“वटपौर्णिमेच्या मागे आहे हि पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल”

Vat Purnima Marathi Mahiti 

आपल्या पतीला दिर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं या करीता हिंदु संस्कृतीत सुवासीनी वटपौर्णिमेची पुजा करतात.

हिंदु संस्कृतीचे अध्ययन केले असता असे लक्षात येते की अनेक सण परंपरा या निसर्गाशी जोडलेल्या आहेत. प्राण्यांना, वृक्षांना देवाच्या स्थानी विराजमान केले आहे. उदा. नागपंचमी (नागाची पुजा), पोळा (बैलाची पुजा), वसुबारस (गायीची पुजा), वटपौर्णिमा (वडाच्या वृक्षाची पुजा), गुडीपाडव्याला (कडुलिंबाच्या आणि आंब्याच्या पानांचे महत्व), दसऱ्याला (आपटयाच्या पानांचे महत्व)

वड, पिंपळ, कडुनिंब या वृक्षांना दिर्घायुष्य मिळालेलं आहे आणि आयुर्वेदात देखील त्याचे महत्व सांगितले आहे आणि या झाडांना पुजेत स्थान दिल्यामुळे त्यांची वाढच होते त्यांना कापण्याचा सहसा विचार केल्या जात नाही म्हणुन देखील या वृक्षांना पुजेत महत्व दिलेलं आहे.

वट सावित्रीच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करतात, त्याला धागा गुंडाळतात आणि त्याच्या छायेत वेळ घालवतात. साहजिकच निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने त्यांना सुखाची अनुभुती होते.

वटपौर्णिमेविषयीची माहिती – Vat Purnima Information In Marathi 

Vat Purnima Information in Marathi
Vat Purnima Information in Marathi

वटपौर्णिमेची पौराणिक कथा – Vat Purnima Story in Marathi

फार पुर्वी भद्र देशात अश्वपती राजा राज्य करायचा त्याला एक सुंदर कन्या होती तीचे नाव सावित्री. सावित्री विवाहयोग्य झाल्यावर राजाने तिला तीचा जोडीदार निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवानाची निवड केली. सत्यवान शाल्व राज्यातील धृमत्सेन राजाचा मुलगा होता. धृमत्सेन राजा आणि त्याची राणी हे अंध होते.

सत्यवान अल्पायुषी असल्याची नारदांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सावित्रीला तिच्या निर्णयापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तीने सत्यवानाशीच विवाह केला.

शत्रुसोबत युध्दात अपयश आल्याने धृमत्सेन राजा आपल्या परिवारासमवेत जंगलात वास्तव्य करीत असे. सावित्री विवाहानंतर सत्यवानासमवेत जंगलात वास्तव्याला आली आणि आपल्या पतिसमवेत आपल्या अंध सासूसासर्यांची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यु समिप आल्याचे कळताच सावित्रीने कठीण असे सावित्री व्रत आरंभिले न खातापिता ती परमेश्वराचा धावा करू लागली. सत्यवान जेंव्हा लाकडे तोडण्याकरता निघाला त्यावेळी सावित्री देखील त्याच्या मागोमाग निघाली लाकडे तोडतांना त्याला भोवळ आली आणि तो खाली कोसळला.

यमराजा त्याचे प्राण घेण्याकरता आला आणि प्राण घेउन निघाला त्याच्या मागोमाग सावित्री पतिचे प्राण परत घेण्याकरता निघाली. यमराजाने तिला माघारी फिरण्यास सांगितले परंतु तिने नकार दिला. आपल्या पतिचे प्राण परत करण्याकरता ती दयायाचना करू लागली.

यमाने तिला पति सोडुन तीन वर मागण्यास सांगितले त्यावेळी सावित्रीने आपल्या अंध सासूसासर्यांकरीता दृष्टी मागीतली, त्यांचे राज्य परत मागीतले, आणि आपल्याला पुत्र व्हावा हा तिसरा वर मागितला. यमाने घाईघाईत तीला तथास्तु असा वर दिला आणि त्याक्षणी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.

सावित्रीची पतिनिष्ठा पाहुन यमराजा देखील आश्चर्यचकीत झाला आणि कधीही आपल्या निर्णयापासुन न फिरलेला यम त्या दिवशी सावित्रीच्या पतिनिष्ठेपुढे झुकला आणि सत्यवानाचे प्राण परत केले. ज्येष्ठ मासातील पौर्णिमा ही “वटपौर्णिमा’’ म्हणुन ओळखली जाते. सावित्रीसह ब्रम्हा ही या व्रतातील मुख्य देवता आहे.

सावित्रीला सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली पुन्हा प्राप्त झाल्याने स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करतात. वस्त्र, फळं, फुलं वडाला वाहुन भक्तिभावाने आपल्या पतिच्या दिर्घायुष्याकरीता आराधना करतात.पर्यावरणाच्या दृष्टीने देखील वडाच्या झाडाचे अतिशय महत्व असुन या झाडाचा विस्तार देखील खुप होतो या झाडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील पुजेमागचा हेतु असु शकतो.

तर हि होती वटपौर्णिमेच्या मागची कहाणी आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here