जाणून घ्या १३ जून रोजी येणारे दिनविशेष

13 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी असणारे दिनविशेष पाहणार आहोत. जसे, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन, शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १३ जून रोजी येणारे दिनविशेष – 13 June Today Historical Events in Marathi

13 June History Information in Marathi
13 June History Information in Marathi

१३ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 June Historical Event

 • इ.स. १४२० साली जलालुद्दीन फिरोजशाह तुघलक दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले.
 • इ.स. १७३१ साली स्वीडिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली.
 • सन १९२७ साली अमेरिकन ध्वज अमेरिकेत पहिल्यांदा सस्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उजव्या हाताने प्रदर्शित केला गेला.
 • सन १९४० साली जालियान वाला बाग हत्याकांडाला कारणीभूत असलेले गव्हर्नर माईकल ओडवायर यांची हत्या करणारे भारतीय स्वातंत्र्यसेनानी उधमसिंग यांना लंडन मध्ये फाशी देण्यात आली.
 • सन १९४३ साली नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून टोकियो येथे पोहचले.
 • सन १९५६ साली पहिली युरोपीयन चॅम्पियन फुटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
 • सन १९८३ साली पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू ठरली.
 • सन १९९७ साली दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत सुमारे ५९ लोक मृत्यूमुखी पडले होते व जवळपास १०० लोक जखमी झाले होते.
 • सन २००० साली स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.

१३ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८७९ साली थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू व अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक वीर स्वातंत्र्यसेनानी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा जन्मदिन.
 • सन १९०५ साली भारत वंशीय इंग्लंड कसोटी क्रिकेटपटू दुलीपसिंहजी यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली भारतीय कम्युनिस्ट राजकारणी व सिद्धांतवादी तसचं, केरळ राज्याचे पहिले मुख्यमंत्री एलामकुलम माणक्कल शंकरन नंबूदरीपाद यांचा जन्मदिन.
 • सन १९२३ साली भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते प्रेम धवन यांचा जन्मदिन.
 • सन १९३७ साली भारतीय-अमेरिकन संगणक वैज्ञानिक राज रेड्डी यांचा जन्मदिन.
 • सन १९४४ साली कोरियन राजकारणी व मुत्सद्दी तसचं, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांचा जन्मदिन.
 • सन १९९४ साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाज खेळाडू दीपिका कुमारी यांचा जन्मदिन.
 • सन १९८० साली भारतीय साहित्यिक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, पटकथा लेखक आणि समाजशास्त्रज्ञ इंदू मेनन यांचा जन्मदिन.
 • सन १९८८ साली प्रख्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पदक विजेता पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू महिला श्वेता राठोरे यांचा जन्मदिन.

१३ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 June Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९५० साली भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ दिवाण बहादूर सर गोपाठी यांचे निधन.
 • सन १९६७ साली प्रसिद्ध भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचे निधन.
 • सन १९६९ साली भारतीय मराठी चित्रपट क्षेत्रांतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, मराठा संपादक व प्रख्यात वक्ते प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.
 • सन १९९० साली पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या पत्नी व पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम राणा लियाकत अली खान यांचे निधन.
 • सन १९९६ साली प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक पंडित प्राण नाथ यांचे निधन
 • सन २००८ साली भारतीय कामगार नेते, राजकारणी तसचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेता जे. चितरंजन यांचे निधन
 • सन २०१२ साली प्रसिद्ध गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top