Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

विश्वचषक हिरो युवराज सिंग 

Yuvraj Singh 

युवराज सिंग एक असा खेळाडु आहे ज्यावर भारतिय क्रिकेट ला गर्व आहे.

चंदीगड च्या या स्टाईलिश खेळाडुने भारताला अनेक सामने जिंकुन दिले आहेत आणि आपल्या खेळाच्या आक्रमक शैलीने तो ओळखला जातो.

त्याच्या चाहत्यांकरता युवराजचे आयुष्य म्हणजे एक खुले पुस्तक आहे. चला ! युवराज सिंग बद्दल काही जाणुन घेऊया!

Yuvraj Singh

विश्वचषक हिरो युवराज सिंग – Yuvraj Singh Information in Marathi

युवराज सिंग भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडु आहे. डाव्या हाताने फलंदाजी करणारा हा फलंदाज कमी गतीने गोलंदाजी देखील करू शकतो. युवराज पुर्वीचे भारतिय वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेता योगराज सिंह यांचा मुलगा आहे.

युवराज भारतिय क्रिकेट संघाचा सदस्य असुन ऑक्टोबर 2000 पासुन एकदिवसीय क्रिकेट खेळतो आहे.

त्याने ऑक्टोबर 2003 साली पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. 2007 ते 2008 पर्यंत युवराज भारतिय क्रिकेट संघाचा उप.कर्णधार होता.

युवराज सिंग 2011 च्या ICC क्रिकेट विश्वचषकात मॅन ऑफ दी टुर्नामेंट देखील राहिला आहे आणि ICC विश्व टी 20 चा उत्कृष्ट प्रदर्शन करणारा देखील ठरला आहे. त्याच्या योगदानामुळे भारताने दोनही (विश्व टी 20 आणि क्रिकेट विश्वचषक) जिंकला आहे.

Yuvraj Singh Biography

युवराज ने 2007 साली ICC विश्व टी.20 मधे इंग्लंड विरूध्द स्टुअर्ट ब्रॉड ला 6 चेंडुत 6 षट्कार मारले होते. असे पुर्वी 3 वेळा झाले होते परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे 2 कसोटी क्रिकेट संघांमधे असे नव्हते झाले आणि त्याच सामन्यात त्याने सर्वात जलद अर्धशतक देखील ठोकले होते.

युवराज ने केवळ 12 चेंडुत अर्धशतक बनविले होते.

2011 मधे युवराज ला डाव्या फुफ्फुसात कर्करोगाचा टयुमर झाल्याचे निदान झाले होते त्यावेळी युवराज किमोथेरेपी करीता बोस्टन आणि इंडिआनापलिस येथे गेला होता. 2012 च्या मार्च मधे युवराज च्या 3 किमोथेरेपी पुर्ण झाल्या आणि त्याला रूग्णालयातुन सुट्टी झाली.

तो एप्रील मधे भारतात परतला. सप्टेंबर मधे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात टी.20 सामन्यांकरता न्युझिलंड विरूध्द खेळण्यासाठी त्याचे पुनरागमन झाले.

युवराज ला 2012 मधे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ’’अर्जृन’’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2014 ला युवराजला ’’पद्मश्री’’ पुरस्काराने देखील गौरवान्वित केले आहे (हा भारताचा चैथा सर्वात मोठा पुरस्कार आहे).

2014 साली रॉयल चॅलेंजर बंगलोर ने युवराज ला IPL च्या लिलावात सर्वात महागडया खेळाडुच्या रूपात 14 करोड रूपयांना खरेदी केले. 2015 च्या IPL लिलावात दिल्ली डेयरडेविल्स ने युवराज ला 15 करोड रूपयांत खरेदी केले. 2016 ला IPL लिलावात सनरायजर हैदराबाद ने युवराज सिंग ला 7 करोड रूपयांमधे खरेदी केले.

युवराजचे पुर्वीचे व व्यक्तिगत जीवन – Early Life of Yuvraj Singh

युवराजचा जन्म पंजाब मधे झाला आहे. युवराज माजी क्रिकेटर योगराज सिंह आणि शबनम सिंह यांचा मुलगा आहे.

आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर युवराज आपल्या आईसोबत राहात होता. लहानपणी टेनिस आणि रोलर स्केटिंग युवराजचे आवडते खेळ होते आणि या दोनही खेळांमधे त्याची प्रगती चांगली होती.

युवराज सिंग ने आंतरराष्ट्रीय 14 वयोगटातील रोलर स्केटिंग स्पर्धा देखील जिंकलीये. त्यांच्या वडिलांनी मात्र त्याचे सगळे पुरस्कार फेकुन दिले आणि सांगितले होते की फक्त क्रिकेट वर लक्ष केंद्रित कर.

युवराज ला त्याचे वडिल रोज सरावाकरीता नेत असत. त्याने आपले शिक्षण DAV पब्लिक स्कुल चंदिगड येथुन पुर्ण केले बाल कलाकार म्हणुन त्याने अभिनय देखील केला आहे, मेहंदी सांगा दी आणि पुट सरदार मधे त्याने छोटी भुमिका केली आहे. 12 नोव्हेंबर 2015 ला हजेल कीच समवेत त्याचा साखरपुडा झाला होता.

खेळण्याची पध्दत – Playing style of Yuvraj Singh

युवराज सिंग डाव्या हाताने फलंदाजी करतो तर उजव्या हाताने गोलंदाजी.

त्यामुळे आपल्या कारकिर्दीत तो फार पुढे गेला, फिरकी गोलंदाजीपेक्षा वेगवान गोलंदाजी तो चांगल्या पध्दतीने खेळतो. 2005 सालचा इंडियन ऑईल चषक युवराज च्या कारकिर्दी ला वळण देणारा होता.

भारतिय संघाचा तो एक चांगला फिल्डर आहे कवर आणि पॉइंट वर तो चांगले क्षेत्ररक्षण करतो.

युवराज आक्रमक आणि वेगवान फलंदाज आहे त्याचा टी-20 त 150 पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट आहे आणि एकदिवसीय सामन्यात 90 पेक्षा अधिकचा आहे. क्रिकेट प्रेमी त्याला विस्फोटक फलंदाज देखील म्हणतात.

युवराज ज्यावेळी फॉर्म मधे असतो त्यावेळी अगदी सहजतेने तो चैकार आणि षट्कार मारतो त्यावेळी त्यांची फलंदाजी बघण्यात खुप मजा येते. 1999 पासुन युवराज एक चांगला क्षेत्ररक्षक आहे ज्याने सर्वात जास्त खेळाडु धावबाद केले आहे असे 2005 च्या अखेरीस क्रिकइन्फो (Cricinfo) ने प्रकाशित केलेल्या रिपोर्ट मधे सांगण्यात आले आहे.

विश्वचषक हिरो बद्दल काही विशेष गोष्टी – Facts about Yuvraj Singh

  1. युवराज ने स्टुअर्ट ब्रॉड च्या 6 चेंडुवर 6 षट्कार लगावले होते, त्याने मिळविलेल्या यशापैकी ही एक महत्वाची गोष्ट समजली जाते.
  2. युवराज ला लहानपणापासुन टेनिस आणि रोलर स्केटिंग ची आवड होती.
  3. रोलर स्केटिंग स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात त्याने चॅंपियनशिप देखील जिंकली आहे परंतु वडलांच्या आग्रहाखातर त्याला क्रिकेट खेळाकडे वळावे लागले.
  4. युवराजच्या फलंदाजीत त्याच्या वडिलांचा फार मोठा हात आहे. त्याचे वडिल त्याला ओल्या टेनिस चेंडुने नेटस् मधे शिकवीत असत जेणेकरून युवराज चेंडु ला योग्य वेळी मारू शकेल. त्याच्याकडुन रोज सराव करून घेत.
  5. लहान असतांना युवराज ELF वेंगसरकर क्रिकेट अकादमीत शिकण्याकरीता जात असत.
  6. युवराज चे चहाते त्याला ’’युवी’’ म्हणुन संबोधतात. ’’प्रिंस ऑफ इंडियन क्रिकेट’’ देखील त्याला म्हंटले जाते कारण त्याचा नावाचा अर्थ प्रिंस असा होतो.

Yuvraj Singh Mahiti

  1. अंडर 19 टिम मधे युवराज ने 358 या सर्वात जास्त धावा बिहार विरूध्द कोच बहार चषकात काढल्या होत्या.
  2. नंतर युवराज ने 1999 ते 2000 मध्ये हरियाणा विरूध्द रणजी ट्राफीत 149 धावा बनविल्या.
  3. युवराज हा माजी क्रिकेट खेळाडु योगराज सिंह यांचा मुलगा आहे.
  4. योगराज यांनी भारताकरीता 1 कसोटी सामना आणि 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. युवराज चा जन्म चंदिगड येथे 12 डिसेंबर 1981 ला झाला आहे.
  5. युवराज च्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर युवराज आई सोबत राहिला. आपले शिक्षण त्याने DAV पब्लिक स्कुल चंदिगड येथुन पुर्ण केले.
  6. नेटवेस्ट येथील अखेरचा सामना युवराज च्या कारकिर्दीतील ऐतिहासीक सामना होता.
  7. त्यावेळी कुणाला देखील विश्वास नव्हता की इंग्लंड विरूध्द लॉर्ड्स मैदानावर भारतिय संघ 326 धावांचे लक्ष्य पुर्ण करू शकेल. भारताची स्थिती नाजुक होती, अवघ्या 24 षट्कात 146 धावांवर 5 बाद झाले होते.
  8. त्यावेळी युवराज ला साथ देण्याकरीता मो. कैफ मैदानावर आला आणि दोघांनी मिळुन 121 धावा बनविल्या.
  9. युवराज ने एक बाजु भक्कमपणे सांभाळत 60 चेंडुत 69 धावा बनविल्या होत्या आणि त्याच्यामुळेच भारतिय संघाने हा सामना 2 गडी राखुन जिंकला होता.
  10. सचिन नंतर युवराज असा खेळाडु होता ज्याने काउंटी संघ यॉर्कशायर मधे भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
  11. युवराज ची सुरूवात चांगल्या धावांनीच झाली होती त्या टी 20 मधे युवराज ने 37 चेंडुत 71 धावा काढल्या लीस्टरशायर विरूध्द काढल्या होत्या. त्या संघात कैफ आणि सेहवाग देखील होते ज्यांनी टी 20 सामना खेळला होता.

