जाणून घ्या १४ जून रोजी येणारे दिनविशेष

14 June Dinvishes

मित्रांनो, आज ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनर यांचा जन्मदिन. दरवर्षी त्यांचा जन्मदिन हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कार्ल लँडस्टीनर यांनी मानवी रक्ताचे नमुने घेऊन विविध रक्त गटांचा शोध लावला. याकरिता त्यांना नोबल पारितोषिक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. त्यांच्या या संशोधनामुळे आज आपण आपली रक्ताचे गट ओळखू शकतो. अश्या या महान संशोधकाची आठवण म्हणून तसचं, जगात रक्तदाना विषयी जनजागृती करण्यासाठी दर वर्षी १४ जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करतात.

रक्तदान केल्याने आपल्या शरीरात नवीन रक्त निर्माण होते शिवाय आपली प्रतिकार शक्ती देखील वाढते. आपण रक्तदान केल्यामुळे गरजू व्यक्तीच्या ते कमी येवू शकते, एखाद्या व्यक्तीचे आपण प्राण वाचवू शकतो. याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे तसचं, आपल्या मित्र परिवाराला देखील रक्तदानाचे महत्व समजवून सांगायला पाहिजे. जेणेकरून ते देखील रक्तदान करतील.

रक्तदान हे ज्या व्यक्तीचे वय १८ वर्ष पूर्ण आहे व त्याची शरीर प्रकृती चांगली आहे तसचं, रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन हे किमान ५० किलो तरी असायला पाहिजे. आपल्या गावात शहरात तसचं, एखाद्या शिबिरात जावून आपण रक्तदान करण्यास सहभाग घेतला पाहिजे.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.”

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन, निधन असलेल्या महत्वपूर्ण व्यक्ती तसचं,  काही इतिहास कालीन ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १४ जून रोजी येणारे दिनविशेष – 14 June Today Historical Events in Marathi

14 June History Information in Marathi
14 June History Information in Marathi

१४ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 June Historical Event

 • इ.स. १७७५ साली अमेरिकन सैन्य दलाची स्थापना करण्यात आली.
 • इ.स. १८९६ साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ मुलांसाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली.या संस्थेच्या माध्यमातून कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ असे अनेक प्रकारचे मोठमोठाले उपक्रम सुरु झाले.
 • सन १९०१ साली पहिल्यांदा गोल्फ खेळाची प्रतियोगिता अमेरिकेत आयोजित करण्यात आली.
 • सन १९०७ साली नॉर्वे देशांतील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.
 • सन १९३४ साली ऑस्ट्रिया देशाची राजधानी वियना येथे जर्मन शासक हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट झाली.
 • सन १९४० साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने पॅरिस देशावर आपला ताबा मिळवल्यामुळे मित्र राष्ट्रांनी तेथून माघार घेतली.
 • सन १९४५ साली ब्रिटीश अधिकारी वेव्हेल यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाला स्वायत्तता देण्यासंबंधी वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली.
 • सन १९६७ साली चीनने आपल्या देशांत प्रथम ‘हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.
 • सन १९७२ साली डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बांधी घालण्यात आली.

१४ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८६८ साली नोबल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ञ कार्ल लँडस्टीनर(Karl Landsteiner) यांचा जन्मदिन. रक्तगटाचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करून मुख्य रक्तगट ओळखले त्यांच्या या कामगिरी करता त्यांना नोबल पुरस्कार देण्यात आला.
 • इ.स. १८९९ साली महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी ब्रिगेडियर राजिंदर सिंह यांचा जन्मदिन.
 • सन १९०० साली भारतीय निबंध लेखक आणि मल्याळम साहित्यांचे साहित्यिक समीक्षक कारिककट्ट मराठू कुट्टिकृष्ण मरार यांचा जन्मदिन.
 • सन १९१६ साली माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेम चंद यांचा जन्मदिन.
 • सन १९२० साली प्रख्यात जैन धर्मीय स्वेतंबर तेरापंथ आदेशाचे दहावे प्रमुख, संत,  योगी, अध्यात्मिक नेते, तत्वज्ञ, लेखक, वक्ते आणि कवी आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा जन्मदिन.
 • सन १९४६ साली अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प(Donald Trump) यांचा जन्मदिन.
 • सन १९५५ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका अभिनेत्री, गायक, मनोरंजन निर्माता, टीव्ही टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्मदिन.
 • सन १९५९ साली लोकप्रिय भारतीय तेलगु भाषिक वक्ता व सनातन धर्मीय भाष्यकार चगंती कोटेश्वरा राव यांचा जन्मदिन.
 • सन १९६७ साली प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्मदिन.
 • सन १९६८ साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन.
 •  सन १९६९ साली प्रसिद्ध जर्मन माजी व्यावसायिक टेनिसपटू स्टेफनी मारिया(Stephanie Maria) यांचा जन्मदिन. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 22 ग्रँड स्लॅम एकेरीचे जेतेपद जिंकले आहे.

१४ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 June Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १८२५ साली फ्रांस-अमेरिकन सैन्य अभियंता व वॉशिंग्टन डी. सी. शहराचे मुलभूत रचनाकार  पियरे चार्ल्स एल्फांट(PierreCharles) यांचे निधन.
 • सन १९१६ साली आद्य महाराष्ट्रीयन मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन.
 • सन १९२० साली जर्मन समाजशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकीय अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमिलियन कार्ल एमिल वेबर उर्फ मैक्स वेबर यांचे निधन.
 • सन १९४६ साली जगप्रसिद्ध स्कॉटिश अभियंता व नवनिर्माण कार मेकॅनिकल टेलीव्हिजन (दूरचित्रवाणी) चे शोधक जॉन लॉगी बेयर्ड यांचा जन्मदिन.
 • सन १९६१ साली प्रसिद्ध भारतीय नोबल पारितोषिक वेजेते भौतिकशास्त्रज्ञ सी. वी. रमण यांचे शिष्य भौतिकशास्त्रज्ञ सर करिमानीक्कम श्रीनिवास कृष्णन यांचे निधन.
 • सन २००७ साली ऑस्ट्रिया देशाचे राजकारणी व मुत्सद्दी तसचं, ऑस्ट्रिया देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष व संयुक्त राष्ट्राचे माजी (४थे) सरचिटणीस कुर्त वॉल्डहाइम यांचे निधन.
 • सन २०१० साली भारतीय इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन.
 • सन २०११ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्र्विणा वादक भारतीय संगीतकार असद अली खान यांचे निधन.
 • सन २०२० साली बॉलीवूड एक्टर सुशांत सिंग राजपुत यांच निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here