भारतीय सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन् चन्द्रशेखर

 Subrahmanyan Chandrasekhar in Marathi 

सुब्रह्मण्यम चंद्रशेखर हे सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांनी विलियम ए. फाउलर यांच्या सोबत भौतिकशास्त्रात केलेल्या संशोधनामुळे त्यांना सन १९८३ साली संयुक्तरीत्या भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आलं आहे. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर हे नोबल पारितोषिक विजेता सर सी. वी. रमण यांचे पुतणे होते. सुब्रह्मण्यम यांचे महाविद्यालयीन शिक्षण चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये पूर्ण झाले. यानंतर ते अमेरिकेला गेले. त्याठिकाणी त्यांनी खगोलशास्त्र तथा सौर मंडळाशी संबंधित विषयांवर अनेक पुस्तके लिहिली.

सुब्रह्मण्यम चंद्रशेखर एक भारतीय संशोधक – Subrahmanyan Chandrasekhar Information in Marathi

Subrahmanyan Chandrasekhar Information in Marathi 
Subrahmanyan Chandrasekhar Information in Marathi

सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे जीवन परिचय – Subrahmanyan Chandrasekhar Biography in Marathi

नाव (Name) सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
जन्म (Birthday) १९ ऑक्टोबर १९१० साली, लाहौर
वडिल (Father Name) सी. एस. अय्यर
आई (Mother Name) सीता बालकृष्णन
पत्नी (Wife Name) ललिता

सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे प्रारंभिक जीवन – Subrahmanyan Chandrasekhar Mahiti in Marathi 

डॉ. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचा जन्म ब्रिटीश कालीन भारतात सन १९ ऑक्टोबर १९१० साली भारताच्या विभाजनापूर्वी लाहौर (विद्यमान पाकिस्तान)  मध्ये झाला होता. त्यांचे प्रारंभिक शिक्षण मद्रास येथे झाले होते. आपल्या वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी ‘इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स’ मध्ये चंद्रशेखर यांची पहिली संशोधन पत्रिका प्रकाशित झाली होती.  मद्रास येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यापैकी एक प्रोसेसिंग ऑफ रॉयल सोसायटीमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. ही आपल्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची बाब आहे.

सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे करिअर – Subrahmanyan Chandrasekhar Career

सन १९३४ साली अवघ्या २४ वर्षाच्या वयात त्यांना चादण्या मोजणे आणि लुप्त होणे याबद्दल ज्ञान प्राप्त झाले होत. यानंतर, सन ११ जानेवारी १९३५ साली लंडन येथील रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसाइटी च्या सभेत त्यांनी आपला मौलिक शोध पत्र सदर केलं होत. ज्यामध्ये छोट्या छोट्या पांढऱ्या रंगाचे तारे एक निश्चित द्रव्यमान प्राप्त केल्यानंतर आपल्या वजनात आणि वृद्धीत वाढ करू शकत नाहीत. या गोष्टींचा उल्लेख केला गेला होता. त्यांनी सांगितल की, ताऱ्यांचे द्रव्यमान हे सूर्य ग्रहापेक्षा १.४ पट आहे.  त्यामुळे ते तारे आकुंचन पावून जड होतात. त्यांनी केलेल्या या संशोधनाला सुरुवातील त्यांचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील गुरु सर आर्थर एडिंग्टन यांनी हे संशोधन पहिल्यांदाच स्वीकारले नाही आणि त्याची थट्टा केली.चंद्रशेखर यांनी हार न मानता पुन्हा आपल्या संशोधनात गुंतले. सन १९८३ साली जवळपास ५० वर्षानंतर त्यांच्या या सिद्धांतास मान्यता मिळाली. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना व डॉ. विलियम फाऊलर यांना नोबल पारितोषिक बहाल करण्यात आला.

सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे निधन – Subrahmanyan Chandrasekhar Death

अश्या या महान नोबल पारितोषिक खगोलशास्त्रज्ञाचे निधन सन २१ ऑगस्ट १९९५ साली झाले.

चंदशेखर यांना मिळालेले पारितोषिक – Subrahmanyan Chandrasekhar Awards

  • सन १९४४ साली रॉयल सोसायटी चे फेलो बनले.
  • सन १९५२ साली ब्रूस पदक.
  • सन १९५३ साली रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी चे स्वर्ण पदक प्रदान करण्यात आले.
  • सन १९५७ साली अमेरिकन अकादमी ऑफ़ आर्ट्स एंड साइंसेजच्या रमफोर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • सन १९६६ साली राष्ट्रीय विज्ञान पदक, संयुक्त राज्य अमेरिका.
  • सन १९६८ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  • सन १९७१ साली नेशनल एकेडमी ऑफ सायन्स द्वारा हेनरी ड्रेपर मेडल बहाल करण्यात आलं.
  • सन १९८३ साली भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर हि होती संपूर्ण माहिती सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांची आशा करतो हा लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद!
शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here