जाणून घ्या ११ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

11 April  Dinvishesh

मित्रानो, आजचा दिन राजनीतिक घटनांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी व स्वातंत्र्य कार्यकर्त्या कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिन. तसचं, आजच्या दिवशी सन १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची दोन गटात विभागणी झाली होती. याव्यतिरिक्त काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन, शोध या प्रकारच्या सर्व घटनांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ११ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 11 April Today Historical Events in Marathi

11 April History Information in Marathi

११ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 April Historical Event

 • सन १९१९ साली संयुक्त राष्ट्र संघटनेने युनोची विशेष संस्था अंतराष्ट्रीय श्रम संघटनेची स्थापना केली.
 • सन १९२१ साली सर्वप्रथम आकाशवाणीवर खेळाचे समालोचन करण्यात आलं.
 • सन १९३० साली उत्तर प्रदेश राज्यातील ऋषिकेश या शहरात स्टीलच्या तारांच्या साह्याने बनवण्यात आलेला लक्ष्मण झुला सर्व सामन्यांकरिता सुरु करण्यात आला.
 • सन १९७० साली अमेरिकन अंतराळ संस्था नासा ने चांद्रयान मोहिमेसाठी अपोलो-१३ या अंतराळ यानाचे प्रक्षेपण केलं.
 • सन १९८६ साली हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून सुमारे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला.
 •  सन १९९२ साली भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • सन २००० साली मूळ भारतीय अमेरिकन लघुकथा, कादंबरी व इंग्रजी निबंधकार व लेखिका निलंजना सुदेशना उर्फ “झुम्पा” लाहिरी यांना पुलित्झर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

११ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७५५ साली इंग्रज सर्जन, औषध निर्माता व विक्रेता, भूशास्त्रज्ञ, पॅलेओन्टोलॉजिस्ट आणि राजकीय कार्यकर्ते जेम्स पार्किन्सन यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८२७ साली भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जाती-विरोधी समाज सुधारक व लेखक महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८६९ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारक तसचं, स्वातंत्र्य चळवळीतील सक्रीय कार्यकर्त्या, महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८७ साली भारतीय कवी, संगीतकार,  तत्त्वज्ञानी कलाकार रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्ष व चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्मदिन.
 • सन १९०४ साली भारतीय चित्रपट क्षेत्रांतील पहिले सुपरस्टार नायक व गायक कुंदनलाल सेहगल यांचा जन्मदिन.
 • सन १९०६ साली भारतीय शब्दकोशकार तसचं, इंडो आर्यन व पॅनिनियन भाषातज्ज्ञ डॉ. सुमित्रा मंगेश कात्रे यांचा जन्मदिन.
 • सन १९३७ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांचा जन्मदिन.
 •  सन १९५१ साली प्रख्यात भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्मदिन.

११ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 April  Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९२६ साली प्रख्यात अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ तसचं, बागायती व कृषी विज्ञानाचे प्रणेते ल्युथर बरबँक यांचे निधन.
 • सन १९७७ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी साहित्यिक लेखक व कादंबरीकार फनिश्वरनाथ रेणू यांचे निधन.
 • सन २००९ साली पद्मभूषण व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी भाषिक कादंबरीकार व लेखक विष्णू प्रभाकर यांचे निधन.
 • सन २०१५ साली भारतीय परम विशिष्ट सेवा मेडल तसचं, महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित भारतीय लष्कर दलाचे जनरल हनुत सिंग यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top