Monday, June 30, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

पब्लिक स्पिकिंग टिप्स

Public Speaking Tips

चार चौघात बोलताना बरेच लोक आपला विषय मांडायला घाबरतात, मग ते प्रेझेंटेशन असो कि सेमिनार, तसेच आणखी चार चौघात कुठे बोलणे असले तर, कारण मनामध्ये भीती असते कि आपण आपली गोष्ट मांडताना कुठे चुकलो तर लोक काय म्हणतील?  माझ्यावरती हसतील तर नाही ना?

त्यामुळे आपल्याला चार चौघांच्या मध्ये बोलण्याची भीती असतेच, पण या सर्व गोष्टींना मागे टाकून प्रभावशाली कसे बोलल्या जाईल.

व आपण काय करायला हवे जेणेकरून लोक आपल्यालाच ऐकत राहतील.

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि आपण कोणत्या गोष्टींचा अवलंब केल्यानंतर लोक आपल्यालाच ऐकत राहतील.

पब्लिक स्पिकिंग टिप्स – Stage Daring Tips in Marathi

Stage Daring Tips in Marathi

१)खरोखर ची प्रशंसा करा – Really appreciate: 

आपण आपल्या बोलण्याची सुरुवातच प्रशंसेने केली तर आपले संभाषण आणखी बराच वेळ सुरु राहू शकते.

फक्त आपल्या प्रशंसेत जीव असायला हवा म्हणजेच आपण केलेली प्रशंसा हि खरीखुरी असायला हवी.

त्यामुळे समोरचा व्यक्ती आनंदी होऊन आपल्याला ऐकायला तयार होईल.

२) भावनांशी जुळवून बोलावे – Talk With Emotions:

नेहमी लक्षात ठेवा संभाषणात समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून बोलावे, कारण काही तज्ञांच अस मत आहे कि, संभाषणात फक्त ५ टक्के लोक असे आहेत जे तर्क लावून बोलत असतात पण ९५ टक्के लोक हे भावनात्मक होऊन बोलत असतात.

म्हणून कधीही संभाषण करताना समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी जुळवूनच बोलावे.

३) तयारी ठेवा – Always Ready:

आपण एखाद्या लग्न समारंभात गेल्यानंतर तिथे बरेच लोक येतात तेव्हा तिथे त्यांच्यात काय बोलावे हे कळत नाही, मग अश्या वेळेला काय करावे?  सुचत नाही! त्यासाठी आपण अगोदरच घरातून बाहेर पडते वेळी काही नवीन गोष्टी जाणून घ्या, जसे आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे.

तसेच देशात आता नवीन काय सुरु आहे. या विषयी थोडासा शोध घेऊन नंतरच कोणत्या कार्यक्रमात जायला निघा, त्यामुळे  आपले संभाषण चांगले होण्यास मदत होईल.

४) समोरच्याला समजून घ्या – Understand the Front:

बोलताना समोरच्याला चांगल्या प्रकारे समजून घ्या. आणि त्याला काय ऐकावे वाटत आहे तेच त्याला ऐकवा.

जेणेकरून आपल्याला त्याच्याशी चांगला संवाद साधता येईल. तसेच त्याला समजून घेतल्यावर आपल्याला कळून जाईल कि समोरच्याला कोणत्या गोष्टीत जास्त गोडी आहे. आणि आपले संभाषण खूप सोपी होऊन जाईल.

५) आत्मविश्वासाने बोला – Be Confidence:

संभाषण करतेवेळी सर्वात महत्वाचे म्हणजे आपला आत्मविश्वास. संभाषणात आपण आपले शब्द हे पूर्ण  आत्मविश्वासाने ठेवा जेणेकरून समोरच्याला आपल्या बोलण्यावर विश्वास होईल. आणि तो आपल्या संभाषणात चांगल्या प्रकारे रस घेईल.

६) आपले बोलणे गोष्टीच्या स्वरुपात मांडा – Turn your talk into something:

जर आपण लहानपणी आजी आजोबांच्या सानिध्यात राहले असाल तर आपल्याला माहित असेल कि आजी आजोबा आपल्याला काही गोष्टी सांगत असताना ज्या प्रकारे आपल्याला ती गोष्ट ऐकण्यास आनंद येत होता, कि आता गोष्टीत पुढे काय होईल?

म्हणून आपण ती गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन ऐकत होतो. तसेच व्यवहारात आणि संभाषणात आपण या ट्रिक चा वापर करू शकतो, ज्यामुळे लोक आपल्या बोलण्याला लक्ष देऊन ऐकतील.

७) एक मजेदार व्यति बनून रहा – Be a Fun Person:

आपण एक मजेदार व्यक्ती बनून राहावे. कारण संभाषणात विनोद आणि गमती असतील तर आपल्याला संभाषण करायला खूप सोपी जाईल.

चंचल व्यक्ती लोकांना लवकर प्रभावी करत असतात.

म्हणून चंचल आणि गमतीदार बनायचे प्रयत्न करा. त्याची आपल्याला संभाषणात चांगल्या प्रकारे मदत होईल.

८) भाषा चांगली असावी – Language should be Good:

संभाषण करतेवेळी आपण आपली भाषा चांगली ठेवावी. संभाषणात लोक आपल्या भाषेचे सुद्धा निरीक्षण करत असतात.

संभाषण करताना आपल्या भाषेत आदर असायला हवा.

जेणेकरून समोरच्यावर त्या गोष्टीचा चांगला प्रभाव पडेल, आणि तो नेहमी आपल्याशी बोलायला उस्तुक राहील.

भाषा चांगली करण्यासाठी आपल्याला सरावाची आवश्यकता आहे. आणि तो सराव संभाषणातूनच होणार आहे.

आपण आजच्या लेखात काही सोप्या पद्धती पाहिल्या ज्यामुळे आपण लोकांशी चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतो.

या पद्धतींचा वापर करून आपण आपल्या जीवनात एक उत्कृष्ट वक्ता बनू शकता.

तर आशा करतो आपल्याला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करण्यास विसरू नका. जेणेकरून आपल्या मित्रांनाही त्या गोष्टींची मदत होईल.

अवश्य भेट द्या majhi marathi ला.

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved