टेनिस खेळाचा इतिहास आणि माहिती

Tennis Information in Marathi

जगात विविध खेळ खेळले जातात. यांमध्ये क्रिकेट, बास्केटबॉल, बेसबॉल, फुटबॉल आणि यांसारखे अनेक खेळ लोकप्रिय आहेत. परंतु या सर्वांमध्ये आणखी एक प्रसिद्ध खेळ आहे तो म्हणजे ‘टेनिस’. चला तर मग आज आपण या खेळाबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.

टेनिस खेळाचा इतिहास आणि माहिती – Tennis Information in Marathi

Tennis Information in Marathi
Tennis Information in Marathi

टेनिस खेळाचा इतिहास – Tennis History in Marathi

टेनिस खेळाचे मूळ नाव ‘लॉन टेनिस’ (गवतावर खेळल्या जाणारे टेनिस) असे आहे. या खेळाची सुरुवात १२ व्या शतकात फ्रांस देशात झाल्याचे मत इतिहासकार व्यक्त करतात. परंतु आधुनिक टेनिस खेळाची नियमावली १८७३ साली मेजर वॉल्टर क्लाप्टोन विंग्जफिएल्ड यांनी जगासमोर ठेवली.

टेनिस खेळाचे प्रकार – Types of Tennis

हा खेळ एकेरी (Singles) म्हणजे दोन्ही बाजूंनी एक एक खेळाडू व दुहेरी (Doubles) म्हणजे दोन्ही बाजूंनी दोन दोन खेळाडू अशा प्रकारे खेळल्या जातो.

टेनिस खेळासाठी लागणारे साहित्य – Materials required for Tennis

या खेळासाठी आपल्याला दोन किंवा चार टेनिस रॅकेट्स, बॉल आणि एक आयताकृती जाळी लागेल.

टेनिस खेळाच्या मैदानाचे मोजमाप : Tennis Court Dimensions

Tennis Court Dimensions
Tennis Court Dimensions

खेळाचे मैदान हे आयताकृती असते. जे ७८ फूट (२३.८ मी.) लांब आणि २७ फूट (८.२ मी.) रुंद (एकेरी साठी) तर ३६ फूट (१०.९७ मी.) रुंद (दुहेरी साठी) असते. मैदानाच्या मधोमध जाळी बांधलेली असते. रुंद भागाच्या दोन्ही बाजूंना बेसलाईन असे म्हणतात. बेसलाईनच्या मधोमध सेंटर मार्क असतो. जाळीपासून २१ फुटांच्या अंतरावर सर्विस लाईन असते.

टेनिस खेळाच्या मैदानाचे प्रकार : Types of Tennis Courts

खेळाच्या मैदानावरून याचे मुख्य तीन प्रकार पडतात.

 • गवती मैदान (Grass Court)
 • मातीचे मैदान (Clay Court)
 • कठीण मैदान (Hard Court)

टेनिस खेळ कसा खेळावा आणि त्याचे नियम : How to play Tennis and its Rules

खेळाची सुरुवात नाणेफेक (Toss) करून होते. जो खेळाडू नाणेफेक जिंकतो त्याला सर्वर (Server), तर दुसऱ्याला रिसिव्हर (Receiver) असे म्हणतात. सर्वर चेंडूला रॅकेटने फटका मारेल जेणेकरून तो चेंडू जाळीच्या पलीकडे जाईल, आणि रिसिव्हरला चेंडू परत पाठवण्यासाठी कठीण जाईल. रिसिव्हर दुसऱ्या बाजूने चेंडूला फटका मारेल व सर्वर कडे पाठवेल. आणि अशाप्रकारे खेळाची सुरुवात होते.

असे करत असताना जर सर्वरचा चेंडू जाळीला लागून रिसिव्हरच्या बाजूने जाण्यास असमर्थ झाला तर सर्वरला बाद (Out) घोषित केल्या जाते. आता बॉल मारण्याची संधी रिसिव्हरला दिली जाते. अशा प्रकारे खेळ खेळल्या जातो.

चेंडूला फटका मारतांना तो मैदानावरील लाईन च्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

टेनिस खेळाचे गुण : Points in Tennis

खेळामध्ये १५, ३० आणि ४० याप्रकारे गुण दिले जातात. यामध्ये १५ म्हणजे १ पॉईंट, ३० म्हणजे २ पॉईंट आणि ४० म्हणजे ३ पॉईंट. खेळाडूंना जिंकण्यासाठी ४ पॉइंट्सची गरज असते.

टेनिस खेळाच्या जगप्रसिद्ध स्पर्धा : Tennis Tournaments

 1. विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धा
 2. यु. एस. ओपन (U.S. Open) स्पर्धा
 3. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धा
 4. फ्रेंच ओपन (French Open) किंवा रोलंड-गर्रोस (Roland-Garros) स्पर्धा

टेनिस मधील जगप्रसिद्ध खेळाडू : World Famous Tennis Players 

१. पुरुष : Male

 • नोव्होक जोकोविच
 • राफेल नदाल
 • डॅनिअल मेदवेदेव
 • रॉजर फेडरर इ.

२. महिला : Female

 • ऍशलीग बार्टी
 • नाओमी ओसाका
 • सिमोना हॅलेप इ.

टेनिस मधील भारतीय खेळाडू : Indian Tennis Players

१. पुरुष : Best Indian Tennis Players Male

 • लिएंडर पेस
 • महेश भूपती
 • रोहन बोपण्णा
 • राजकुमार रामनाथन इ.

२. महिला : Best Indian Tennis Players Female

 • सानिया मिर्झा
 • अंकिता भांबरी
 • प्रेरणा भांबरी
 • रुष्मी चक्रवर्थी इ.

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न : (FAQs)

१. टेनिस खेळाचा उगम कुठल्या देशात झाला ?

उत्तर : फ्रान्स देशात.

२. टेनिस खेळ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट आहे का ?

उत्तर : होय.

३. टेनिस खेळाचा शोध कोणी लावला ?

उत्तर : मेजर वॉल्टर क्लाप्टोन विंग्जफिएल्ड .

४. टेनिस खेळाचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू कोण आहे ?

उत्तर : रॉजर फेडरर.

५. डेविस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर : टेनिस.

६. कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले आहे ?

उत्तर : लीएंडर पेस यांनी १९९६ साली टेनिस खेळामध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे.

७. टेनिस खेळासाठी वेळेची मर्यादा आहे का ?

उत्तर : नाही, या खेळामध्ये अशी कुठलीही मर्यादा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here