फुटबॉल खेळाची माहिती

Football in Marathi

एका अनुमानाप्रमाणे जवळजवळ 150 देशांमध्ये अंदाजे 25 लक्ष खेळाडु हा खेळ खेळत असतात. हा आकडा पाहाता आपल्याला सहज अंदाज येईल की हा खेळ किती लोकप्रीय आहे ते ! आणि विशेश बाब ही की हा आकडा बघता हा विश्वातील प्रसिध्द खेळ मानला गेला आहे.

Football Information in Marathi

फुटबॉल खेळाची माहिती – Football Information in Marathi

तर मंडळी फुटबॉल हा खेळ 11-11 खेळाडंुच्या दोन संघांमध्ये खेळला जाणारा गेम असुन मैदानात खेळल्या जाणाऱ्या मुख्य खेळांमध्ये गणला जाणारा खेळ आहे.

फुटबॉल खेळाचे आणखीन एक नाव – Football Other Name Soccer

फुटबॉल या खेळाला आणखीन एका नावाने देखील संबोधले जाते हे आपल्याला माहित आहे? फुटबॉल ला साॅकर या नावाने देखील बऱ्याच ठिकाणी ओळखले जाते.

फुटबॉल चे मैदानाची माहिती – Football Ground Information in Marathi

फुटबॉल हा खेळ आयताकृती कृत्रीम गवताच्या मैदानावर खेळला जातो. दोन्ही संघातील खेळाडंुनी परस्पर विरोधी संघाच्या खेळाडुंना चकवुन त्यांच्या गोल पोस्टवर गोल करणे हा या खेळाचा उद्देश आहे. मैदानाच्या दोन्ही टोकाला गोल-पोस्ट असतो.

फुटबॉल खेळाविशयी माहिती – Football Chi Mahiti

खेळात गोलरक्षक हा एकमेव खेळाडु असा आहे ज्याला बाॅल अडविण्याकरता हातांचा उपयोग करण्याची मुभा आहे संघातील इतर खेळाडु मात्र किक मारण्याकरता पायांचा आणि हवेतील बाॅल अडविण्याकरता आपल्या डोक्याचा किंवा शरीराचा वापर करतात.

जो संघ खेळ संपेपर्यंत जास्त गोल करेल तो संघ सामन्यात विजयी घोशीत केला जातो.

खेळ संपेपर्यंत जर दोनही संघांचा स्कोअर सारखा राहिला तर सामन्याला बरोबरीत म्हणजे ड्राॅ घोशीत करण्यात येतं, किंवा सामन्याला अतिरीक्त वेळ दिला जातो, नाही तर पेनल्टी शुट आउट व्दारे देखील हार जितीचा निर्णय ठरविला जातो.

फिफा विश्वकप – Fifa World Cup

फुटबॉल हा खेळ 1863 ला तयार करण्यात आलेल्या लाॅज आॅफ द गेम (खेळाचे नियम) च्या आधारावर आज खेळला जातो. आंतरराश्ट्रीय आधारावर फुटबॉल चे नियंत्रण ‘‘फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन’’ अर्थात असोसिएशन फुटबॉल चा आंतरराश्ट्रीय महासंघ ज्याला थोडक्यात फिफा देखील म्हणण्यात येतं हा करत असतो.

फिफा विश्वकप ही फुटबॉल ची सर्वात प्रतिश्ठित आंतरराश्ट्रीय आणि लोकप्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन दर चैथ्या वर्शी केल्या जाते. ही स्पर्धा संपुर्ण विश्वात मोठया उत्सुकतेने पाहिल्या जाते. उन्हाळयात होणाऱ्या आॅलंम्पीक खेळांपेक्षा जवळपास दुप्पट पे्रक्षक फिफा विश्वकप पाहातात.

फुटबॉल खेळाचा परिचय – Football Khel Mahiti Marathi

फुटबॉल या नावानेच या खेळाचे स्वरूप आपल्या लक्षात येतं. बाॅल ला पायाने मारायचे त्यामुळे याला फुटबॉल म्हंटले जाते. दोन संघात खेळला जाणारा हा एक मैदानी खेळ आहे. खेळात हिस्सा घेणाऱ्या दोन्ही संघांमध्ये 11-11 खेळाडु असतात. आंतरराश्ट्रीय नियमांनुसार खेळाचा कालावधी 90 मिनीटांचा असतो ज्याला 45-45 मिनीटांच्या दोन मध्यांतरात विभाजीत करून खेळल्या जाते.

खेळातील दोनही संघ आपल्या विरूध्द संघाच्या विरूध्द आधिकाधिक गोल करण्याचा प्रयत्न करतं. अखेरीस जो संघ सर्वाधिक गोल करतो त्या संघाला विजयी घोशीत करण्यात येतं. खेळातील दोनही संघांचा आपापला गोलकिपर असतो किपर व्यतिरीक्त अन्य कुणालाही बाॅल ला हात लावण्याची परवानगी नसते आणि जर कुणी असे केले तर रेफरी त्याला प्रतिबंध करतो.

प्रत्येक चार वर्शांनंतर फुटबॉलच्या सर्वात मोठया अश्या फिफा विश्वकप स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेत जगातील सर्वश्रेश्ठ संघ सहभागी होतात.

आतापर्यंत पाच विश्वकप स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. 2002 साली ब्राजील, 2006 मध्ये इटली, 2010 ला स्पेन आणि 2014 मध्ये जर्मनी ने ही स्पर्धा जिंकली आहे.

खेळाचे स्वरूप – Football Rules in Marathi

फुटबॉल खेळ हा काही नियमांच्या आधारे खेळला जातो. हा खेळ मोठया गोल चेडंुने खेळला जातो. 11 खेळाडंुचे दोन संघ असतात प्रत्येक खेळाडु दुसऱ्या संघाच्या गोल-पोस्ट मध्ये बाॅल टाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपले जास्त गोल व्हावेत. जो संघ खेळाच्या अखेर पर्यंत सर्वाधिक गोल करेल तो संघ विजयी होतो. जर दोन्ही संघांनी समान गोल केलेत तर सामना ड्राॅ होतो.

या खेळाचा पहिला नियम म्हणजे खेळादरम्यान खेळाडु जाणीवपुर्वक आपल्या हाताने अथवा खांदयाने बाॅलवर नियंत्रण मिळवु शकत नाही. खेळाडु साधारणपणे बाॅल ला इकडुन तिकडे करण्याकरता आपल्या पायांचा उपयोग करतो. हात वगळता खेळाडु आपल्या शरीराचा कोणताही अवयव खेळ खेळतांना उपयोगात आणू शकतो.

या खेळात खेळाडु गोल करण्याकरीता आपल्या संघातील खेळाडुकडे बाॅल पास करतो जेणेकरून तो विरोधी संघाच्या गोल-पोस्ट ला बाॅल टाकुन गोल करेल आणि अधिकाधीक गोल होतील मात्र त्या ठिकाणी देखील गोल पोस्ट वर बाॅल अडवण्याकरता विरोधी संघातील गोल किपर सर्वशक्तीनिशी बाॅल अडविण्याकरता आपली तत्परता दाखवतो.

विरोधी संघ देखील सामन्या दरम्यान बाॅल आपल्या ताब्यात घेण्याकरीता प्रयत्नशील असतात पण हे करत असतांना एकमेकांना शारिरीक संपर्क होउ दयायचा नाही.

साधारणतः फुटबॉल हा न थांबणारा खेळ आहे परंतु हा तेव्हांच थांबतो जेव्हां बाॅल मैदानाबाहेर जातो किंवा रेफरी मॅच थांबवतो.

थांबलेला खेळ ठराविक वेळेकरता पुन्हा सुरू होतो.

फुटबॉल चे आजचे स्वरूप – Football Today

व्यावसायिक स्तरावर फुटबॉल हा खेळ आज संपुर्ण विश्वात खेळला जातो. आपल्या आवडत्या टिमचे समर्थन करण्याकरता लाखो फुटबॉलप्रेमी मैदानात जातात. आणि असंख्य लोक टेलिव्हीजन च्या माध्यमातुन हा खेळ पाहातात. आवड म्हणुन देखील खुप मोठया प्रमाणात लोक फुटबॉल खेळतांना आपल्याला पहायला मिळतात.

या खेळाचे साधारण नियम आणि खेळतांना जास्त गोश्टी लागत नसल्याने या खेळाच्या प्रसारात आणि लोकप्रीयतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

विश्वातील अनेक भागांमध्ये फुटबॉल या खेळाने मनुश्याच्या जीवनात, त्याच्या प्रशंसेत, स्थानिक समाज जिवनात, आणि देशात देखील एक उत्साह निर्माण केला आहे.

फुटबॉल खेळाचे फायदे – Benefits Of Football

फुटबॉल खेळणे हा एक उत्तम शारिरीक व्यायाम देखील आहे. लहान मुलं, युवावर्ग यांच्या समवेत अन्य वयोगटातील लोकांकरता देखील अनेक लाभ या खेळाने प्राप्त होतात. सामान्यतः शाळेत आणि महाविदयालयांमध्ये विदयाथ्र्यांना चांगले स्वास्थ्य लाभावे याकरता फुटबॉल खेळला जातो.

विदयाथ्र्यांचे कौशल्य, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढीस लागण्यात या खेळाचे योगदान महत्वाचे आहे.

व्यक्तिला शारिरीक, मानसिक, आणि सामाजिक दृश्टया अनेक लाभ फुटबॉलने प्राप्त होतात. मनोरंजनाचे देखील हे एक चांगले माध्यम असुन मानवी शरीराला आणि मनाला ताजेतवाने ठेवण्याचे कार्य हा खेळ करतो. फुटबॉल हा खेळ व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या सामान्य समस्यांचा सामना करायला शिकवीतो.

Read More:

आशा आहे की आपणास “फुटबॉल या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Football Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here