टमाटरची संपूर्ण माहिती, फ़ायदे, उपयोग

Tomato chi Mahiti

आपल्या रोजच्या उपयोगात टमाटरला फार वरचे स्थान आहे. हिरवा सांबार, मिरच्या आणि टमाटर शिवाय काम चालू शकत नाही. घरोघरी किचनमध्ये बटाटे, कांदे व टमाटर उपलब्ध असतात. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ बाराही महिने मिळत असतात. अश्या गुणकारी टमाटर बद्दल बरीच माहिती आम्ही तुमच्या साठी आमच्या या लेखात घेवून आलो आहोत, चला तर बघूया…

टमाटरची संपूर्ण माहिती, फ़ायदे, उपयोग – Tomato Information in Marathi

Tomato Information in Marathi
Tomato Information in Marathi
हिंदी नाव टमाटर
इंग्रजी नाव Tomato

आंबट-गोड व चविष्ट टमाटर सलाद म्हणून खाता येते, दहाबरोबर कोशिंबीरीत टाकता येते, अनेक भाज्यात, खिचडीत, सोजीत, उपम्यात वापरता येतो. घरात भाजी उपलब्ध नसेल तर टमाटरची चटणी बनवून काम होऊ शकते. जाड सालीच्या अंडाकृती टमाटरपेक्षा अगदी पातळ सालीचे, छोट्या व गोल आकाराचे टमाटर चांगले असतात. टमाटर सॉस आणि सूप तर फारच लोकप्रिय असते.

आयुर्वेदिक चिकित्सकांनी टमाटरचे गुण लिंबासारखेच असल्याचे सांगितले आहे. परंतु ह्यात सफरचंद किंवा संत्र्यापेक्षाही अधिक पौष्टिक गुण असतात.

टमाटरचा औषधी उपयोग – Tomato Benefits in Marathi

 • टमाटर रक्ताल्पता दूर करते, बद्धकोष्ठता नाशक असते,
 • पोटाच्या रोगांना दुरुस्त करणारा असतो, अशक्तपणा हटवणारा असतो, पाचक असतो, तोंडाला रुची आणणारा असतो व कृमिनाशक असतो.
 • आंबट ढेकर, तोंडातील फोडं आणि हिरड्यातील पीडा यासाठी टमाटर गुणकारी असते.
 • टमाटरमध्ये लोह, क्षार, सायट्रिक आम्ल, कॅल्शियम, मॅगनीज, फॉस्फेट आणि विटामिन्स पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असतात.
 • ह्यातील लोह व तांब्याच्या भरपूर उपलब्धतेमुळे टमाटर रक्त साफ करते, रक्त घट्ट व लाल बनविते.
 • टमाटर, गाजर व बीटच्या एकत्रित रस रक्ताल्पता दूर करतो.
 • टमाटरच्या गराने चेहऱ्यावर मॉलिश केल्यास चेहेऱ्यावरील मुरूम व डाग मिटतात.
 • शारीरिक सौंदर्य टिकविण्यासाठी टमाटर सूप रोज घ्यावे. त्यामुळे त्वचा नितळ होते.
 • टमाटरमध्ये विटामिन ‘ए’ ची मात्रा अधिक असल्यामुळे ते डोळ्यासाठी चांगले असतात.
 • टमाटरच्या रसामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते.
 • भूक न लागणे किंवा अरुची असल्यास टमाटरच्या रसात थोडा आल्याचा व लिंबांचा रस टाकून घ्यावा, फायदा होतो.
 • टमाटरच्या रसात थोडी साखर व काळ्या मिऱ्याची पावडर टाकून घेतल्यास तृषा शात होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top