आश्चर्यदायक गोष्ट या रेल्वे स्टेशन ला नावच नाही! जाणून आपण होणार थक्क

Unique Railway Station

भारत देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपल्या देशात वाहतुकीसाठी रेल्वे चा मोठा वाटा आहे, मग ते मालाची वाहतूक असो, की लोकांची. रेल्वेचे नाव सर्वात आधी येते. आपल्याला माहिती असेल की देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशन ची ओळख म्हणून त्या स्टेशन ला एक नाव दिलेले असते, पण आपल्याच देशात असे एक स्टेशन आहे ज्याला कोणतेही नाव नाही आहे.

आपल्या संपूर्ण देशात ८००० पेक्षा जास्त रेल्वे स्थानक आहेत. या सर्व स्थानकांपैकी फक्त एकच स्टेशन असे आहे ज्याला कोणतेही नाव नाही आहे. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की आपल्या देशातील अश्या या स्टेशन विषयी ज्या स्टेशन ला नावच नाही आहे तर चला पाहूया असेही एक स्टेशन विना नावाचे.

भारतात ह्या रेल्वे स्टेशन ला नावच नाही – Railway Station without Name

Railway Station without Name
Railway Station without Name

आपल्या देशात पश्चिम बंगाल मध्ये असे एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचे कोणतेही नाव नाही आहे, ह्या स्टेशन चा इतिहास थोडासा विचित्रच आहे, हे स्टेशन वर्धमान स्टेशन पासून ३० – ३५ किलोमीटर अंतरावर आहे. ह्या स्टेशन ला कोणत्याही नावाची ओळख नाही. आपण बरेचदा एखाद्या स्टेशन ला ओळखण्यासाठी की हे स्टेशन कोणते आहे, यासाठी आपण स्टेशन च्या पिवळ्या पाटीवर पाहतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की ते कोणते स्टेशन आहे. पण या स्टेशन वर असे कोणतेही होर्डिंग नाही आहे.

हे नाव नसलेले स्टेशन पश्चिम बंगाल च्या बांकुरा-मैसग्राम या रेल्वे लाईन वर आढळते. हे स्टेशन रैना आणि रैनागढ या दोन गावांच्या मध्ये आहे. ह्या स्टेशन ला रैनागढ च्या नावाने ओळखले जाते. परंतु तेथील स्थानिक लोकांच्या मते या स्टेशन ची निर्मिती रेना गावच्या जमिनीवर झालेली आहे. आणि त्या स्टेशन ला दुसऱ्या गावाचे नाव दिल्याने तेथील नागरिक खुश नव्हते या गोष्टींमुळे त्या दोन गावाच्या लोकांमध्ये विवाद निर्माण झाला होता, आणि लोक भांडणावर आले होते.

याची माहिती जेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. तेव्हा या स्टेशन ला कोणत्याही नावाने संबोधले जाऊ नये असे आदेश देण्यात आले आणि त्यामुळे या स्टेशन ला कोणतेही नाव दिल्या गेले नाही, तेथील स्थानकावर कोणत्याही नावाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. या सर्व नावांना या स्थानकावरून रेल्वे बोर्डाने मिटवून टाकले आहे, कारण यामुळे दोन गावांमध्ये वाद निर्माण झालेला होता. या स्थानकावरून स्थानकाचे नाव तर मिटवले आहेत पण येथे येणाऱ्या नवीन प्रवाशांना या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि त्यांना या गोष्टीचा त्रास सुध्दा सहन करावा लागतो. पण अजूनही या स्टेशन च्या जुन्या नावावरून या स्टेशन ला जाण्यासाठी तिकीट मिळते. रैनागढ या नावाने अजूनही तिकीट मिळते. आपणही कधी पश्चिम बंगाल ला गेलात तर या स्टेशन ला अवश्य भेट द्या. तर हे होते अजब गजब भारतातील एक अनोखे स्टेशन ज्याला नावच नाही आहे.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच आख्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top