11 September Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेली ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन आणि निधन वार्ता याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ११ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 11 September Today Historical Events in Marathi
११ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 September Historical Event
- इ.स. १८९३ साली अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी आयोजित प्रथम विश्व धर्म संमेलनात स्वामी विविकानंद यांनी भाषण केलं.
- सन १९०६ साली महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक भारतीयांच्या विरोधात स्थापन झालेल्या ट्रान्सवाल एशियाटिक अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी पहिला सत्याग्रह आयोजित केला.
- सन १९४१ साली अमेरिकेत पंचकोन(पेंटागॉन) बांधण्यास सुरुवात केली.
- सन १९६५ साली भारतीय लष्करी दलाने बुर्कीची लढाई जिंकली.
- सन १९९७ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने ७ नोव्हेंबर १९९६ साली पाठविलेले मार्सग्लोबल सर्व्हेअर अंतराळयान सन ११ सप्टेंबर 1997 रोजी मंगळावर पोहचले.
- सन २००१ साली इस्लामिक दहशतवादी संघटना अल-कायदाने अमेरिकेतील जगप्रसिद्ध इमारत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडली.
११ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८९५ साली देशातील भूदान चळवळीचे प्रणेता, महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी भारतीय राष्ट्रीय शिक्षक विनायक नरहरी उर्फ विनोबा भावे यांचा जन्मदिन.
- सन १९८३ साली विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
- सन १९०१ साली साहित्य अकादमी पारितोषिक विजेते प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक साहित्यकार व मराठी साहित्य संमेलन व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्मदिन.
- सन १९११ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकाविणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार लाला अमरनाथ यांचा जन्मदिन.
- सन १९१५ साली पुपुल जयकर भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखक पुपुल जयकर यांचा जन्मदिन.
- सन १९१९ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय राजस्थानी भाषिक कवी व लेखक कन्हैयालाल सेठिया यांचा जन्मदिन.
११ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 September Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९४८ साली ब्रिटीश कालीन भारतातील मुस्लीम लीगचे नेता व राजकारणी आणि पाकिस्तानचे संस्थापक व पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मुहम्मद अली जीना यांचे निधन.
- सन १९६४ साली प्रख्यात भारतीय हिंदी कवी, निबंधकार, साहित्यिक आणि राजकीय समीक्षक गजानन माधव मुक्तिबोध यांचे निधन.
- सन १९७१ साली सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सचिव व शीतयुद्धाच्या काळातील सोव्हियत युनियनचे नेतृत्व करणारे सर्वोच्च नेता निकिता ख़्रुश्चेव यांचे निधन.
- सन १९८७ साली ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण, पद्म विभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन.
- सन १९९८ साली भारतीय क्रीडा संघटक व शिक्षणमहर्षी, क्रिकेटपटू एन. डी. नगरवाला यांचे निधन.
मित्रांनो, वरील लेख हा आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती दर्शवित असल्याने आपण या लेखाचे वाचन करून हा लेख इतरांना देखील पाठवा. धन्यवाद.