• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information Fruit Information

चिंचेची संपूर्ण माहिती

Chinch Marathi

सदाहरित वृक्ष म्हटले कि आपल्या नजरेत चिंचेचे झाड येते. चिंच म्हटले कि लहानापासून तर मोठ्याच्या तोंडाला पाणी सुटेल असे फळ आहे. आणि त्यात तिखट मीठ लावलेली गाभुळलेली चिंच पाहिलीकी मन सुद्धा आवारात नाही आपले.

चिंचेची संपूर्ण माहिती – Tamarind Information in Marathi

Tamarind Information in Marathi
Tamarind Information in Marathi
हिंदी नाव:अमरूद
इंग्रजी नाव:Guava

चिंचेचे दोन प्रकार आहेत. एक साधी चिंच व एक लाल चिंच. साध्या चिंचेचे झाड आकाराने मोठे असते. या झाडाला बऱ्याच फांद्या फुटून, डेरेदार वृक्ष होतो. या फांद्यांच्या बारीक कांड्यांना छोटी-छोटी हिरवीगार पाने येतात. ही पाने चवीला आंबट असतात.खाणारी लोक कवळी पाने अगदी आवडीने खातात.

चिंचेच्या फुलांना ‘चिगोर’ असे म्हणतात. यालाच पुढे फळे येतात त्यालाच आपण चिंचा म्हणतो. कोवळ्या चिंचा हिरव्यागार असतात, त्यानंतर आतील गराला फिक्कट चॉकलेटी रंग येतो. चिंच जुनी झाल्यावर त्याचा रंग काळसर होतो. चिंचेच्या बी ला “चिंचोका” म्हणतात. त्याचा रंग लालसर-काळा असतो.

चिंचेच्या पाना चे महत्व – Important of Tamarind leaf 

चिंचे पेक्षा हि त्याचे पाने फार उपयोगी आहेत, कारण त्या पानात व्हिटामिन सी, फायबर, पोटॅशियम, टार्टरिक ऍसिड, लोह, कॅल्शियम हि महत्त्वाची पोषण द्रव्य आढळतात.

चिंचेचे औषधी उपयोग – Tamarind Benefits

  1. चिंचेच्या पानाचा उपयोग पचनास मदत करते.
  2. चिंचेच्या पानापासून व्हिटामिन सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
  3. चिंचेच्या पानाचा रस लीबांच्या रसासोबत घेतल्यास कफ नाहीसा होतो.
  4. चिंचेची साल लकवा रोगावर उपयुक्त ठरते.
  5. त्वचारोगांवर चिंचेचा पाला उपयोगी आहे.
  6. चिंचेच्या पानाचा रसाचा उपयोग मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना पासून सुटकारा मिळतो.
  7. विंचू चावला तर चिंचोका उगाळून त्या भागावर लावावा, वेदना पूर्ण कमी होतात.
  8. चिंचेच्या पानाचा रसाचा उपयोग स्तनदा मातांना होतो त्यामुळे मातेच्या दुधाचे पोषण मुल्ये वाढतात.
  9. चिंचेचे पान चावून खाल्यास तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.
  10. चिंचेचे पान हे अल्सर च्या त्रासावरही उपयोगी ठरते.

चिंच लागवड : Chinchechi Lagwad

याची लागवड चिंचोके लावून किवां त्याच्या कलमा लाऊन करतात. त्यासाठी एक बाय एक चे खड्डे खणून त्यात शेणखत व माती मिश्रण करून रोप लावावे लागते. या झाडाला कोणतीही जमीन चालते. चिंचा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतात.

चिंचेचा दुसरा प्रकार म्हणजे लाल चिंच. याला बरीच लोक इग्लिश चिंच म्हणून देखील संबोधतात .याची पाने बारीक व गोल असतात. झाडाला थोडे काटे असतात. ही चिंच फक्त खाण्यासाठी वापरतात. वरून पोपटी साल व आतमध्ये पांढऱ्या रंगाचा गर असतो. त्याच्या आतमध्ये बारीक काळ्या रंगाचे बी असते. पिकल्यावर ही चिंच लाल रंगाची दिसते. या चिंचेची चव गोड लागते.

इतर माहिती :  Other Information

चिंचेची चव आंबट असल्याने भाजी, आमटी, सार यात चिंच वापरली जाते. चिंचेला मीठ लावून ठेवल्यास चिंच वर्षभर टिकते. चिंचेची बी म्हणजे चिंचोके भाजून खाण्यास चांगले लागतात.

चिंचोक्याचे पीठ खळ, रबर, रंग, स्टार्च पावडर यांसारख्या उत्पादन कारखान्यात वापरले जाते. घोंगडी ताठ राहण्यासाठी धनगर लोक चिंचोक्याची खळ वापरतात. चिंचोक्यांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग रंगासाठी केला जातो. या झाडाच्या लाकडाचा उपयोग जळण, शेतीची अवजारे तयार करण्यासाठीही होतो. चिंचे चा उपयोग पितळ ची व ताब्याची भांडे स्वच्छ करण्यासाठी सुद्धा होतो.

थंडगार सावलीसाठी रस्त्याच्या कडेने चिंचेची झाडे लावतात.

चिंचे बद्दल विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – Quiz about Tamarind

प्रश्न. चिंचे चे फायदे व तोटे सांगा ?

उत्तर: चिंच खाल्याने ब्लड प्रेशर आणि संधिवाताचा त्रास कमी होतो. तर चिंच जास्त खाल्याने रक्त पातळ आणि BP low होते.

प्रश्न. चिंचे च्या बीया कोणते घटक असतात ?

उत्तर: व्हिटामिन सी, फायबर, पोटॅशियम, अमिनो ऍसिड, लोह, कॅल्शियम जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

प्रश्न. चिंचे चे उत्पादन मार्ग काय ?

उत्तर: शेतात चिंचेचे झाडे लाऊन उत्पन्न मिळता येते, सरळ चिंच मार्केट ला ठोक भावाने विकता येते, चिंचे वरील टरफल काढून त्याला नीट packing करून सुद्धा विकता येते. चिंचेचा सॉंस बनवण्याचा गृह उद्योग देखील करता येतो. चिंचे च्या पानाचा देखील प्रक्रिया करून पावडर चाट मसाल्या कंपनींना विकता येतो. इत्यादी

Editorial team

Editorial team

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved