखाली या खेळाच्या मूलभूत माहिती समजून घेतली. सिकंदराबाद मधील भारतीय रेल्वे इंस्टीटयूट मधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ती पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी प्रशिक्षणासाठी शामील झाली.

सिन्धू आपले प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच द.हिन्दू च्या एका लेखकाने लिहीने होते, पी व्ही स्न्धिू प्रशिक्षणासाठी घरापासून 56 कि मी चा प्रवास करून आपल्या प्रशिक्षणास वेळ देणारी खेळाडू म्हंटले होते. हयावरून तिच्यातील खेळाप्रतिचे समर्पण दिसून येते.

पि.व्ही. सिन्धू बाबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तीची जिद्द् आणि जिंकण्यासाठीची चिकाटी होय. हयामुळेच ती तिच्या प्रतिस्पध्र्याच्या कमजोरीचा फायदा घेत जिंकत असते. अंडर 10 इयर गटात सिन्धूने पाचवा सर्वो ऑल इंडिया रॅंकिंग चॅंपियनशिप तर युगल गटात ही ती अजिंक्य ठरली होती.

त्यानंतर अंडर 13 च्या गटात पाॅंडीचेरी सब ज्युनियर चॅंम्पियनशिप मध्ये सिंगलकप तिने अर्जित केला होता. यासोबतच सिन्धूने कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट 108 आॅल इंडिया रॅंकिंग सब ज्यूनियर नॅशनल आणि पूणे ऑल इंडिया रॅंकिंग सारखे कप आपल्या नावी केले. भारतातील 51 व्या नॅशनल स्कुल गेम्स मध्ये अंडर 14 गटात तीने सुवर्ण पदक जिंकले होते.

पी.व्ही सिन्धु चे करियर – P.V.Sindhu career

आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधूने 2009 मध्ये कोलंबो मध्ये सबज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅंपियनशिप मध्ये रजत पदक जिंकले होते. 2010 ईराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज मध्ये सिन्धू ने एकल गटात रौप्य पदकाची कमाई केली. 2010 मध्ये मेक्सिको मध्ये ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅंपियनशिप मध्ये सिन्धू अंतिम 8 मध्ये पोहोचली होती. 2010 मध्ये उबेर कप साठीची भारतीय टिमची सदस्यही होती.

रिओ ऑलिंपिक 2016:

महिला एकेरीत सिन्धूने हंगेरियन लौरा सरोसी आणि कॅनडाची मिशेल ली सोबत गृप मॅच मध्ये नवव्या स्थानावर राहीली. नंतर प्रीक्वार्टरफायनल मध्ये सिन्धूने तायपेईची ताईतजू यिंग ला 2-0 ने पराजित करून क्वार्टरफायनल मध्ये प्रवेश केला.

पुढे तीने वल्र्ड क्र 2 असलेली चीनची वांग ई हाॅं ला 2-0 सेट ने पराजीत केले व सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला. पुढील सामना तीचा जापानच्या नोजोमी ओकूहरा सोबत होता. तीला ही सिन्धूने 0-2 ने पराजीत केले. आणि आपले फायनल चे स्थान पक्के केले. फायनल मध्ये पोहोचल्यामुळे एक पदक नक्कीच पक्के झाले होते.

याचा भारतीय सदस्यांमध्ये फार आनंद होता. प्रतिव्दंदी खेळाडू वर्ल्ड नं. 1 स्पॅनिश खेळाडू , कॅरोलिना मरीन होती. 83 मिनीटांपर्यंत हा सामना चालला. अत्यंत चढाओढीची लढत पाहण्यास मिळाली. सिंधूने जागतिक 1 क्रमांकाच्या खेळाडूसमोर चांगल्या प्रतिचा खेळ दाखविला. पहिला सेट सिन्धू ने जिंकल्यानंतर मरीनने जबरदस्त वापसी करीत दुसरा सेट जिंकला.

शेवटच्या 3 सेटपर्यंत ही मॅच पोहोचली होती. शेवटी मरिन सिंधूवर वरचढ ठरली. सिंधू हरली परंतू तिने सुंदर खेळ दाखवत सर्वांची मनं जिंकली. भारतात तर उत्सवच साजरा केला गेला. भारतीय बॅडमिंटन खेळाच्या इतिहासात पहिल्यांदा सिल्व्हर पदक जिंकणारी सिंधू पहिली खेळाडू ठरली.

