Sunday, December 10, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

माहिती आहे का, झोपण्याचे सुध्दा पैसे मिळतात!

Mattress Startup

झोप आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग आहे. आणि त्यावर आपले बरेचशे आरोग्य अवलंबून आहे. जर आपली झोप पूर्ण होत नसेल तर आपल्याला बरेचश्या आजारांचा सामना करावा लागतो. आणि काही लोकांना तर झोप एवढी प्रिय असते की ते तासोंतास झोपून राहू शकतात. आणि आपण जर तासोंतास झोपून राहणाऱ्यांपैकी असणार तर आपल्याला बरेचदा एक प्रश्न पडला असेल तो म्हणजे जर मला झोपायचे पैसे मिळाले असते तर किती छान झाले असते ना?

पण तेच एकीकडे जर आपल्याला कोणी झोपण्यासाठी खरच पैसे देत असेल तर, हो एका कंपनीने हा स्टार्टअप सुरू केला आहे, १०० दिवस दररोज ९ तास झोपुन लाखो रुपये कमावण्याचा. तर आजच्या लेखात आपण ह्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला पाहूया.

माहिती आहे का, झोपण्याचे सुध्दा पैसे मिळतात – Sleep and Earn Money

Wakefit Startup
Wakefit Startup

कोणत्या कंपनीने हा स्टार्टअप सुरू केला आहे? – Which Company started this startup

कर्नाटक ची राजधानी बँगलोर येथील Wakefit.co ह्या कंपनीने हा नवीन स्टार्टअप सुरू केला आहे. ह्या कंपनीचे म्हणणे आहे की आपल्याला १०० दिवस दररोज रात्री ९ तास झोपणाऱ्या व्यक्तीला ही कंपनी १ लाख रुपये देणार आहे. या प्रोग्रॅम ला त्यांनी वेकफिट स्लिप इंटरशीप असे नाव दिले आहे. या प्रोग्रॅम साठी निवडले गेलेल्या व्यक्तींना १०० दिवस दररोज ९ तास झोपावे लागणार आहे.

एखाद्या कंपनीमध्ये जर आपण झोपताना आढळून आलात तर आपल्याला ती नोकरी गमवावी लागते पण या कंपनी मध्ये आपल्याला झोपण्यासाठी पैसे मिळणार आहेत पण यासोबतच कंपनीच्या काही अटींचे सुध्दा अनुसरण करावे लागेल.

काय आहेत कंपनीच्या अटी? – What are the Terms of the Company

सर्वात आधी तर ज्यांना या प्रोग्रॅम मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी या कंपनीच्या वेब साईट ला जाऊन प्रोग्राम साठी अप्लाय करायचे आहे त्यांनंतर आपल्याला त्या कंपनीला एक व्हिडिओ पाठवायचा आहे ज्यात आपल्याला सांगायचे आहे की आपल्याला झोप घेणे किती आवडते. त्यानंतर आपल्याला या प्रोग्राम साठी निवडण्यात येणार आणि तुम्हाला काही अटींचे पालन करून या प्रोग्राम मध्ये पूर्णपणे सहभागी होता येईल.

पहिली अट अशी की आपल्याला कंपनीने दिलेल्या अंथरुणावर झोपावे लागणार आहे. तेही स्लिप ट्रॅकर ला घालून. त्यांनंतर कंपनीच्या जाणकार लोकांसोबत होणाऱ्या सेशन मध्ये आपल्याला भाग घ्यावा लागणार आहे, त्यांनंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींचे पालन त्यांनी सांगितल्या प्रमाणे करावे लागणार आहे.

स्लिप ट्रॅकर काय करणार? – What is Slip Tracker 

या स्टार्टअप मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या हाताला स्लिप ट्रॅकर बांधण्यात येते. आणि स्लिप ट्रॅकर माणसाचा झोपण्या आधीचा आणि झोपण्या नंतरचा एक पॅटर्न रेकॉर्ड करेल ज्यामुळे माणसाला झोप किती आवश्यक आहे. हे या ट्रॅकर च्या मदतीने आपल्याला कळून येईल.

कंपनी चा उद्देश काय आहे? – Purpose of the Company

वेकफीट ही एक ऑनलाईन स्लिप सोल्युशन कंपनी आहे आणि या कंपनीने हा नवीन स्टार्टअप सुरू केला आहे. या कंपनीचा उद्देश या मागे काही निराळा नसून याद्वारे ते लोकांना सांगू इच्छितात की झोप आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण जर पुरेपुर झोप घेतली तर आपल्या शरीर चांगल्या प्रकारे कार्य करते आणि या प्रोग्राम द्वारे ते लोकांना १ लाख रुपये देणार आहेत. फक्त प्रोग्राम मध्ये भाग घेतलेल्या व्यक्तीने १०० दिवस दररोज ९ तास झोप घ्यावी लागेल तेही कोणत्याही कॉम्प्युटर किंवा मोबाईल चा वापर न करता.

तर आपण वरील लेखात पाहिले की कोणती कंपनी आपल्याला झोपण्याचे पैसे देऊ शकते, तर आशा करतो आपल्याला या लेखातून योग्य प्रकारे माहिती मिळाली असेल आणि आपल्याला हा लेख आवडला असेल, आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

KFC Colonel Sanders Story
Startup

KFC चे संस्थापक “कर्नल सैंडर्स” यांची कहाणी

मित्रांनो अशी उदाहरणं आपण किती पाहीली आहेत की ज्याला सगळं सेट,  अर्थात आयतं, काहीही कष्ट न करता मिळालं आणि तो...

by Editorial team
October 11, 2022
McDonald's Story
Startup

McDonald’s च्या यशाची कहाणी

बरेचदा आयुष्यात आपण एखादे काम किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करतो तेव्हां आपल्याला पुसटशी देखील कल्पना नसते की भविष्यात या...

by Editorial team
October 11, 2022
Woman Start Salad Business
Business

लाखो रुपये कमविते हि महिला, पहा काय करते.

Woman Start Salad Business रोजच्या जेवणातील एक पदार्थ तो म्हणजे सलाद. वेगवेगळ्या कच्च्या भाज्यांचं मिश्रण करून त्यांना बारीक चिरून मीठ...

by Editorial team
October 15, 2020

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • नोकरी
  • योजना
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved