सुरेश रैना यांचे जीवन चरित्र

Suresh Raina

सुरेश रैना हे एक भारतीय क्रिकेटपटू आहेत. डाव्या हाताचे मध्यमक्रमाचे फटकेबाज आहेत. त्यासोबतच ते ऑफ स्पिनर बॉलर म्हणून हि जबाबदारी सांभाळतात.

यासोबतच ते क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिल्डर्स मधून एक आहेत. त्यासोबतच IPL मध्ये आता गुजरात संघाचे कर्णधार आहेत. त्यांनी भारतीय “ब” संघाचे व मुख्य “अ” संघाचे हि नेतृत्व केले आहे. सर्वात कमी वयात नेतृत्व करणारे ते दुसरे कप्तान आहेत.

तीनही आंतरराष्ट्रीय प्रकारात ते खेळतात. त्यात शतक झळकावनाऱ्या पहिल्या भारतीयांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ते जलदगतीचा प्रकार म्हणजे T20 चे ते दर्जेदार फटकेबाज मानले जातात. आक्रमक अंदाजामुळे त्याचे कसोटी क्रिकेटचे करियर जास्त दिवस टिकले नाही.

Suresh Raina

सुरेश रैना यांचे जीवन चरित्र – Suresh Raina Biography in Marathi

सुरेश ने २००५ साली वयाच्या १९ व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांनी कसोटी क्रिकेटात प्रवेश २०१० म्हणजेच पाच वर्षानंतर याच संघाविरुद्ध केला होता. याच सामन्यात त्यांनी शतक झळकावले होते.

२०११ मध्ये झालेल्या विश्व कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते प्रमुख सदस्य होते.

सुरेश रैना यांचे वडील उत्तर प्रदेश मध्य मुर्दानगर येथील आयुधनिर्माण कारखान्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आईचे नाव परवेश रैना आहे.

उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद शहरातील राजनगर मध्ये ते राहतात. त्यांचे तीन लहान भाऊ आहेत. दिनेश रैना, नरेश रैना, आणि मुकेश रैना. त्यांना एक मोठी बहिण् सुद्धा आहे. सुरेश रैना यांचा एक लेख २०१२ मध्ये “राहुल द्रविड : टाईमलेस स्टील” या पुस्तकात प्रकाशित केला गेला.

सुरेश रैना चे करियर

सन २००० मध्ये रैनाने क्रिकेट खेळण्याचे ठरविले. गाझियाबाद येथील विशेष गव्हर्नमेन्ट स्पोर्ट कॉलेज मध्ये दाखल झाले. त्यानंतर मागे वळून पहिले नाही. उत्तर प्रदेश अंडर – 16 संघाचे कप्तान बनले.

सन २००२ मध्ये मुख्य निवडकर्त्याच्या नजरेत पडले. वयाच्या १५ व्या वर्षीच ते अंडर – 19 संघात आपले विशेष स्थान बनवून चुकले होते. अंडर – 19 साठी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध २ अर्धशतकिय डाव खेळले. हा टूर भारताने जिंकला होता.

त्यानंतर २००३ मध्ये रणजी क्रिकेट मध्ये आसाम विरुद्ध आपला पहिला खेळ खेळले होते. त्यावेळी ते फक्त १६ वर्षाचे होते. त्यानंतर पाकिस्तान टूर मध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली.

या खेळावर निवडकर्त्याची नजर होती. त्यांची नियुक्ती अंडर – 19 च्या वर्ल्ड कप संघासाठी झाली. या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी 3 अर्धशतके झळकावले. त्यात ३८ चेंडूत ९० धावा त्यांची सर्वोत्तम खेळी होती.

त्यांना भारतीय चयन समितीद्वारा प्रशिक्षणासाठी बोर्डर-गावस्कर स्कॉलरशिप हि मिळाली आहे. यानंतर २००५ मध्ये एक दिवसीय सामन्यांच्या खेळीत प्रवेश केला.

श्रीलंकेविरुद्ध एक दिवसीय सामन्यांच्या सिरीज मध्ये त्यांनी 3 अर्धशतकीय डाव खेळत ५३.७५ च्या सरासरीने ६४५ धावा केल्या होत्या.

सुरेश रैना चे खाजगी जीवन

3 एप्रिल २०१५ मध्ये सुरेश रैना यांनी बालमैत्रीण प्रियंका चौधरी हिच्याशी विवाह केला. त्यांना एक कन्यारत्न झाले आहे. जिचा जन्म १४ मे २०१६ मध्ये एमस्टरडम, नेदरलंड येथे झाला. मिरुथीया गेंगस्टर या कन्नड चित्रपटासाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे.

सुरेश रैना चे उपलब्धी

आंतरराष्ट्रीय स्तरावर

 • T20 मध्ये शतक झळकावनारे तिसरे फटकेबाज फलंदाज
 • क्रिकेट मधील तीनही प्रकारात शतक झळकावणारे पहिले भारतीय
 • कसोटी प्रकारात पहिल्या सामन्यातच शतक झळकावणारे १२ वे भारतीय फलंदाज
 • T20 करियर मध्ये ६००० पेक्षा जास्त धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू

घरगुती क्रिकेट स्तरावर

 1. IPL मध्ये सर्वाधिक ३००० धावा झळकावणारे पहिले खेळाडू
 2. IPL मध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे.
 3. IPL मध्येच १०० पेक्षा जास्त षटकार मारणारे पहिले भारतीय फलंदाज आणि विश्वातील दुसरे फलंदाज
 4. IPL सीजन मध्ये ४००० पेक्षा जास्त धावा बनवणारे पहिले व एकमात्र फलंदाज.
 5. IPL, CLT20 आणि टी20 यामध्ये शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज.
 6. IPL च्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक फलंदाजी ची सरासरी चा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे.
 7. ४ ऑक्टोबर २०१४ मध्ये CLT20 मध्ये सर्वाधिक धावा झळकावणारे पहिले फलंदाज तेच आहेत.
 8. IPL संघ चेन्नई सुपरकिंग कडील सर्व सामने ते खेळले आहेत.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी सुरेश रैना बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा सुरेश रैना यांचे जीवन चरित्र  – Suresh Raina Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Suresh Raina Biography – सुरेश रैना यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here