अश्या प्रकारे झाली स्विगीच्या बिझनेस ला सुरुवात. जाणून घ्या या लेखातून

Swiggy Startup Story

आपल्याला जर एखाद्या वेळी बाहेरच जेवण घरी करायची इच्छा झाली तर आपण जेवणाची ऑनलाईन डिलिव्हरी चे पर्याय शोधतो. आणि स्विगी त्यापैकी एक आहे, जेवण ऑर्डर केल्यानंतर एका ठराविक वेळानंतर ते आपल्या घरापर्यंत येऊन जाते. आपल्याला सर्वांना माहिती आहेच की स्विगी एक ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे.

या कंपनीच्या स्टार्टअप ची कहाणी आपण आजच्या लेखात पाहणार आहोत की कशाप्रकारे स्विगी कंपनीला सुरुवात झाली.  कोणकोणत्या समस्यांचा सामना स्विगी ची सुरुवात करणाऱ्या लोकांना करावा लागला. या सर्व गोष्टींचा उल्लेख आपण या स्टार्टअप स्टोरी मध्ये पाहणार आहोत. आशा करतो आपल्याला ही स्टार्टअप स्टोरी आवडेल. तर चला पाहूया.

अशा प्रकारे झाला स्विगी चा जन्म – Success Story of Swiggy Startup in Marathi 

Swiggy Startup
Swiggy Startup

आयुष्यात आपल्या ध्येयाकडे जाताना सुरवातीला अपयश आले तर आपण जीवनात कधी यशस्वी होऊच शकत नाही, किंवा आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे बंद करावे. असे लाखो यशस्वी लोक आहेत ज्यांनी अपयशाला मिठी मारून यशाचा स्वाद घेतला आहे, ही गोष्ट सुध्दा अश्याच काही मित्रांची आहे, जे आज स्विगी सारख्या मोठ्या ऑनलाईन नेटवर्क चे जन्मदाते आहेत.

ही गोष्ट आहे तीन मित्रांची पण सुरुवातीला त्या तीन मित्रांपैकी दोघांनी सुरुवातीला एक लॉगिस्टिक कंपनी ची सुरुवात केली होती आणि त्या दोघांची नावे होती, श्रीहर्ष मजेटी आणि नंदन रेड्डी. ह्या दोघांनी सुरुवातीला बऱ्याच पैशांची गुंतवणूक करून लॉगिस्टिक कंपनी ची सुरुवात केली परंतु त्या लॉगिस्टिक कंपनी मध्ये त्यांना बऱ्यापैकी तोटा सहन करावा लागला आणि त्यांना ही कंपनी बंद करावी लागली आणि त्यामुळे त्यांच्या पदरात अपयश आले. तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला.

त्यानंतर त्यांनी २०१३ ला स्वतःचा वेंचर बंडल नावाचा स्टार्टअप सुरू केला त्यामध्ये सुध्दा त्यांना अपयशच हाती लागले. आणि या अपयशामुळे त्यांना त्यांच्यात असलेल्या उणिवा दिसत गेल्या, आणि ते आणखी योग्य प्रकारे आपले पाऊल मार्केट मध्ये टाकण्यासाठी पुढे आले.

त्यानंतर त्यांनी एक रणनीती तयार केली, आणि या अपयशातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी एक प्लॅन बनविला पण यावेळेस ते पूर्ण तयारीनिशी आपला व्यवसायाची परत सुरुवात करायला तयार होते, आणि तेव्हाच त्यांची भेट झाली त्यांच्या तिसऱ्या मित्रांसोबत ते म्हणजे राहुल जेमिनी. राहुल ने आपले शिक्षण आयआयटी खडगपूर येथून पूर्ण केले होते.

राहुल ला भेटल्यांनातर बाकी दोघांच्या मदतीने बाजारावर व्यवस्थित रित्या लक्ष देऊन त्यांनी २०१४ मध्ये बँगलोर ला नवीन स्टार्टअप सुरू केला तो म्हणजे ऑनलाईन फूड डिलिव्हरी करण्याचा. सुरुवातीला त्यांनी रेस्टॉरंट वाल्यांना त्यांचे अप्लिकेशन आणि त्यांचा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी सांगितले. याच्या माध्यमातून ते ग्राहकांना पाहिजे असलेले जेवण घरपोच देऊ लागले त्यांनंतर ग्राहकांनी यावर पसंती दाखविली त्यांनंतर ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा उपलब्ध होत होती.

त्यांनंतर त्यांनी त्यांचे नेटवर्क इतर शहरांमध्ये पसरविले आणि या स्टार्टअप ला लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. आणि आज देशात जवजवळ प्रत्येक शहरात आपल्याला स्विगी उपलब्ध मिळते. आजपर्यंत स्विगी हा देशातील नंबर एकचा ऑनलाईन डिलिव्हरी करणारा प्लॅटफॉर्म बनला आहे.

सुरुवातीला हा स्टार्टअप सुरू करण्याआधी स्विगी च्या संस्थापकांना सुध्दा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनंतर कुठे त्यांना यश प्राप्त झाले. याच प्रकारे जीवनात सुध्दा सुरुवातीला अपयश आले तर हार न मानता लढत राहायचे. आणि नेहमी लक्षात ठेवायचे की यश एक ना एक दिवस आपल्याला मिळणारच आहे.

तर आजच्या स्टार्टअप स्टोरी मध्ये एवढेच, आशा करतो आपल्याला ही लिहिलेली स्विगी ची स्टार्टअप स्टोरी आवडली असेल आपल्याला ही स्टार्टअप स्टोरी आवडली असेल तर या स्टोरी ला आपल्या मित्रांना शेयर करून नवीन स्टार्टअप साठी प्रोत्साहित करा, सोबतच अश्याच नवनवीन स्टार्टअप स्टोरींसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here