Yuvraj Singh Mahiti

  1. या विश्वचषकात प्रवेश मिळवण्याकरीता भारतिय संघाला प्रयत्न करायचे होते.
  2. युवराज ने पहिल्या सामन्यात बांग्लादेश विरूध्द 47 धावा काढल्या होत्या परंतु भारतिय संघ तो सामना हरला.
  3. पुढच्या सामन्यात बर्मृडा विरूध्द युवराज ने 46 चेंडुत 83 धावा काढल्या त्यामुळे भारतीय संघ 413 अशी विशाल धावसंख्या उभी करू शकला.
  4. इंग्लंड विरूध्द विश्वचषकात त्याने 20 षट्कांच्या सामन्यात 12 चेंडुत अर्धशतक बनविले होते.
  5. आजवरचे हे सर्वात कमी चेंडुंमधले अर्धशतक होते. उपांत्यसामन्यात ऑस्ट्रेलिया विरूध्द त्याने 30 चेंडुत 70 धावा बनविल्या होत्या.
  6. त्या स्पर्धेत युवराज ने सर्वात लांब षट्कार ठोकला होता जो 119 मीटर एवढा होता.
  7. चेन्नईत 2008 साली पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड ला हरविण्याकरता युवराजने नाबाद 85 धावा काढल्या व सचिन सोबत 163 धावांची भागिदारी खेळली.
  8. आजही युवराज च्या आवडत्या सामन्यांमधे या सामन्याचा समावेश आहे.
  9. ICC अंडर 19 विश्वचषक 2000, टी 20 विश्वचषक 2007, आणि विश्वचषक 2011 अश्या तीन चषकांमधे भाग घेणारा युवराज पहिला खेळाडु ठरला.
  10. भारताने हे तीनही चषक जिंकले होते आणि हे चषक जिंकण्यात युवराजचे योगदान महत्वाचे होते. 2011 च्या विश्वचषकात युवराज मालिकावीर ठरलाय आणि 2011 च्याच विश्वचषकात तो 4 वेळा मॅन ऑफ दी मॅच देखील ठरला.

युवराज सिंगची माहिती – Yuvraj Singh Mahiti

  1. युवराज सिंग असा पहिला खेळाडु आहे ज्याने एकाच विश्वचषकात 300 पेक्षा जास्त धावा काढल्या आणि 15 विकेट देखील घेतल्या.
  2. टी 20 मधे 100 पेक्षा जास्त षट्कार मारणारा तो पहिला भारतिय ठरला आहे.
  3. 2014 मधे IPL सामन्यात त्ब्ठ ने युवराज ला 14 करोड रूपयांमधे विकत घेतले होते.
  4. त्यानंतर 2015 साली युवराज ला 16 करोड मधे विकत घेतले आणि 2016 साली IPL लिलावात तो सर्वात महाग खेळाडु ठरला.
  5. युवराज ला 2011 या वर्षात डाव्या फफ्फुसात कर्करोगाचे निदान झाले.
  6. किमोथेरपी करीता त्याला बोस्टन आणि इंडिआनापलिस येथे नेण्यात आले.
  7. मार्च 2012 मधे युवराज च्या 3 किमोथेरपींची सायकल पुर्ण झाल्यानंतर त्याला रूग्णालयातुन सुट्टी मिळाली आणि एप्रील दरम्यान तो भारतात परतला.
  8. 2012 साली युवराज ला राष्ट्रपतींव्दारे अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Yuvraj Singh History

  1. युवराज ला 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आणि त्याच वर्षी FICCI मोस्ट इन्सपायरिंग स्पोर्टमॅन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  2. युवराज सिंग ने स्वतःचे आत्मचरित्र लिहीले असुन ’’माय लाइफ: फ्रॉम क्रिकेटर टु कॅंसर एंड बॅक’’ असे त्याचे नाव आहे.
  3. लहानपणी युवराज ने बाल कलाकाराच्या रूपात पंजाबी चित्रपटांमधे अभिनय केला आहे.
  4. बॉलीवुड अनिमेटेड चित्रपट ’जंबो’ मध्ये युवराज चा आवाज वापरण्यात आला आहे.
  5. युवराज ला बरेचदा बॉलीवुड अभिनेत्रींसोबत पाहाण्यात आले आहे. भारतिय क्रिकेट संघाचा तो पोस्टर बॉय होता.
  6. दिपीका पादुकोण, किम शर्मा यांच्यासोबत त्याने ब.यापैकी काळ घालवला.
  7. हजेल किच या नव्या मैत्रिणी बरोबर सुध्दा त्याने डेटिंग केले आणि 12 नोव्हेंबर 2015 साली त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.
  8. कॅंसर या आजाराशी दोन हात केल्यानंतर युवराज सिंग ने एक NGO स्थापन केली ’’ You We Can’’ हे त्याच्या NGO चे नाव असुन येथे आजतागायत 100 पेक्षा जास्त कॅंसर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved