जगातील काही गुन्ह्यांसाठी दिलेल्या आगळ्या वेगळ्या शिक्षा, जाणून आपण होणार आश्चर्य चकित

Unusual Punishment

एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या हातून मुद्दाम होवो की चुकीने, गुन्हा तो गुन्हाच मानल्या जातो. आपल्याच देशात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही अपराधी व्यक्तीला होत असते, जगात अश्या काही शिक्षा सूनावल्या गेल्या आहेत, ज्या संपूर्ण जगात आगळ्या वेगळ्या मानल्या जातात, तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की त्या आगळ्या वेगळ्या शिक्षा कोणत्या आहेत, आणि कश्यासाठी ह्या शिक्षा सूनावल्या गेल्या आहेत. तर चला पाहूया जगातील काही आगळ्या वेगळ्या शिक्षांबद्दल.

जगातील न्यायालयाच्या आगळ्या वेगळ्या शिक्षा – International Court Unusual Punishment

Unusual Punishment
Unusual Punishment

कोणी चोरी केली किंवा एखाद्या बँकेत दरोडा घातला तर त्याला काही वर्षांची कोठडी होते, म्हणजेच त्या व्यक्तीला जेल मध्ये जावे लागते. या प्रकारच्या शिक्षा बहुतेक करून पाहायला मिळतात, आणि प्रत्येक न्यायालय अश्या प्रकारच्या शिक्षा सुध्दा देतंच. पण काही प्रसंगामध्ये न्यायालय घडलेल्या गोष्टीला समजून त्या व्यक्तीने त्याच प्रकारचे कृत्य पुन्हा करू नये यासाठी सुध्दा काही शिक्षा दिल्या आहेत.

स्पेन मधील इंडलोसिया या शहरातील एक कुटुंब आपल्या परिवारात आपल्या २५ वर्षाच्या एका मुलाला त्याची पॉकेटमनी देत नाही, आणि या गोष्टीवर भडकून तो मुलगा आपल्या आई वडिलांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करतो, त्यानंतर त्या न्यायालयात ही केस बरेच दिवस चालल्या नंतर या केसमध्ये मुलाच्या आई वडिलांना मोकळे सोडल्या जातं परंतु त्या मुलाला न्यायालय शिक्षा देते, की येत्या ३० दिवसांच्या आतमध्ये त्याने त्याच्या आईवडिलांचे घर सोडावे. आईवडिलांच्या घरात त्याला राहायला मिळणार नाही, त्याने स्वतः आपल्या पायावर उभे राहावे, आणि स्वतःची उपजीविका भागवावी.

फक्त हीच गोष्ट नाही तर अश्या आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतील, अशीच एक आणखी गोष्ट ती म्हणजे अमेरिकेच्या ओकलाहोमा मध्ये राहणाऱ्या १७ वर्षाच्या एका टाइलर एलरेड या मुलाच्याने मद्यपान करून गाडीचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याच्या मित्राचा बळी गेला, आणि जेव्हा ही केस न्यायालयात पोहचली तेव्हा तो हायस्कुल चे शिक्षण घेत होता.

ही गोष्ट २०११ या सालीची आहे, तेव्हा न्यायालयाने त्याला शिक्षा देताना सांगितले की शाळेचे शिक्षण पूर्ण करत पदवीचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आणि एका वर्षापर्यंत काही ड्रग्स च्या चाचण्या आणि मद्यपान चाचण्या कराव्या लागतील, सोबतच एक वर्ष दररोज चर्च मध्ये जाण्याची शिक्षा सुनावली होती.

ही शिक्षा सुध्दा त्या मुलामध्ये बदल घडविण्यासाठी त्याला दिलेली होती. जेणेकरून तो चांगल्या वळणावर येऊन एक सुजाण नागरिक बनून आपले जीवन जगणार. याचप्रकारे अमेरिकेतील डेविड बेरी नावाच्या व्यक्तीने अनेक हरीणींची शिकार केली होती आणि २०१८ ला त्या व्यक्तीला न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावत महिन्यातून एकदा डिसनी चे बाम्बी कार्टून पाहण्याची सुध्दा शिक्षा सुनावली होती.

ही सुध्दा एक आगळी वेगळी शिक्षा सूनवल्या गेली होती, यामध्ये त्या व्यक्तीला कार्टून पाहण्याची शिक्षा दिल्या गेली, बाकी न्यायालयात आपल्याला वर्षानुवर्षे अश्या केसेस लांबणीवर जाताना दिसतात, हीच केस अशी नाही तर अजून एक केस अशी होती ज्यामध्ये शिक्षा थोडीशी वेगळीच होती.

२००८ मध्ये एंड्रयू वेक्टर नावाच्या व्यक्तीने आपल्या कारमध्ये मोठ्या आवाजात त्याच्या पसंतीचे रॅप गाणे ऐकले. आणि जेव्हा ही केस न्यायालयात गेली तेव्हा न्यायालयाने त्या व्यक्तीला १२० पाउंड चा दंड ठोठावला. सोबतच न्यायालयाने आणखी एक शिक्षा सुनावली की जर १२० पाउंडचा दंड भरता येत नसेल तर ३० पाउंडचा दंड भरून दिवसाला २० घंटे क्लासिकल संगीत ऐकावे. अशी शिक्षा सुनावल्या गेली.

तर आजच्या लेखात आपण न्यायालयाने दिलेल्या काही अजब गजब शिक्षांविषयी पाहिले, आशा करतो आपल्याला लेखात लिहिलेल्या ह्या आगळ्या वेगळ्या शिक्षांविषयी दिलेली माहिती आवडली असेल आपल्याला ही दिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top