Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

“१५ अश्या गोष्टी ज्या हिंदू धर्मामध्ये केल्या जातात, जाणून घ्या त्या मागचे वैज्ञानिक कारणे”

Science Behind Hinduism

जगाच्या पाठीवर सर्वात पुरातन धर्म म्हणून ओळखल्या जाणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म आपल्या पृथ्वीवर हजारो वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे, हजारो वर्षापूर्वीच काही ऋषी मुनींनी ग्रह नक्षत्र यांच भाकीत केलेलं आहे, जे कोपर्निकस ने पंधराव्या शतकामध्ये सांगितले होते.

योग हि सुद्धा या जगाला हिंदू धर्माचीच देण आहे, हिंदू धर्मामध्ये अश्या काही प्रथा आहेत ज्या मागे काही तरी वैज्ञानिक कारणे आहेत. तर आजच्या लेखामध्ये आपण त्या काही गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.

तर चला जाणून घेऊया त्या काही गोष्टी ज्या हिंदू धर्मात केल्या तर जातात, आणि त्यांच्यामागील वैज्ञानिक कारण.

“१५ अश्या गोष्टी ज्या हिंदू धर्मामध्ये केल्या जातात, जाणून घ्या त्या मागची वैज्ञानिक कारणे” – Science Behind Hinduism

Science Behind Hinduism
Science Behind Hinduism

१) नमस्कार करतेवेळी दोन्ही हाथ जोडणे.

हिंदू संस्कृतीमध्ये दोन्ही हाथ जोडून नमस्कार केल्या जातो, तसेच अभिवादन करण्यासाठी सुद्धा नमस्कार केल्या जातो. ह्या मुळे समोरच्याला आदर दिल्या जातो. जेव्हा दोन्ही हाथ जोडल्या जातात तेव्हा आपल्या हातामधील अक्युब प्रेशरचे दोन्ही हाताचे काही पॉइंट ला थोडासा दबाव मिळतो. आणि तो दबाव आपल्या डोळ्यांना तसेच मेंदू ला आणखी सक्रीय करतात, आणि त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीला आठवण ठेवण्यास मदत मिळते. तेही कोणताही शारीरिक स्पर्श न होता.

२) नदीच्या पाण्यामध्ये नाणे टाकणे.

ह्या मागचे सामान्य कारण एक शुभ लक्षण मानले जाते. पण तेच जर आपण वैज्ञानिक रित्या त्यामागचे कारण पाहिले तर पूर्वीच्या काळात नदीमध्ये टाकलेले नाणे हे जवळ जवळ तांब्यापासून बनलेले असायचे, आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारा धातू म्हणजेच तांबे आहे. त्या नदीच्या पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात तांबे जात होते. आताही काही नाण्यांमध्ये तांब्याचा वापर केला जातो. त्यासाठी नदीच्या पाण्यामध्ये नाणे टाकण्याची प्रथा सुरु झालेली आहे.

३) मंदिरामध्ये घंटा असणे.

प्रत्येक मंदिरात घंटा असतेच, काय असेल त्या मागचे नेमक कारण, अगमा शास्त्रानुसार घंटेच्या आवाज नकारात्मक वातावरणाला दूर करण्याचे काम करतो आणि मंदिराच्या वातावरणामध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदत करतो. घंटेला त्याप्रकारे बनवले आहे, ज्यामुळे तिचा आवाज हा चहूकडे पसरेल. आपण जर घंटा वाजवली असेल तर तिचा आवाज हा ७ सेकंद आपल्या कानात घुमतो. आपल्या शरीरातील सात इंद्रिये सक्रीय करण्याची ताकद त्या घंटेच्या आवाजामध्ये असतो. हे आहे मंदिरामध्ये असलेल्या घंटेच्या मागचे कारण.

४) हातावर मेहंदी लावणे.

मेहंदी एक उपयोगी वनस्पती आहे, ज्यामुळे हाताला रंग तर येतोच तसेच त्यामुळे माणसाला तणावापासून दूर राहण्यास मदत होते, मेहंदीचा उपयोग लग्नाच्या वेळेस जास्त करून केल्या जातो. कारण लग्नाच्या वेळेस तणावाचे वातावरण असते, आणि तो तणाव कमी करण्यासाठी लग्नामध्ये मेहंदी हातावर लावल्या जाते. मेहंदीला हाताला आणि पायालाच लावल्या जाते कारण आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्या तिथेच जाऊन संपत असतात. म्हणून हातावर आणि पायावर मेहंदी लावल्या जाते.

५) उपवास का पाळतात.

उपवासाच्या मागचे काही कारणे आयुर्वेदामध्ये सापडतात, प्राचीन विज्ञानात आपल्याला होणाऱ्या काही रोगांचे मुख्य कारण हे आपल्या शरीरामधील जमा झालेले हानिकारक पदार्थ. जर आपल्या शरीरात हानिकारक पदार्थ दररोज साफ होत असतील तर आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत होते.

उपवासामुळे असे होते कि आपल्या शरीरातील पचन संस्थेला आराम मिळतो आणि आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थांना साफ करण्यास मदत मिळते. उपवासामुळे आपल्या शरीराचा समतोल चांगला राहण्यास मदत मिळतो. तसेच माणसाच्या शरीराला एक दिवस उपवासाची सवय हि असायलाच पाहिजेच. त्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहण्यास मदत होत असते.

६) चरणस्पर्श करणे.

आपल्या पेक्षा वयाने मोठे असणार्यांच्याच आपण पाया पडत असतो, ते जेव्हा आपण दिलेला आदर स्वीकारत असतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी करुणेचा भाव उत्पन्न होत असतो, आणि सकारात्मक उर्जा बाहेर पडत असते, त्यामळे होते असे कि एक वेगळ्या प्रकारची उर्जा उत्पन्न होऊन आपल्यामध्ये एक बाँडिंग तयार होते, चरणस्पर्श त्यांच्या मध्ये आणि आपल्या मध्ये एक मानसिक संबंध तयार करण्यास मदत करते. जेव्हा आपण चरणस्पर्श करतेवेळी आपले हाताचे बोटे त्यांच्या पायांना स्पर्श करतो, तेव्हा दोन्ही शरीरातील उर्जा ह्या एकमेकांशी जुळतात.

७) भांगात कुंकू भरणे.

कुंकवाला हळदीपासून बनवल्या जात असते, त्या मध्ये पाऱ्याचे तसेच सल्फाइड चे थोडे प्रमाण असतं, पाऱ्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचा दबाव चांगला राहण्यास मदत मिळते, तसेच कुंकवाला भांगात भरतात पिट्यूटरी ग्रंथीच्या वरच्या बाजूलाच कुंकू भांगात भरल्या जात असते, आणि महिलांमध्ये पिट्यूटरी ग्रंथी हे वेगवेगळे हार्मोन रीलिझ करत असते, त्यामध्ये सेक्स हार्मोन सुद्धा आहेत तसेच शरीराची वाढ करणारे हार्मोन्स सुद्धा असतात. म्हणूनच विधवा स्त्री ने कुंकू न लावणे हिंदू धर्मात मानल्या जात.

८) मूर्तीची पूजा करणे.

हिंदू संस्कृतीमध्ये मूर्तींची पूजा करण्याची प्रथा आहे. मंदिरामध्ये मूर्तीची पूजा केली जाते. त्यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. यामागील शास्त्रीय कारण असे आहे कि, प्रार्थना करतेवेळी आपले लक्ष एका ठिकाणी लागावे, तसेच ध्यान करतेवेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता, आपण एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपले ध्यान लाऊ शकू. मूर्तीमुळे आपण आध्यात्मिक शक्ती कोणत्याही प्रकारचे लक्ष विचलित न होता मिळवू शकू. या साठीच मंदिरामध्ये मूर्तीची पूजा केली जाते.

९) जमिनीवर बसून जेवण करणे.

हिंदू धर्मामध्ये जमिनीवर बसून जेवण करणे योग्य मानले जाते. ह्या मागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे, जेवायला बसताना आपण सुखासना च्या स्थितीत बसून आपले जेवण करत असतो, सुखासन हे एक आसन आहे योगासनाचे, आपण जेव्हा जमिनीवर सुखासानाच्या स्थितीमध्ये बसलेले असतो, तेव्हा आपले पाय जमिनीवर एकमेकांवर आडवे ठेवले जातात, त्यामुळे आपल्या पचन संस्थेला अन्न पचन करण्यासाठी मदत होते. म्हणून जमिनीवर बसून जेवण करणे लाभदायक ठरत.

१०) कान टोचणे.

हिंदू संस्कृतीमध्ये कान टोचण्याला खूप महत्व दिल्या गेले आहे. काही तज्ञांच अस मत आहे कि कान टोचल्यामुळे आपली बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. तसेच आपली विचार करण्याची क्षमता वाढते. निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते. याचा आणखी फायदा म्हणजे आपल्याला संयमाने बोलायला मदत करते. आपल्यामधील उद्धट वागणुकीला कमी करण्यास सुद्धा मदत करते.
हि एक पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेली पद्धत आहे.

११) पायाच्या बोटात जोडवे घालणे.

पायाच्या बोटामध्ये जोडवे घालणे महत्वाचे तर आहेच, पण त्याच्या मागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे, बऱ्यापैकी स्त्रिया पायाच्या दुसऱ्या बोटामध्येच जोडवे घालतात, ज्या बोटाला गर्भाशयाच्या नसा जुळलेल्या असतात. आणि त्या नसा हृदयाजवळून पास होत असतात. मधल्या बोटामध्ये घातलेले जोडवे गर्भाशयाला बळकट करण्याचे काम करते. तसेच मासिक पाळीला सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यासाठी स्त्रियांच्या पायाच्या बोटांमध्ये जोडवे घालण्याची पद्धत आहे.

१२) हातामध्ये बांगड्या घालणे.

हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रिया आपल्या हातामध्ये बांगड्या घालतात. आणि बांगड्या घालण्यामागेही सुद्धा वैज्ञानिक कारण आहे,
मनुष्याच्या शरीराचा सर्वात क्रियाशील भाग आपल्या हाताचे मनगट असते. मनुष्याच्या शरीराची महत्वाची नाडी हि मनगटामध्येच असते. आणि स्त्रिया आपल्या मनगटा मधेच बांगड्याना घालतात.
त्यामुळे नेहमी बांगड्यांच्या घर्षणामुळे स्त्रियांच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.

१३) डोक्यावर शेंडी ठेवणे.

आयुर्वेदामधील सर्जन सुश्रुत ऋषींच्या मते आपल्या डोक्यावर महत्वाचा आणि संवेदनशील भाग हा अधिपती मर्म आहे. आपल्या शरीरातील सर्व नसा ह्या त्या ठिकाणी एकत्र येतात, म्हणजेच त्या ठिकाणी पूर्ण रक्तवाहिन्यांच केंद्र असते, तसेच ब्रम्हरंद्र हा भाग सुद्धा डोक्याच्या मधोमध असतो. शेंडीमुळे त्यावर एकप्रकारचे सुरक्षेचे कामच होते.

१४) सूर्यनमस्कार करणे.

हिंदू संस्कृतीमध्ये सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणे, तसेच सूर्याला पाणी अर्पण करणे, या प्रथा आहेत, त्यामागे काही ना काही शास्त्रीय कारणे आहेतच, ते असे सकाळच्या वेळचे सूर्यकिरण हे आपल्या डोळ्यांसाठी चांगले असतात.

तसेच सकाळी सकाळी केल्या गेलेला सूर्यनमस्कार हा आपल्या शरीराच्या वाढीसाठी सुद्धा योग्य ठरतो. त्यामुळे आपल्या शरीरात एक नवीन उर्जा उत्पन्न होते आणि आपल्याला पूर्ण दिवस स्फुर्तीमध्ये राहण्यास मदत होते. तसेच सूर्यापासून येणाऱ्या किरणांपासून आपल्याला “ड” जीवनसत्त्व सुद्धा मिळतं.

१५) तुळशीची पूजा करणे.

हिंदू संस्कुतीमध्ये तुळशीला ला खूप महत्व दिल्या गेले आहे. मग त्यामागे काय कारण असणार बर!
हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला आईचा दर्जा दिला जातो. तुळशीला एक औषधी वनस्पती म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.

दररोज च्या चहा मध्ये सुद्धा आपण तुळशीचे पाने टाकून चहा घेऊ शकता. आपल्या घराबाहेर जर तुळशीचे रोपटे असेल तर त्याचा असा फायदा होतो, कि घरामध्ये येणाऱ्या मच्छर तसेच कीटक यांच्या पासून प्रतिबंध करण्याचे काम तुळस करते. ह्याच प्रकारे आपल्या सर्वांसाठी तुळशी हि एक संजीवनी म्हणून काम करते. त्यासाठी हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीची पूजा केली जाते.

तर आजच्या लेखात आपण पाहिले हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही गोष्टी केल्या जातात, त्यामागची वैज्ञानिक कारणे पाहिली. आम्ही आपल्यासाठी याच प्रकारे आणखी माहितीपर लेख घेऊन येत राहू.

आशा करतो कि आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved