Sunday, September 24, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

शांताबाई शेळके यांची माहिती

Shanta Shelke Mahiti

मराठी साहित्य विश्वात अनेक साहित्यिक आपापल्या प्रतिभासंपन्न लेखनाने साहित्य प्रेमींच्या गळ्यातील ताईत झाले. मराठी साहित्य वाचन प्रिय रसिक तसा फार चोखंदळ म्हणून ओळखला जातो. उत्तम दर्जेदार साहित्य त्याच्या मनाला लगेच भावतं तर अप्रिय लेखनाच्या तो वाटेला देखील जात नाही.

कविता, ललित लेखन, कथा संग्रह, कादंबरी-लेखन, मराठी भाषांतर, अश्या अनेक क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या आणि सहज ओघवत्या शैलीनं आपला एक चाहता वर्ग तयार करणाऱ्या शांता शेळके खचितच वेगळ्या वाटतात.

“ऋतू हिरवा..ऋतू बरवा…
पाचूचा वनी रुजवा
युग विरही हृदयांवर
सरसरतो मधु शिरवा….”

शांता शेळके यांनी आपल्या लिखाणाचं हिरवेपण आणि त्यातला गारवा कायम रसिकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचवला.

भक्तीगीतं असोत..की बालगीतं असोत..विरहगीतं..प्रेमगीतं..चित्रपट गीतं..देशभक्तीच्या रचना.. शांताबाईंनी लिखाणात प्राण ओतला…आणि लिखाणाची त्यांची ताकद वाचन प्रिय रसिकाच्या मनाला भावली.

Contents show
1 शांताबाई शेळके यांची माहिती – Shanta Shelke Information in Marathi
1.1 शांताबाई शेळके यांच्याबद्दल आणखी माहिती – About Shanta Shelke
1.2 शांताबाईंचे कवितासंग्रह – Shanta Shelke Poems or Shanta Shelke Kavita Sangrah
1.3 शांताबाईंचे कथासंग्रह – Shanta Shelke Katha Sangrah
1.4 शांताबाई शेळकेंवर प्रकाशित पुस्तकं – Shanta Shelke Books
1.5 शांताबाई शेळकेंना मिळालेले पुरस्कार – Shanta Shelke Awards

शांताबाई शेळके यांची माहिती – Shanta Shelke Information in Marathi

पूरा नाम (Name)अमर्त्य कुमार आशुतोष सेन (Economist India)
जन्म (Birthday)12 ऑक्टोबर 1922 पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथं
वडील (Father Name) जनार्दन शेळके
कार्यक्षेत्रसाहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
साहित्य प्रकारकथा, कादंबरी, कविता, चरित्र लेखन, वृत्तपत्रात सदर लेखन
मृत्यू6 जुन 2002

“मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश

जटाजूट माथ्यावरी
चंद्रकळा शिरी धरी
चीताभस्म सर्वांगास
लिंपूनि राहे…

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश”

महानंदा चित्रपटातील हि शांता शेळके यांची रचना साक्षात महादेवाला आपल्या नजरेसमोर उभी करते. लिखाणातील हि उंची हि सहजता प्रत्येक साहित्यिकाला गाठता येतेच असं नाही.

शांताबाईंचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथं 12 ऑक्टोबर 1922 रोजी झाला. त्यांचे वडील जनार्दन शेळके. शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे शांताबाईंच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी लाभली.

त्याचं सुरूवातीचं शिक्षण पुण्यातील हुजूरपागा या सुप्रसिद्ध शाळेत झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी एस.पी. महाविद्यालयात पूर्ण केलं.

शांताबाईंनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथमतः आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ मध्ये 5 वर्ष उपसंपादक म्हणुन जवाबदारी सांभाळली. आचार्य अत्रेंच्या नेतृत्वात काम केल्यामुळे त्यांच्यातील लेखनाला अधिक धुमारे फुटले.

पुढे मराठीच्या अध्यापिका म्हणून शांताबाईंनी नागपुर चे हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात सेवा दिली.

“ते एक झाड आहे
याचे माझे नाते..
वाऱ्याची एकच झुळुक
दोघांवरून जाते…”

ही कविता असो किंवा

“सायंकाळी क्षितिजावरती मंदपणे मी करते लुकलुक
शांत राहुनी अपुल्या जागी भवतालाचे बघते कौतुक”

शांताबाईंच्या या कविता त्यांच्यातील तरलता आणि सहजता दर्शवितात.

साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण अश्या अनेक क्षेत्रात शांताबाई अगदी लिलया वावरल्या. कथा, कादंबरी, कविता, चरित्रलेखन, वृत्तपत्रात सदरलेखन या साहित्य प्रकारांमध्ये त्यांचं लेखन आपल्याला पहायला मिळतं.

शांताबाई शेळके यांच्याबद्दल आणखी माहिती – About Shanta Shelke

डॉ. वसंत अवसरे या टोपण नावानं शांताबाईंनी लिखाण केलं आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

शांताबाईंची दर्जेदार साहित्याची 100 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

कवियत्री म्हणून शांताबाई अधिक प्रसिद्ध आहेत.

धूळपाटी नावानं शांताबाईचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

बालकांसाठी देखील त्यांनी अनेक कविता लिहिल्या असून त्यांचं बालसाहित्य फार आवडीनं वाचल्या जातं. ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ हि अशीच एक सुप्रसिद्ध बाल रचना.

आळंदी इथं भरलेल्या 69 व्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद शांताबाईंनी भूषवलं.

शांताबाई अनेक वर्ष नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर कार्यरत होत्या.

त्यांनी हिंदी तसच इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील साहीत्याचं अत्यंत ओघवत्या शैलीत मराठीत भाषांतर केलंय.

“शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव देश अन धर्मपायी प्राण घेतलं हाती
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत”

यासारख्या देशभक्तीच्या रचनांनी सैनिकांच्या अंगात स्फुरण चढतं…

शांताबाईंचे कवितासंग्रह – Shanta Shelke Poems or Shanta Shelke Kavita Sangrah

  • असेन मी नसेन मी
  • वर्ष
  • रुपसी
  • गोंदण
  • अनोळख
  • जन्माजान्ह्वी

शांताबाईंचे कथासंग्रह – Shanta Shelke Katha Sangrah

  • गुलमोहोर
  • कावेरी
  • बासरी
  • कादंबऱ्या
  • ओढ
  • धर्म

ललितलेख संग्रह

  • पावसा आधीचा पाऊस
  • आनंदाचे झाड
  • वडीलधारी माणसे

शांताबाई शेळकेंवर प्रकाशित पुस्तकं – Shanta Shelke Books

  • आठवणीतील शांताबाई
  • शांताबाई
  • शांताबाईंची स्मृतीचिन्हे

शांताबाई शेळकेंना मिळालेले पुरस्कार – Shanta Shelke Awards

  • गदिमा गीतलेखन पुरस्कार – 1996
  • सूरसिंगार पुरस्कार
  • केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (भुजंग चित्रपट)
  • साहित्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार – 2001
Previous Post

पेमगिरी किल्ला माहिती

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
June 17, 2023
Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ

स्वामी दयानंद सरस्वती

स्वामी दयानंद सरस्वती

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते.....

ध चा मा ची नेमकी काय आहे कथा ?

ध चा मा ची नेमकी काय आहे कथा ?

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved