Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भारतातील प्रसिद्ध यमुना नदीविषयीची माहिती

Yamuna Nadi Mahiti

यमुना पुराणकाळापासुन गंगे सोबत वाहते आहे. हिला हिंदु संस्कृतित अत्यंत पवित्र मानल्या गेलं आहे. उत्तर भारतातुन वाहणाऱ्या मोठया नदयांमधे यमुनेची गणना होते. यमुनेची लांबी जवळपास १३७६ कि.मी आहे. गंगेची सर्वात सहाय्यक नदी म्हणुनही हीची ओळख आहे.

आपल्या भागातील इतर नदयांसारखी यमुना पुर्वेकडे वाहात जाते, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात संपन्न औद्योगिक क्षेत्राकरता यमुना पाण्याचा एक मुख्य स्त्रोत आहे. तिच्यावर अधिक अवलंबुन असणं आणि आपल्या बेजवाबदार वर्तणुकीने यमुनेचे पाणी आता पर्यावरणाकरता घातक बनत चाललं आहे.

भारतातील प्रसिद्ध यमुना नदी – Yamuna River Information in Marathi

Yamuna River Information in Marathi

यमुना नदीविषयीची माहीती – Yamuna River Mahiti

नदी किनारी ज्या महत्वाच्या संस्कृती उदयाला आल्या त्यांनी बऱ्याच लोककथांमधे आणि इतिहासात यमुनेचं वर्णन केल्याचं आढळतं. दिल्लीतल्या मध्ययुगीन साम्राज्याचा अर्थात मोगल साम्राज्याचा यमुनेच्या पाण्यानं विस्तार झाला. एवढच काय तर आगरा, इलाहाबाद, फतेहपुर,  आणि दिल्ली सारख्या शहरांचं अस्तित्वच यमुनेमुळे आहे. जगातल्या सात आश्चर्यापैकी आग्र्याचा  ताजमहाल यमुनेच्या तिरावरच बनवण्यात आला आहे.

ऋग्वेदात यमुनेचं वर्णन आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं, यमुनेला भगवान शिवामुळे रंग प्राप्त झाल्याची सुध्दा आख्यायिका आहे, देवी सतीच्या मृत्युने शोकाकुल झालेले भगवान शिव शोकमग्न अवस्थेत भटकत भटकत यमुनेतिरी आले असता यमुनेनं त्यांच सगळं दुःख आपल्यात सामावुन घेतलं आणि स्वतःचा रंग काळा करून घेतला.

धार्मिक महत्व – Spiritual Importance

हिंदु धर्मीयांकरता यमुना अत्यंत पवित्र अशी नदी आहे, यमुना मृत्युदेवता यमाची बहीण! कृष्णजन्मा समयी वसुदेवानं दुथडी भरून वाहणारी यमुनाच पार केली होती. यमुनेच्या स्मरणार्थ यमुनोत्री मंदीराची निर्मीती करण्यात आली आहे जे अत्यंत महत्वाचं स्थान आहे. चार धाम यात्रेवेळी या मंदीराचे दर्शन आपल्याला होते.

इतका समृध्द इतिहास असुनही आज यमुना भारतातील सगळयात प्रदूषित नदी आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्ड ऑफ इंडिया च्या सर्वेनुसार यमुनेचा जवळपास ६०० कि.मी भाग आज प्रदूषित झालाय,  इतकच काय तर सगळयात जास्त कचरा यमुनेत दिल्ली शहरातुन टाकल्या जातो, आणि कचऱ्यासोबत चिखल आणि खराब झालेला भाजीपालाही यमुनेत प्रवेशतो तो या दिलवाल्यांच्या दिल्लीमध्येच. दिल्लीतल्या खालच्या भागात यमुना कचऱ्याने अक्षरशः स्तब्ध होउन तिची अवस्था आणखीन भयावह होऊन जाते.

सरकार स्तरावर यमुनेच्या स्वास्थ्यासंबधी अनेक मुद्दे उचलले जातात तरीही हा प्रश्न आजही अनुत्तरीत राहीला आहे आणि यमुनेची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे.

तर हि होती यमुना नदी विषयी माहिती आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर या माहितीला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.आणि जुळलेले राहा माझीमराठी सोबत,

धन्यवाद!

Previous Post

जाणून घ्या २३ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Next Post

जाणून घ्या खास उपवासाकरिता रेसिपी…. रगडा पॅटिस

Editorial team

Editorial team

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Ragda Pattice recipe in Marathi

जाणून घ्या खास उपवासाकरिता रेसिपी.... रगडा पॅटिस

24 March History Information in Marathi

जाणून घ्या २४ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Douglas Bader

हार न मानणारा योद्धा डगलस बॅडर यांची प्रेरणादायी कहाणी

How To Increase Breast Size

सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

25 March History Information in Marathi

जाणून घ्या २५ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved