• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, August 19, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

वारणा नदीची माहिती

Warana Nadi

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून वाहणारी वारणा नदी दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी मानली जाते.

वारणा नदी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या महत्वाच्या उपनद्यांपैकी एक आहे; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांची वरदायिनी आहे.

वारणा नदीची माहिती – Warana River Information in Marathi

Warana River Information in Marathi 
Warana River Information in Marathi
नदीचे नाव वारणा
उगमस्थानप्रचितगड (सहयाद्री पर्वतरांगा), जि. सांगली, महाराष्ट्र.
उपनद्याकडवी, मोरणा
प्रकल्प (धरण)चांदोली धरण, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर, महाराष्ट्र.

सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरात असलेल्या प्रचितगड येथून वारणा नदीचा उगम आहे.

उगमाजवळून खाली वाहत आल्यावर ती मार्ग-बदल करून दक्षिणमुखी होऊन पुढे मार्गक्रमण करते. पुढे तिचे स्वरूप पालटून ती धबधब्याच्या रूपात वाहते.

जावळी, आंबोळे या गावांच्या उत्तर बाजूला ती धबधब्याचे रूप घेऊन ‘कंदारडोह’ या गोलाकार खोल तळ्यामध्ये उडी घेते.

उत्तर बाजूस आष्टा डोंगररांगा आणि दक्षिण बाजूस पन्हाळ्याच्या डोंगररांगा यांमधील प्रदेशात वारणा नदीचे खोरे विसावले आहे. कंदारडोहाजवळ या नदीचे पात्र गोट्यांनी भरलेले आणि उथळ स्वरूपाचे आहे.

परंतु त्यानंतर मात्र वारणा नदीचे पात्र रुंद, विस्तृत झालेले पाहायला मिळते. यानंतर ती पूर्ववाहिनी होते.

वारणा नदीची माहिती – Warana River Mahiti

सांगली जिल्ह्यातील कडवी आणि मोरणा ह्या वारणेच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. याव्यतिरिक्त अंबार्डी, अंवीर (कडवी नदीचा ओढा), आंबरडी (कडवी नदीचा ओढा) कडवी, कांद्रा (कडवी नदीचा ओढा), कनसा, पोटफुगी (कडवी नदीचा ओढा), मोरणा, शर्ली हे वारणेच्या उपनद्या आणि ओढे आहेत.

मार्गक्रमणा करीत-करीत सांगलीजवळील हरीपूर येथे ती कृष्णा नदीत विलीन होते. वारणा-कृष्णेच्या संगमाजवळ निसर्गरम्य वातावरणात नदी किनारी संगमेश्वर नावाचे शिव मंदिर आहे.

कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर चांदोली या ठिकाणी वारणा नदीवर एक मोठे धरण बांधले आहे.

चांदोली किंवा वारणा या नावाने हे धरण ओळखल्या जाते. या धरणातील पाण्याचा उपयोग जलसिंचनासाठी होऊन मोठे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली राष्ट्रीय उद्यान असून धरणाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात.

वारणा नदी विषयी विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Warana River

प्रश्न. वारणा नदीचा उगम कोठे होतो?

उत्तर: सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरात असलेल्या प्रचितगड येथे.

प्रश्न. वारणा किंवा चांदोली हे धरण कोणत्या जिल्हात आहे?

उत्तर: कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांच्या सीमेवर चांदोली या ठिकाणी वारणा नदीवर हे धरण बांधले आहे या धरणाचा या दोन्ही जिल्ह्यात समावेश होतो.

प्रश्न. वारणा धरणाच्या परिसरात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?

उत्तर: चांदोली राष्ट्रीय उद्यान.

प्रश्न. वारणा कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? 

उत्तर: कृष्णा नदीची.

प्रश्न. वारणा आणि कृष्णा एकमेकांना कोठे मिळतात?

उत्तर: हरिपूर, जि. सांगली.

Editorial team

Editorial team

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved