टाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय असते? आणि ते करणे शक्य आहे की अशक्य?

Time Travel Information 

आपण बरेचशे हॉलीवूड चित्रपट बघितले असतील त्यामध्ये आपल्याला टाईम ट्रॅव्हलिंग केल्याचे दाखवण्यात येते. आणि त्यामध्ये कलाकार आताच्या काळातून मागील काळात जाताना आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. तसेच आताच्या काळातून भविष्यात जाताना दिसतात परंतु हे सर्व सत्य आहे की असत्य? असेही होऊ शकते का, की लोक भविष्यातून वर्तमानात येऊ शकतील आणि वर्तमानातून भविष्यात किंवा भूतकाळात जाऊ शकतील.

तर आजच्या लेखात आपण काही तथ्य घेऊन ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न करणार आहोत. आशा करतो आपल्याला लिहिललेला लेख आवडणार तर चला पाहूया..

टाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय असते? – What is Time Travel 

What is Time Travel
What is Time Travel

टाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे एकप्रकारे वर्तमानातून भविष्यात किंवा भूतकाळात जाणे होय. म्हणजेच एक प्रकारे वेळेला मागे टाकून आपण पुढे किंवा मागे जाणे त्याला आपण टाईम ट्रॅव्हलिंग म्हणू शकतो.

टाईम ट्रॅव्हलिंग शक्य की अशक्य? – Time Travel is Possible or Not 

विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर कोणतीही गोष्ट ही अशक्य तोपर्यंतच असते जोपर्यंत ती गोष्ट वास्तवात होत नाही. म्हणजेच अश्यक्य नावाची गोष्ट विज्ञान मानतच नाही. कारण या संपूर्ण ब्रह्मांडात कोणत्याही गोष्टीची संभाव्यता असतेच. कोणतीही गोष्ट शक्य आहे. आणि आपण जर टाईम ट्रॅव्हलिंग विषयी बोलत आहोत तर अश्या भरपूर घटना आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये लोकांनी अचानक भूतकाळात किंवा भविष्यात गेल्याचे दावे केले आहेत. त्यापैकी आपण काही गोष्टी पाहूया

  • १९११ मध्ये सर्वात आधी चारोलेट ऐने मोबेरली आणि ऐलेनोर जॉर्डन यांनी एक पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकाचे नाव होते ऐन एडवेंचर या पुस्तकात त्यांनी लिहिले होते की ते प्रवास करता करता अठराव्या शतकात गेले होते. पण लोकांनी या गोष्टीला मनाने बनविल्या गोष्टींसारखे पाहिले. पण यानंतर सुध्दा बऱ्याच लोकांनी टाईम ट्रॅव्हलिंग चे दावे केले होते.
  • २००६ मध्ये सुध्दा स्वीडन च्या हॉकन नोर्डक्विस्ट नावाच्या एका व्यक्तीने दावा केला होता की तो भविष्यात समोर जाऊन आला आहे आणि त्याने ७० वर्षाच्याहॉकन नोर्डक्विस्ट म्हणजे स्वतःला भविष्यात पाहिले आणि त्याने ते फोटो इंटरनेट वर सुध्दा टाकले होते आणि ह्याविषयी तेव्हा खूप गोंधळ उडाला होता. यानंतर सुध्दा अश्या बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या.

विज्ञानाचे याविषयी काय मत आहे – What does science think about this

१९१५ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी थेरी ऑफ रिलेटिविटी संपूर्ण जगासमोर मांडली होती ज्यामध्ये त्यांनी वेळ आणि वेग या दोघांमधील संबंध सांगितला होता. जर आपल्याला कमी वेळात जास्त अंतर पार करायचे असते तर आपल्याला आपला वेग वाढवावा लागतो वेग वाढवला तर कमी वेळात जास्त अंतर पार करता येत असते.

तसेच टाईम ट्रॅव्हलिंग विषयी आहे जर आपण आपला वेग हा वेळेपेक्षा जास्त वाढवू शकलो तर आपण सुध्दा टाईम ट्रॅव्हलिंग हमखास करू शकतो. आणि या थेरी वर खूप वैज्ञानिकांनी संशोधन केले असता त्यांना सुध्दा हेच अनुमान मिळाले की टाईम ट्रॅव्हलिंग शक्य आहे.

तर वरील लेखात आपण पाहिले की टाईम ट्रॅव्हलिंग शक्य आहे की अशक्य. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here