संतोषी मातेची आरती

Santoshi Mata Aarti Marathi

मित्रांनो, आपल्या धार्मिक पौराणिक धर्म ग्रंथांमध्ये अनेक देवी देवतांचा उल्लेख केला गेला असला तरी, काही देवता असे सुद्धा आहे त्यांचा उल्लेख कुठ्ल्यास पोथी पुराणात केला गेला नाही आहे. तरी सुद्धा आपण त्यांची पूजा अर्चना करीत असतो.त्यांपैकी एक म्हणजे संतोषी माता होत.

संतोषी मातेचा उल्लेख जरी ग्रंथांमध्ये केला गेला नसला तरी, सुद्धा भाविक त्यांची पूजा मोठ्या उत्साहाने करीत असतात. तसचं, महिला दर शुक्रवारी संतोषी मातेसाठी व्रत देखील करतात. शुक्रवार हा देवीच्या पूजेसाठी विशेष महत्वाचा असल्याने मंदिरात या दिवशी भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळते.

लोकांची संतोषी माता यांच्या चरणी श्रद्धा आहे की, देवीची भक्ती केल्याने संतोषी मातेचा आशीर्वाद सतत आपल्या सोबत राहतो. तसचं, देवी आपली सर्व मनोकामना पूर्ण करतात. नवसाला पावणारी देवी असल्याने भाविक दर शुक्रवारी मंदिरात दर्शनाकरिता येत असतात. तसचं काही भाविक महिला देवीची खना नारळाने ओटी देखील भरतात.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून संतोषी माता यांची आरती करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या आरतीचे लिखाण करणार असून त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

संतोषी मातेची आरती – Santoshi Mata Aarti Marathi

Santoshi Mata Aarti
Santoshi Mata Aarti

जय देवी श्री देवी संतोषी माते।

वंदन भावे माझे तव पदकमलाते।।धृ।।

श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी।

पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी।।

जननी विश्वाची तू जीवन चिच्छक्ती।

शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती।।१।।

गुरूवारी श्रध्देने उपास तव करिती।आंबट कोणी काही अन्न न सेवीती।।

गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती।

मंगल व्हावे म्हणूनी कथा श्रवण करिती।।२।।

जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती।

अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थती।।

त्याच्या हाकेला तू धावूनिया येसी ।

संतती वैभव कीर्ती धनदौलत देसी।।३।।

विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे।

भवभय हरूनी आम्हा सदैव रक्षावे।।

मनीची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी।

म्हणूनी मिलिंद माधव आरती ओवाळी।।४।।

संतोषी माता यांच्याबद्दल दंत कथा –  Santoshi Mata Story

मित्रांनो, संतोषी माता यांच्या नावाचा उल्लेख फारश्या ग्रंथांमध्ये दिसून येत नसला तरी, देवीच्या उत्पत्तीबाबत दंतकथा प्रचलित आहे. संतोषी माता यांच्या जन्माबद्दल असे सांगण्यात येते की, संतोषी माता या भगवान श्री गणेश आणि माता रिद्धीसिद्धी यांच्या कन्या आहेत. परंतु याबाबत कोणताच पुरावा ग्रंथांमध्ये दिसून येत नाही.

दंत कथेनुसार, एके दिवशी भगवान गणेश यांची बहिण मनसा देवी, रक्षाबंधनाच्या उत्सवानिमित्त राखी बांधण्यासाठी गणेशजी यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी भगवान गणेश यांचे दोन पुत्र शुभ आणि लाभ देखील त्या स्थळी बसले होते.

वडिलांच्या हातात आत्याला राखी बांधताना पाहून त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला की, हे काय आहे? तेव्हा भगवान गणेशाने आपल्या पुत्रांना उत्तर दिल की, ही राखी असून आपल्या बहिणीने आपले सर्व दृष्ट लोकांपासून तसेच, सर्वप्रकारच्या समस्यांपासून आपले रक्षण करावे याकरिता माझ्या हातात ही राखी बांधली आहे.

पुत्र शुभ आणि लाभ यांनी पिता भगवान गणेश यांचे उत्तर एकूण आपणास देखील अशीच एक बहिण पाहिजे असा आग्रह आपल्या पिताकडे केला. तेंव्हा भगवान गणेश यांनी एक दिव्य शक्ती उत्पन्न केली त्या शक्तीला आपल्या दोनी पत्नीच्या आत्मशक्तीसोबत त्या शक्तीला विलीन करून,  त्या दिव्य रुपी शक्तीमधून एका कन्येचा जन्म झाला.

चमत्कारिक दिव्य शक्तीतून जन्मलेल्या कन्येचे नाव भगवान गणेश यांनी संतोषी असे ठेवले.  आपण या कन्येला संतोषी माता म्हणून ओळखतो. देवी संतोषी माता यांच्या जन्माबद्दल विविध कथा प्रचलित असून त्यांचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये दिसून येतो. देवी संतोषी माता यांच्याबाबत शुक्रवार या दिवसाला विशेष असे महत्व असल्याने सोळा शुक्रवारच्या व्रत वैकाल्पा बाबत भाविकांचे विशेष असे महत्व आहे. अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला नवस देखील करीत असतात. तसचं, आपल्या इच्छेनुसार देवीची ओटी देखील भरली जाते.

नवरात्री महोत्सवानिमित्त देवीची विशेष पूजा मांडली जाते. तसचं नियमित देवीची आरती देखील म्हटली जाते. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास संतोषी माता यांच्या उत्पत्तीबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला असून, देवीची आरती करण्यासाठी संतोषी मातेच्या आरतीचे लिखाण केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here