Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

महान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय

Pythagoras Chi Mahiti Marathi

पायथागोरस हे एक महान गणितज्ञ असण्याबरोबरच एक महान तत्वज्ञानी देखील होते.

ते विशेष करून ओळखले जातात,  त्यांनी केल्या असलेल्या गणित क्षेत्रातील प्रमेयांच्या शोधामुळे. पूर्ण विश्वातच त्यांची प्रसिद्धी पसरलेली आहे.

पायथागोरस यांची गणितात असणारी प्रमेय गणित शिकणाऱ्या सर्वच विध्यार्थ्यानी वाचली पाहिजेत.

पायथागोरस यांच्या बाबतीत आश्चर्य कारक बाब अशी आहे की, त्यांनी   गणिताची सर्व मांडणी कागदावर न लिहिता तोंडीच पाठ केली होती.

पायथागोरस एक अष्टपैलू प्रतिभावंत व्यक्तिमत्व असणारे महान व्यक्ती होते.

त्यांच अनुकरण करण्याचा प्रयत्न प्लेटो, अरस्तु, सुकरात आणि जवळजवळ संपूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदर राजाने देखील केलं होतं.

चला तर जाणून घेऊया, गणितीय जगतातील महान व्यक्तिमत्व असणारे गणितज्ञ पायथागोरस यांच्या बद्दल:-

Contents show
1 महान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय – Pythagoras Information in Marathi
1.1 पायथागोरस यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन- Pythagoras Information in Marathi
1.1.1 अश्या प्रकारे वाढली गणित आणि अंतरिक्ष विज्ञान क्षेत्राप्रती पायथागोरस यांची रुची- Pythagoras History
1.1.2 Pythagoras Chi Mahiti
1.1.3 पायथागोरस यांनी धर्म आणि तत्त्वज्ञानासबंधित शाळा आणि धार्मिक स्थळे सुरु केले – Paythagoras School
1.1.4 पायथागोरस यांचे धार्मिक केंद्रासबंधित असलेले कठोर नियम:-
1.1.5 महान गणितज्ञ पायथागोरस यांचा विवाह, मुले आणि त्यांचे वयक्तिक जीवन- Pythagoras Marriage, Children And Personal Life
1.1.6 “पायथागोरस प्रमेयामुळे” मिळालेली प्रसिद्धी – Pythagoras Theorem
1.1.7 आयुष्याच्या अंतिम क्षणाला सहन करावी लागली होती कडवी निंदा-
1.1.8 महान गणितज्ञ पायथागोरस यांचे निधन – Pythagoras Death

Pythagoras

महान गणितज्ञ पायथागोरस यांचा जीवन परिचय – Pythagoras Information in Marathi

पूर्ण नाव (Name)पायथागोरस(Pythagoras)
जन्म (Birthday)५७१ BC, सामोस, यूनान
वडिल (Father Name)मनेसार्चस(Mnesarchus)
आई (Mother Name)पयिथिअस (Pythasis)
पत्नी (Wife Name)थेनो (Theano)
मुले  (Children)मयिया, डामो, टेलिगास आणि अरिग्रोत
मृत्यू (Death) ५७० ईसा पूर्व, पेतापोर्तम

पायथागोरस यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन- Pythagoras Information in Marathi

गणितीय क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान देणारे महान गणितज्ञ पायथागोरस यांचा जन्म जवळपास,  ईसा पूर्व ५७० मध्ये एजियनमधील एका युनानी द्वीप समुहात सामोसच्या एका व्यापारी कुटुंबात झाला होता.

पायथागोरस यांची आई पयिथिअस,  एक घरगुती महिला होत्या. परंतु त्यांचे वडिल हे एक व्यापारी होते. पायथागोरस लहानपणापासूनच आपल्या वडीलांनसोबत व्यापार करण्यासाठी बाहेर गावी जात असत.

आपल्या वडीलांनसोबत व्यापार करण्यासाठी बाहेर गावी जात असल्याच्या दरम्यान त्यांनी फक्त मिस्त्र च्या काही पुजारीऱ्यान सोबत वेळ घालवत असतं. याशिवाय त्यांनी सिरीया आणि इटली येथील प्रसिध्द विद्वानांकडून शिक्षा ग्रहण केली होती.

पायथागोरस आपल्या वडिलांन सोबत व्यापार करण्याकरता वेगवेगळया देशात  प्रवास करीत असतं. या प्रवासादरम्यान ते त्या देशातील वेगवेगळया विद्वानांनकडून शिक्षा ग्रहण करत असतं. याचदरम्यान त्यांनी भूमितीच्या सिद्धांताचे अध्ययन सुद्धा केलं होतं.

