हे बॉलीवूड मधील सुपर स्टार एके काळी होते रेडियो जॉकी

Famous RJ in India

रेडियो जॉकी म्हटलं कि प्रत्येकालाच माहित आहे चार भिंतींच्या आतमध्ये बसून आपल्या समोर हजारो लाखो लोक आहेत असे समजून संभाषण करणे आणि हि कला प्रत्येकाला अवगत नसते, कठीण असते ना तासंतास फक्त आवाजाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणे? आणि ज्यांना हि कला अवगत असते त्यांना रेडियो जॉकी म्हटल्या जात.

आणि असेच काही रेडियो जॉकी जे त्यांच्या कलागुणांवर आज बॉलीवूड मध्ये सुपर स्टार म्हणून ओळखल्या जातात. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही असे बॉलीवूड सुपर स्टार जे एके काळी रेडियो मध्ये रेडियो जॉकी च्या कामाला होते.

तर चला जाणून घेऊया त्यांच्या विषयी…

रेडियो जॉकी असणारे काही व्यक्तीत्व मराठीमध्ये – Famous Radio Jockey in India in Marathi 

Famous Radio Jockey in India

रेडियो जॉकी असणारे काही व्यक्तीत्व – Radio Jockey Personality In Bollywood

१) आयुष्मान खुराना – Ayushmann Khurrana

आयुष्मान खुराना यांचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ साली पंजाब च्या चंडीगढ येथे झाला. आयुष्मान यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासूनच V  चॅनेल च्या रियालीटी शो मधून आपल्या करिअर ची सुरुवात केली. त्यांनतर रोडीस नावाच्या रियालीटी शो च्या दुसऱ्या सीजन मध्ये त्यांनी बाजी मारली. पण तेव्हा कुणालाही त्यांच्या विषयी एवढी माहिती नव्हती.

तसेच त्यांचा पहिला चित्रपट विक्की डोनरला यश मिळण्या अगोदर आयुष्मान ९२.७ बिग FM  रेडियो मध्ये रेडियो जॉकी चे काम करत होते. विकी डोनर नंतर त्यांना लोकांची पसंती आली त्यांनतर त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवले आणि आज ते बॉलीवूड मधील फिल्मफेयर पुरस्कार विजेत्यांपैकी एक बॉलीवूड सुपर स्टार आहेत.

२) मालिष्का मेंडोसा – Malishka Mendosa

तुम्ही जर रेड FM ९३.५ ऐकत असाल तर तुम्ही या नावाला ओळखलच असेल, मलिष्का ने सुद्धा बॉलीवूड मध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर रेड FM ९३.५ मध्ये रेडियो जॉकी म्हणून काम केले आहे, तसेच त्यांनी “लगे रहो मुन्ना भाई” साठी विद्या बालन यांना रेडियो जॉकी चे त्यांनीच प्रशिक्षण दिले होते.

मलिष्का ने “तुम्हारी सुल्लू” या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड मध्ये प्रवेश केला. या चित्रपटामध्ये त्या एक सिनियर रेडियो जॉकी म्हणून आपली भूमिका साकारताना दिसतात.

३) स्मृति कालरा –  Smiriti Kalra 

स्म्रिती यांनी त्यांच्या करियर ची सुरुवात ९५.५ रेड FM वर RJ म्हणून केली होती. जेव्हा त्या रेडियो जॉकी होत्या तेव्हा त्यांचे मॉडेल बनण्याचे स्वप्न होते.त्यांनंतर पुढे पाउल घेत त्यांनी टीवी सिरीयल मध्ये काम करत आपली नवीन ओळख निर्माण केली. “दिल संभल जा जरा”  “प्यार तुने क्या किया” अश्या सिरीयल मधून त्यांनी ॲक्टिंग ची सुरुवात केली.आज त्यांनी ॲक्टिंग च्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

४) सलील आचार्य – Salil Acharya

सलील आचार्य यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९८० साली दिल्लीला झाला. त्यांनी सुद्धा त्यांच्या करियर ची सुरुवात हि रेडियो सिटी ९१.१ मध्ये रेडियो जॉकी म्हणून केली होती. तसेच सलील यांनी मोहित सुरी यांच्या २००७ मध्ये आलेल्या आवारापन चित्रपटातून बॉलीवूड मध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर आशिकी २,  ३ AM अश्या वेगवेगळ्या चित्रपटात त्यांनी त्यांची भूमिका निभावली.

५) मनीष पौल – Manish Paul

मनीष पौल यांचा जन्म ३ ऑगस्ट १९८१ साली दिल्लीला झाला. कसकाय मुंबई या शो ला रेडियो च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम मनीष पौल करत होते, म्हणजेच सुरुवातीला ते ९१.१ रेडियो स्टेशन वर रेडियो जॉकी म्हणून काम केले आहे.

त्यांनतर त्यांनी “तीस मार खान” आणि “मिक्की वायरस” या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बरेचशा शो ची अँकरिंग करताना आपण त्यांना पाहले आहे. तर ह्या होत्या काही हस्ती ज्यांच्या करियर ची सुरुवात रेडियो जॉकी म्हणून झालेली आहे, पण आज ते बॉलीवूड मध्ये खूप चांगले कलाकार म्हणून कार्य करत आहेत.

आशा करतो आपल्याला आमचा आजचा लेख आवडला असेल आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here