पी व्ही सिंधू चे अवाॅर्ड आणि सन्मान – PV Sindhu Award

  • पद्मश्री – भारताचा चैथा सर्वश्रेष्ठ सन्मान (2015)
  • अर्जुन अवाॅर्ड (2013)
  • छक्ज्ट व्दारा 2014 मध्ये इंडियन ऑफ दी इयर सन्मान.
  • 2015 मध्ये मकाउ ओपन बॅडमिंटन चॅंपियनशिप जिंकल्याबद्दल भारतिय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे 10 लाख रोख व प्रशस्ती पत्रक.
  • 2016 मध्ये मलेशिया मास्टर्स जिंकून परत बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया ने 5 लाख रोख व प्रशस्ती पत्रक
  • 2016 रिओ ऑलिंपिक मध्ये शानदार कामगिरीबद्दल तेलंगाणा सरकारने 5 करोड चे रोख बक्षिस आणि 10 एकर जमीन पुरस्कार स्वरूप् दिली.
  • दिल्ली सरकार तर्फे 2 करोड चे रोख बक्षीस
  • भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन व्दारा 75 लाख रोख आणि याच विभागात प्रमोशन ने डिप्टी स्पोर्ट मॅनेजर पद दिले.
  • हरियाणा सरकार तर्फे 50 लाख रोख बक्षिस.
  • मध्यप्रदेश सरकार तर्फे 50 लाख रोख बक्षिस.
  • मिनिस्ट्रिी ऑफ युथ अफेअर्स अंड स्पोर्ट कडून 50 लाख रोख पुरस्कार.
  • बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व्दारा 50 लाख रोख बक्षिस.
  • छत्प् बिजनेसमॅन मकट्टू सेबेस्टियन व्दारा 50 लाख रोख बक्षिस.
  • इंडियन ऑलिंपिक असोसिएशन व्दारा 30 लाख रोख बक्षिस.
  • ऑल इंडिया फुटबाॅल फेडरेशन व्दारा 5 लाख रोख बक्षिस.
  • हैदराबाद डिस्ट्रक्ट बॅडमिंटन असोसिएशन व्दारा एक कार बक्षिस.
  • अभिनेता सलमान खान तर्फे 1.10 लाख रोख बक्षिस.

फायनल मॅच नंतर सिंधू म्हणाली . . . मला गर्व आहे की मी ऑलिंपिक मध्ये पदक जिंकू शकले. हो सुवर्ण यापेक्षा अधिक महत्वाचे होते पण मी माझे सर्वोत्तम दिले याचे समाधान आहे. सुरूवातीला खेळतांना आक्रमक खेळले परंतू मरीन एक उत्तम खेळाडू आहे.

पी व्ही सिन्धू च्या असाधारण खेळामुळेच ऑलिंपिक मध्ये भारतास आपली मान उंच ठेवता आली. पीव्ही सिंधू च्या खेळामुळे तीने संपुर्ण भारतियांची मनं जिंकली. भारतात जवळपास 80: लोकांनी तो खेळ चालू असतांना बघितला होता जो एक रेकाॅर्ड मानला जातो. पी व्ही सिंधूची उपलब्धी भारताचे नाव उंचावणारी ठरली. सर्व भारतियांना तिच्या उपलब्धीचा अभिमान वाटतो.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ पी.व्ही. सिन्धू बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “पी.व्ही. सिन्धू बॅडमिंटन खेळाडू – Badminton Player PV Sindhu तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट:  PV Sindhu – पी.व्ही सिन्धू यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Previous Post

साक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography

Next Post

बराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Next Post
Barack Obama Speech

बराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech

Eiffel Tower

एफिल टॉवर चा इतिहास | Eiffel Tower History Information in Marathi

Besan Sev Recipe

बेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe

Birsa Munda

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi

Chicken korma

चिकन कोरमा बनविण्याची विधी | Chicken Korma Recipe In Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved