क्लिक करा कोणत्याही एका नंबर वर आणि जाणून घ्या आपला स्वभाव

Test Your Temperament

माणसाने आजपर्यंत जी प्रगती केली आहे, ती फक्त आणि फक्त मेंदूच्या भरवशावर. मानवीय मेंदूची क्षमता हि इतक्या जास्त प्रमाणात आहे कि त्याला कोणतीही सीमा नाही आहे.

बरेचदा आपण आपल्या विषयी जाणून घेण्यासाठी एखाद्या जोतीष्याकडे जातो, किंवा इतर काही विशेष व्यक्तींचा सहारा घेतो आणि आपल्याला भविष्यात येणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.

तेच नाही तर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे कि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात म्हणजेच हाताची पाचही बोटे सारखी नसतात प्रत्येकाची निवड हि वेगवेगळी असते, कोणाला काही आवडते तर कोणाला आणखी काही.

प्रत्येकाची मानसिकता हि वेगवेगळी असते. आणि प्रत्येकाची निवड हि इतरांपेक्षा वेगळीच असते. अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल आपली निवड आपली मानसिकता कशी आहे हे दाखवते. आणि एखाद्या गोष्टीच्या निवडीच्या वेळी सांभाळून आपली निवड करावी कारण बरेचदा निवडेवरून आपल्या बरेचश्या गोष्टी समजतात.

या लेखात सुद्धा आपल्याला एक अशीच निवड करायची आहे, आणि या निवडीवरून आम्ही तुम्हाला तुमचा स्वभाव कसा आहे हे सांगण्यास मदत करणार आहोत. चित्रात दाखवल्या प्रमाणे या मुलींपैकी एका मुलीला आपल्याला निवडायचे आहे,

निवडताना खूप डोके लावायची गरज नाही डोक्यात जी मुलगी आपल्याला आकर्षक वाटेल त्या मुलीला निवडा, आपल्या निवडीवरून आपली मानसिकता आणि व्यक्तीमत्वाविषयी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

क्लिक करा कोणत्याही एका नंबर वर आणि जाणून घ्या आपला स्वभाव – Test Your Temperament

Test Your Temperament Test Your Temperament
Test Your Temperament

१) पहिल्या नंबर साठी – जर आपण पहिल्या नंबर ला सर्वप्रथम निवडले असेल तर आपण एक आत्मविश्वासू व्यक्ती आहात. आपण येणाऱ्या नवीन संकटांचा सामना निर्भीडपणे करता. आपल्या जीवनात समस्या ह्या ठेवलेल्या आहेत, पण तुम्ही त्या समस्यांचा सामना करण्यासाठी नेहमी तत्पर असता. जीवनात आलेल्या अडथळ्यांना सुद्धा तुम्ही पाठ न दाखवता सामोरे जाता. आपल्याला स्वतःच्या निर्णयावर ठामपण उभे राहायला आवडते.

२) दुसऱ्या नंबर साठी – जर आपण दुसऱ्या नंबर ला निवडले असेल तर आपण कोणत्याही गोष्टीसाठी उत्सुक असणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहात. तुम्ही भावनांना बाजुला ठेवून तर्क आणि विश्लेषण यांच्या भरवशावर निर्णय घेता. तुमची फसवणूक करणे एवढेही सोपी नसतं. तुम्हाला एक समजूतदार व्यक्ती म्हणून ओळखल्या जात.

३) तिसऱ्या नंबर साठी – जर आपण तिसऱ्या नंबर ला सर्वप्रथम निवडले असेल तर आपण एक लाजाळू व्यक्ती आहात, बुद्धीने हुशार आणि मनाने प्रेमळ असलेले तुमचे व्यक्तिमत्व आहे, तुम्ही नवीन लोकांशी लवकर मित्रता करत नाही. आणि एकवेळ मित्रता केली तर एक चांगले मित्र म्हणून समोर येता. तसे पाहता तुम्हाला एकटे राहायला आवडते. तुम्हाला जीवनांत स्वतःच्या बळावर काहीतरी करावे वाटते. आपण काही गोष्टींची अपेक्षा न करता बाकीच्यांपेक्षा अधिक मेहनत करता.

४) चौथ्या नंबर साठी – जर आपण चौथ्या नंबर ला निवडले असेल तर आपण जीवनात एक खंबीर व्यक्ती आहात, तुम्हाला नवनवीन गोष्टी जाणून घेण्यात एक वेगळा आनंद मिळतो, तुम्हाला एक कर्तुत्वान व्यक्ती म्हणून जगायला आवडते. तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करता, जोखीम पत्करण्याच्या आधी सुद्धा आपण पडताळून पाहण्यात विश्वास ठेवता. तुमच्यात एक अलौकिक प्रतिभा भरलेली आहे, तिचा योग्य वापर करायला शिकला तर आपल्याला जीवनात यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही.

५) पाचव्या नंबर साठी.  जर आपण पाचव्या नंबर ला निवडले असेल तर तुम्ही एक मोकळ्या विचारांचे व्यक्ती आहात, तुम्हाला बाकी लोक काय म्हणतात याच्या विषयी जास्त देण घेण नसते, तुम्हाला तुमच्या धुंदीत जगायला आवडते. आणि तुम्ही तसे जगता सुद्धा. कोणतेही काम तुम्ही कोणाच्या दबावात येऊन करत नाही.

या लेखाला लिहिण्यासाठी काही मनोवैज्ञानिक आणि त्यांच्या अभ्यासाच्या काही बाबींचा आधार घेतलेला आहे. या अभ्यासाच्या आधारे माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरून माणसाचा स्वभाव कसा हि गोष्ट समजण्यास मदत होते.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here