पायथागोरस यांनी सिरियातील विद्वानांनकडून महत्वपूर्ण विषयांचे शिक्षण घेण्या व्यतिरिक्त त्यांनी शल्डिया येथील विद्वानांना आपले गुरूसुद्धा बनवलं..

पायथागोरस यांनी त्यांच्याकडून महत्वपूर्ण विषयांवर ज्ञान प्राप्त केले.

पायथागोरस यांच्या बद्दल महत्वाचं असं की, त्यांना सुरवातीपासूनच लिहिण्या वाचण्याची खूप आवड होती.

त्यामुळे ते नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतं. पायथागोरस यांनी तत्वज्ञानाचे शिक्षण पहिले गुरु फेरेसायड यांच्याकडून घेतलं होतं.

अश्या प्रकारे वाढली गणित आणि अंतरिक्ष विज्ञान क्षेत्राप्रती पायथागोरस यांची रुची- Pythagoras History

पायथागोरस यांनी त्यांच्या जीवनात वडीलांन सोबत अनेक देशांचा प्रवास केला होता. त्यांनी केलेल्या प्रवासामधील सर्वात अविस्मयकारक  प्रवस हा मिस्त्र देशाचा होता.

या देशाच्या प्रवासादरम्यान ते गणित आणि विज्ञान क्षेत्रातील महान विद्वान ‘थेल्स’  यांना भेटले होते.

‘थेल्स’ यांना भेटल्यानंतरच पायथागोरसांच्या मनात गणित आणि विज्ञान (Meteorology) विषय शिकण्याची गोडी निर्माण झाली.

पायथागोरस ज्यावेळेस महान विद्वान ‘थेल्स’ यांना भेटले होते, त्यावेळी ‘थेल्स’ खूप थकलेले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या घटकेत होते.

‘थेल्स’ यांची प्रकृती इतकीही बरी नव्हती की, ते पायथागोरस यांना आपला शिष्य बनवून त्यांची गणित आणि विज्ञान प्रती असलेली भूक भगवू शकतील.

पायथागोरस यांना गणित आनी विज्ञान विषयांची खूपच आवड असल्याने त्यांनी या विषया प्रती ज्ञान मिळवायचं ठरवलं.

Pythagoras Chi Mahiti

यानंतर आपली ज्ञान क्षमता क्षमविण्याकरता, पायथागोरस यांनी,महान विद्वान ‘थेल्स’ यांचे सर्वात बुद्धिमान आणि गणित विषयात विद्वान असणारे शिष्य “अनेक्जिमेंडर” यांच्याकडून गणित विषयाचे ज्ञान प्राप्त केलं.

“अनेक्जिमेंडर” यांच्या कडून गणित विषयांचे ज्ञान घेत असतांनाच त्यांनी त्या मिस्त्र देशात भूमिती आणि अंतरिक्ष विषयाचे प्रमेय विकसित केले होते.

या विषयांचे प्रमेय विकसित करत असतांनाच त्यांनी गणित विषयातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रमुख प्रमेयांपैकी एक असणारा पायथागोरसचा प्रमेयाच शोध लावला.

भूमिती या विषयात असणाऱ्या ‘प्रमयांचे’  मूळ उद्गाते म्हणून पायथागोरस यांणाच त्याचे श्रेय दिल जाते.

गणितीय जगतातील महान आविष्कारक पायथागोरस यांनी हे सुद्धा सिद्ध केलं होत की, “त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही,  समान असणाऱ्या दोन कोना इतकी असते.”

जवळ जवळ ईसा पूर्व ५३५ च्या दरम्यान पायथागोरस मिस्त्र देशात गेले होते. तेथील हेलिपोलिस या ठिकाणावरील एका पुजाऱ्याकडून त्यांनी खूप वर्षापर्यंत शिक्षा ग्रहण केली.

शिक्षा ग्रहण करत असतांना त्यांनी त्याठिकाणी संगीत आणि गणित विषयात संबंध प्रस्तापीत करण्याचा प्रयत्न केला होता.

पायथागोरस यांनी त्यांच्या वयाच्या ५० वर्षांपर्यंत गणित आणि विज्ञान विषयातील ज्ञान प्राप्त केलं होतं.

वयाच्या ५० वर्ष पूर्ण होईपर्यंत गणित आणि विज्ञान विषयातील ज्ञान घेतल्यानंतर त्यांनी आपल्याजवळील असणाऱ्या ज्ञानाचा विस्तार करण्याचं ठरवलं.

त्यासाठी आवश्यकता होती ती एका शाळेची. शाळेच्या माध्यमातून त्यांना आपले ज्ञान लोकांनमध्ये विस्तारने शक्य होतं. याकरता शाळा सुरुकरून आपले ज्ञान लोकांमध्ये वाटू असं त्यांना वाटतं होतं.

परंतु त्यावेळेला सामोस प्रांतात क्रुर शासकाकडून होत असलेल्या अत्याचाराला पायथागोरस खूप त्रासून गेले होते. याकरता त्यांनी सामोस प्रांत सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ते इटली मध्ये जाऊन स्थायिक झाले होते.

पायथागोरस यांनी धर्म आणि तत्त्वज्ञानासबंधित शाळा आणि धार्मिक स्थळे सुरु केले – Paythagoras School

महान गणितज्ञ पायथागोरस यांनी इटलीतील ‘क्रोटोन’ नावाच्या ठिकाणी “सेमिसर्कल” नावची एक साळा सुरु केली. शाळा सुरु करण्याच्या काळापर्यंत पायथागोरस यांनी गणित विषयाचे एक महान विद्वान म्हणून ख्याती मिळवली होती.

अश्या महान विद्वानांच्या शाळेत भरपूर विध्यार्थ्यानी प्रवेश घेतला होता. या शाळेत शिक्षणासोबतच संगीताचे ज्ञान देखील विध्यार्थ्यांना दिले जात असे.

पायथागोरस यांच्या या शाळेत मुख्यत: संगीत, भूमिती, अंकगणित आणि विज्ञान यासोबतच युनानी तत्त्वज्ञानाचे ज्ञान देखील दिलं जात होतं.

पायथागोरस यांनी त्याठिकाणी गुप्त धार्मिक पंथाची स्थापना करून तेथील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सुधार करण्याचा भरपूर प्रयत्न केला.

पायथागोरस लोकांना नेहमीच शिस्तबद्ध, सद्गुणी आणि साधे जीवन जगण्याकरता प्रोत्साहीत करत असतं.

पायथागोरस यांच्या विचारांशी प्रेरित होऊन अनेक लोकांनी त्यांच्या  धार्मिक पंथामध्ये समावेश केला आणि ते लोक त्यांचे अनुयायी बनले.

पायथागोरसांच्या अनुयायांचा गट “पॅथोगोरियन्स” म्हणून ओळखला जात असे.  त्याचप्रमाणे केंद्रात जी माणसे कामे करत असतं त्यांना “मेथमेत्कोई” म्हणून संबोधले जात असे.

पायथागोरस यांचे धार्मिक केंद्रासबंधित असलेले कठोर नियम:-

पायथागोरस यांचे धार्मिक केंद्रासंबंधित खूप कठीण नियम होते. त्या  नियमांचे पालन त्यांच्या सर्व अनुयायांना करावे लागत असे.

या धार्मिक स्थळांच्या आत राहणाऱ्या सर्व लोकांना फक्त शाकाहारी जेवणच करण्याचीच अनुमती होती.

त्याचप्रमाणे पायथागोरसांच्या अनुयायांची कुठल्याच प्रकारची खासगी संपत्ती नव्हती.  शिवाय या केंद्राच्या आजूबाजूला राहणारे विद्यार्थ्यांना,  जे फक्त शिक्षणाकरिताच त्या केंद्रात येत असतं, त्यांना आपल्या घरी जेवण करण्याची परवानगी होती. अश्या विद्यार्थ्यांना “अकउस्मेतिकोई” म्हणून संबोधल जात होतं.

धार्मिक पंथातील भेदभावामुळे दोन वेगवेगळे गट तयार झाले.

महान गणितज्ञ पायथागोरस यांनी आपल्या धार्मिक मठामध्ये शांती कायम रहावी, याकरता त्यांनी ‘एकेमैथिया’ नियम लागू केला.

तसचं या नियमाच पालन जो कोणी करणार नाही त्याला मरणाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली होती.

पायथागोरसांच्या धार्मिक पंथाबद्दल इतिहासात अश्या स्वरुपात व्याख्या केली आहे की, त्यांच्या धार्मिक पंथात अनुयायांन सोबत भेदभाव केला जात असे.

मठामध्ये जे विदयार्थी फक्त अभ्यासाकरिता येत असतं, त्यांना पायथागोरसांना पाहण्याची अनुमती नव्हती. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना पंथात समाविष्ट असणाऱ्या गुप्त रह्स्यान बद्दल सांगितल जात नसे.

धार्मिक पंथात होत असलेल्या या भेदभावांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष निर्माण होऊ लागला. परिणामी मठाच्या आत राहणारे आणि मठाच्या बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांन मध्ये दोन वेगवेगळे गट तयार झाले.

महान गणितज्ञ पायथागोरस यांचा विवाह, मुले आणि त्यांचे वयक्तिक जीवन- Pythagoras Marriage, Children And Personal Life

महान गणितज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळविणाऱ्या पायथागोरसांनी आपला विवाह “थेनो” नावाच्या एका तत्वज्ञानी महिले सोबत केला होता.

“थेनो” या एक तत्वज्ञानी महिला होत्या, त्यांनी गणित, चिकित्सा विज्ञान, बाल विज्ञान आणि भौतिक विज्ञान इत्यादी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.

पायथागोरस आणि “थेनो” या तत्वज्ञानी जोडप्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता.

पायथागोरसांना असणाऱ्या मुलांच्या संख्ये संबंधी इतिहासकारांचे वेगवेगळी मत आहेत.

काही इतिहास कारांनी अस सुद्धा लिहिलं आहे की, ज्यावेळी पायथागोरस यांचा  धार्मिक पंथ दोन वेगवेगळया गटात विभागला गेला होता, त्यावेळेस त्यातील एका गटाचे नेतुत्व त्यांची पत्नी “थेनो” आणि त्यांच्या मुलीनी केलं होतं.

“पायथागोरस प्रमेयामुळे” मिळालेली प्रसिद्धी – Pythagoras Theorem

पायथागोरस, हे मुख्यत: त्यांच्या “पायथागोरस प्रमेय” करता पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.  त्यांच्या पायथागोरसाच्या प्रमेयावरून सिद्ध होते की,

“कोणत्याही समानकोण असणाऱ्या त्रिकोणाच्या कर्णाच्या वर्गाची बेरीज ही, उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतकी असते”.

पायथागोरस यांच्या या प्रमेय बद्दल असं पण म्हटलं जाते की, या प्रमेयाला खूप वर्षांपूर्वीच सर्वात पहिले “बेबिलोनियंस” यांच्या द्वारे सिद्ध करण्यात आलं  आहे. याशिवाय पायथागोरस यांनी संख्यांचे सिद्धांत सुद्धा स्पष्ट केले आहेत.

पायथागोरस यांचे संख्यांच्या क्रमांनबद्दल असं मत होतं की, आपलं जीवन हे संख्यांच्या कर्मांवर आधारित आहे.

आयुष्याच्या अंतिम क्षणाला सहन करावी लागली होती कडवी निंदा-

पायथागोरस यांनी त्यांच्या धार्मिक पंथा करता बनविलेल्या कठोर नियमांची मोठ्या प्रमाणात निंदा करण्यात आली होती.

लोकांचे पुराणमतवादी विचार आणि अंधविश्वासांकडे असणारा त्यांचा जास्त कल,  यामुळे पायथागोरस यांना जीवनाच्या अंतिम क्षणी खूप संकटांना सामोरे जावे लागले.

समाजातील एका वर्गाने त्याचा खूप द्वेष करायला सुरुवात केली होती. परिणामी त्यांना बऱ्याचदा अपमानित व्हावं लागलं.

तसचं त्यांना देशातून बाहेर कडून देण्यात आलं होतं.

महान गणितज्ञ पायथागोरस यांचे निधन – Pythagoras Death

पायथागोरस यांचे निधन त्यांच्या वयाच्या जवळ जवळ ८५ ते ९० वर्षाचे असतांना इटली येथील मेटापोंटम या ठिकाणी झाले होते. असे असले तरी त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा खुलासा नाही होऊ शकला.

जगातील महान गणितज्ञ पायथागोरस यांच्या मृत्यूच्या काही वर्षानंतर रोमच्या सिनेट(सभागृह) मध्ये त्यांची एक मोठी मूर्ती बनवण्यात आली होती.

पायथागोरस यांना जगातील सर्वश्रेष्ठ आणि महान विद्वान म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं.

पायथागोरस यांना गणिताच्या भूमिती विषयातील “पाइथागोरस प्रमेय” सिद्ध केला असल्याने आज सुद्धा जगात एक महान गणितज्ञ म्हणून ओळखलं जाते.

त्याचप्रमाणे आज सुद्धा गणित विषय शिकणारे प्रत्येक विदयार्थी पायथागोरस यांनी सिद्ध केलेला “पायथागोरस प्रमेय” चा अभ्यास करत असतात.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ पायथागोरस बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा पायथागोरस एक महान वैज्ञानिक  – Pythagoras Biography तुम्हाला आवडला असेलच….

जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook Page लाइक करायला सुधा.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved