साळिंदर / सायाळ प्राण्याची माहिती

Sayal Animal chi Mahiti

साळिंदर हा एक जंगली प्राणी असून तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांना परिचित आहे.

साळिंदर / सायाळ प्राण्याची माहिती – Sayal Animal Information in Marathi

या प्राण्याला चार पाय असतात. दोन डोळे व एक शेपटी असते. या प्राण्याच्या तोंडाची रचना उंदीर या प्राण्याच्या तोंडाशी मिळती-जुळती असते.

रंग : या प्राण्याचा रंग काळपट तपकिरी असतो.

साळींदर / सायाळ प्राण्याचे खाद्य – Sayal Animal Food

साळिंदर हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे. त्याला गवत, कंदमुळे, गाजर, ऊस इ. खायला खूप आवडते.

वैशिष्ट्ये :

प्रत्येक प्राण्याला स्वत:च्या संरक्षणासाठी काही ना काही देणगी परमेश्वराने दिली आहे. या प्राण्यालासुद्धा देवाने स्वत:चे संरक्षण करण्यासाठी एक देणगी दिली आहे, ती म्हणजे त्याच्या अंगावरील तीक्ष्ण काटे होत.

साळिंदर हा प्राणी सहसा कोणत्याही प्राण्याच्या वाटेला जात नाही; परंतु आपल्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्याला मात्र आपल्या अंगावरील तीक्ष्ण काट्यांनी जखमी करून घायाळ करतो. हा प्राणी अतिचपळ असतो.

या प्राण्याच्या अंगावर सर्वसाधारणपणे एक इंचापासून ते जवळ जवळ पंधरा इंच लांब काटे असतात. हा प्राणी आकाराने छोटा असतो. परंतु सिंह, वाघ, चित्ता, कोल्हा यांसारखे हिंसक प्राणीसुद्धा याच्यावर हल्ला करीत नाहीत; कारण हा प्राणी आपल्या अंगावरील तीक्ष्ण काट्यांनी त्यांच्यावर हल्ला करतो आणि ते काटे त्या प्राण्याच्या अंगात शिरतात व मोडतात. असा हा छोटासा साळिंदर प्राणी मोठ्या बिळांत राहतो, तो डोंगराळ भागात व जंगलात आढळतो,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here