जाणून घ्या ११ जुलै रोजी येणारे दिनविशेष

 11 July Dinvishes

मित्रांनो, आज जागतिक लोकसंख्या दिन. जगभर आज हा दिवस साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीच्या दृष्टीकोनातून लोकांना जागृत करण्यासाठी तसचं, लोकसंख्या वाढीचे होणारे दुष्परिणाम त्यांना पटवून देण्यसाठी हा दिवस साजरा केला जातो. जगाची लोकसंख्या ही दिवसांदिवस वाढतच चालली आहे. सन १९८९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमाच्या सभेत ११ जुलै हा दिवस जगातिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

याव्यतिरिक्त, मित्रांनो आजच्या दिवशी देशांत एक खूप मोठी दुर्दैवी घटना घडली होती. सन २००६ साली मुंबई मध्ये लोकल रेल्वेत बॉम्बस्फोट घडून सुमारे २०९ लोक मृत्युमुखी पडले होते. या विनाशकारी दुर्घटने मुळे संपूर्ण देश हादरून गेला होता.

जाणून घ्या ११ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 11 July Today Historical Events in Marathi

11 July History Information in Marathi
11 July History Information in Marathi

११ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 July Historical Event

 • इ.स. १६५९ साली मुघल सेनापती अफजलखान यांच्या सोबत युद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून निघून प्रताप गडावर गेले.
 • सन १९०८ साली लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा होऊन त्यांना मंडालेच्या तुरुगात कैद करण्यात आलं.
 • सन १९५० साली पाकिस्तान देश आंतरराष्ट्रीय नाणे निधी संघटनेचा सदस्य बनला.
 • इ.स. १९७९ साली अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा स्कायलॅब ही रात्रीच्या वेळेस हिंदी महासागरात कोसळली.
 • सन १९९४ साली दिल्लीच्या पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमॅन मॅगसेस पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • सन २००१ साली आगरतळा ते ढाका शहरादरम्यान बस सेवा सुरु करण्यात आली.
 • सन २००६ साली मुंबई मध्ये लोकल रेल्वे मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात २०९ नागरिक निधन पावले होते.
 • सन २०१० साली स्पेन देशाने नेदरलँड्स फुटबॉल संघाचा पराभव करून फुटबॉल विश्वचषक जिंकला.

११ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८५७ साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे अमरावती येथील अध्यक्ष सी. शंकरन नायर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८९ साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार, चित्रपट कथालेखक व सालीब  संपादक नारायण हरि आपटे यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९१ साली सुप्रसिद्ध संस्कृत व प्राकृत पंडित तसचं, भंडारकर प्राच्य संशोधन संस्थेचे प्रमुख अधिकारी परशुराम कृष्ण गोडे यांचा जन्मदिन.
 • सन १९०२ साली भारतीय शीख राजकीय नेता व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेता आणि भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह यांचा जन्मदिन.
 • सन १९२१ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक व दलित साहित्यिक तसचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचा जन्मदिन.
 • सन १९५३ साली गोवा राज्याचे प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री तसचं, गोवा राज्याचे मुख्यमंत्री सुरेश प्रभू यांचा जन्मदिन.
 • सन १९६० साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता कुमार गौरव यांचा जन्मदिन.

११ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 July Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १६३० साली कलकत्ता शहरात आलेली पहिली विदेशी महिला बेगम रेजाबिबेह सुकिएस यांचे निधन.
 • सन १९१२ साली  फ्रेंच नेत्र रोग विशेषज्ञ फर्डिनेंड मोनॉयर (Ferdinand Monoyer) यांचे निधन.
 • सन १९९४ साली परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचे निधन.
 • सन २००३ साली पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचे निधन.
 • सन २००३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कादंबरीकार, गुप्तकथा व लघुकथा लेखक तसचं, वृत्तपत्र स्तंभ व कविता लेखक सुहास शिरवळकर यांचे निधन.
 • सन २००९ साली महाराष्ट्रीयन मराठी भावगीत गायक व कवी शांताराम नांदगावकर यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here