जगातील सर्वात मोठा गीता ग्रंथ भारतात. वजन आहे ८०० किलो.

World’s Largest Bhagavad Gita

हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथामधील एक ग्रंथ म्हणजे श्रीमद् भगवत गीता. संपूर्ण जीवनाचे सार आपल्याला श्रीमद् भगवत गीते मध्ये पाहायला मिळते. कित्येक वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने जी भगवत गीता अर्जुनाला जीवनाविषयी बोध देण्यासाठी सांगितली गेली होती.

ती भगवत गीता आज लोकांसाठी एक ग्रंथाच्या रुपात जीवन आणि मृत्यू यांच्या विषयी असलेल्या मनुष्याच्या विचारांना स्पष्ट करण्याचे काम करते. असे नाही कि हा ग्रंथ फक्त हिंदू धर्माच्या लोकांसाठी आहे, या ग्रंथाद्वारे संपर्ण मानव जाती ला जीवनाविषयी बोध देण्याचे कार्य केले गेले आहे.

बरेच जणांच्या घरी हा पवित्र ग्रंथ असतो, बरेच लोक याचे पठण सुद्धा करतात, पण आपल्या घरी जी भगवत गीता आहे तिचा आकार किती मोठा आहे, किंवा ती वजनाने किती भारी आहे. आपल्याला माहित असेलच, कोणाकडे छोटी किंवा मोठी भगवत गीता असते, पण जगात सर्वात मोठी भगवत गीता आहे आणि तिचे वजन जवळ जवळ ८०० किलो एवढे आहे. तर हि भगवत गीता कोठे आहे, कशी आहे आणि या विषयीच्या आणखी प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत,

तर चला जाणून घेवूया या अवाढव्य भगवत गीते विषयी.

जगातील सर्वात मोठी श्रीमद् भगवत गीता. वजन आहे ८०० किलो – World’s Largest Bhagavad Gita

World's Largest Bhagavad Gita
World’s Largest Bhagavad Gita

जगातील सर्वात मोठी भगवत गीता कोठे आहे? – Where is the largest Bhagavad Gita in the world?

जगातील सर्वात मोठी भगवत गीता हि आपल्या देशात आहे, आपल्या देशात हि भगवत गीता दिल्ली शहराच्या इस्कॉन च्या मंदिरात ठेवलेली आहे, या भगवत गीतेला संपूर्ण इस्कॉन संस्थांनी मिळून ईटली येथील इस्कॉन संस्थेत बनविले गेले होते. आणि या पवित्र ग्रंथाला त्यांनी पवित्र मंदिरात ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

त्या नंतर इटली वरून या भगवत गीतेला जहाजाच्या माध्यमाने भारतच्या गुजरात येथे आणल्या गेले, आणि तेथून या अवाढव्य ग्रंथाला दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात ठेवल्या गेले.

या ग्रंथाचे एकूण वजन हे ८०० किलो आहे. सोबतच या ग्रंथाला बनविण्यासाठी सिंथेटिक कागद सोने,चांदी, आणि प्लॅटिनम अश्या वेगवेगळ्या धातूंचा वापर करून बनविले गेले आहे.

आपल्याला जाणून आश्यर्य होईल कि या ग्रंथाचे एक पान पलटण्यासाठी चार लोकांची गरज असते.  या ग्रंथाला बनविण्यासाठी दीड करोड रुपयांचा खर्च लागला होता.

या ग्रंथामध्ये एकूण ६७० पानांचा समावेश आहे, जर आपण या ग्रंथाचे आक्रमण पाहिले तर या ग्रंथाची लांबी १२ फुट आणि ९ फुट अरुंद आहे, जगात यापेक्षा मोठी भगवत गीता कोठेही पाहायला मिळत नाही. या भगवत गीतेला बनविण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागला.

या ग्रंथाच्या कवर पेजवर भगवान कृष्ण आणि अर्जुनाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. या कवर पेज ला बनविण्यासाठी कार्बन फायबर चा वापर केला जातो. जो कृत्रिम उपग्रह निर्माण करण्यासाठी वापरला जातो.

या भगवत गीतेसारखी जगात कोणतीही दुसरी भगवत गीता नाही म्हणून या गीताला जगातील सर्वात मोठी भगवत गीता म्हटले गेले आहे.

इस्कॉन म्हणजे काय? – What is Iskcon

इस्कॉन म्हणजे (International Society for Krishna Consciousness) भगवान कृष्णाला मानणारे आणि त्यांच्या उपदेशांवर चालणाऱ्या काही लोकांचा एक समुदाय. या समुदायाचे लोक संपूर्ण जगात राहतात, संपूर्ण जगात इस्कॉन च्या समुदायाने भगवान कृष्णाचे मंदिर बांधले आहेत.

या समुदायाचे लोक दरवर्षी आपल्या देशात असेलेल्या इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी येतात, जगात या समुदायाचे लोक बऱ्यापैकी आहेत.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख कसा वाटला सोशल मिडीयावर कळवायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here