Saturday, September 30, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १५ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 15 August Dinvishes

मित्रांनो, आज आपल्या भारत देशाचा स्वतंत्र दिन. सन १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्या देशाला इंग्रज सरकारकडून स्वातंत्र्य मिळालं होत. दरवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी आपल्या भारत देशांत स्वातंत्र्य दिन हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात. सन १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली येथील लाल किल्य्यावर भारताचा तिरंगी राष्ट्रध्वज फडकाविला.

शिवाय, आज बांगलादेश शोक दिन देखील आहे. सन १९७५ साली बांगलादेश चे संस्थापक व राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांना व त्यांच्या परिवारातील व्यक्तींना लष्करांनी ठार मारल होत. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ ऑगस्ट हा दिवस बांगलादेश मध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा करतात.

याव्यतिरिक्त आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

जाणून घ्या १५ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 15 August Today Historical Events in Marathi

15 August History Information in Marathi
15 August History Information in Marathi

१५ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 August Historical Event

  • इ.स. १५१९ साली स्पॅनिश विजेता सम्राट पेड्रो एरियास डेव्हिला(Pedro Arias Dávila) यांनी पनामा शहराची स्थापना केली.
  • इ.स.१८६२ साली ब्रिटीश कालीन भारतात मद्रास येथील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९१४ साली पनामा कालव्यातून एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.
  • सन १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपान देशाने शरणागती पत्कारली.
  • सन १९४७ साली पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.
  • सन १९४७ साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पदाचे सूत्र आपल्या हाती घेतली.
  • सन १९४७ साली देशांतील नागरिकांनी आपल्या भारत देशांत पहिला स्वतंत्र दिन साजरा केला.
  • सन १९७५ साली बांगलादेशात लष्करी उठाव होऊन बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान व त्यांच्या परिवारातील संपूर्ण व्यक्तींची हत्या करण्यात आली.
  • सन १९८२ साली देशांत रंगीत दूरचित्रवाणी च्या प्रसारणास सुरुवात झाली.
  • सन १९८८ साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.

१५ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७६८ साली फ्रांस सम्राट व राजकारणी नेपोलियन बोनापार्ट(Napoleon Bonaparte) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६७ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी कलाकार गणपतराव जोशी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७२ साली भारतीय स्वातंत्रता सेनानी, कवी, विद्वान, योगी आणि महान दार्शनिक अष्टपैलू प्रतिभेचे धनी अरविंदकुमार घोष यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी व लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ‘फुलारी’ ऊर्फ ‘बी. रघुनाथ’ यांचा जन्मदिन.
  • सन १९१७ साली महाराष्ट्रीयन राज्य पुरस्कार सन्मानित ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका अंबूताई गोरे उर्फ सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी आणि नाटककार वामनदादा कर्डक यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली प्रसिद्ध मराठी लेखक, संपादक आणि बालसाहित्यिकार उमाकांत ठोमरे यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली बंगला देशाच्या तसचं, मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये पंतप्रधान म्हणून लोकशाही सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला खालिदा झिया यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट अभिनेत्री राखी गुलजार यांचा जन्मदिन.
  • सन १९५८ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्मदिन.

१५ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९४२ साली भारतीय स्वतंत्रता सेनानी व लेखक तसचं, महात्मा गांधी यांचे खासगी सचिव महादेव देसाई यांचे निधन.
  • सन १९४७ साली पंजाब प्रांतातील प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक सरदार अजित सिंह यांचे निधन.
  • सन १९७५ साली बांगलादेशाचे संस्थापक व राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचे निधन.
  • सन २००४ साली भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी यांचे निधन.
Previous Post

स्वातंत्र्य दिनासाठी खास शुभेच्छा संदेश

Next Post

देशभक्ती कविता – Independence Day Poem in Marathi

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Independence Day Poem in Marathi

देशभक्ती कविता - Independence Day Poem in Marathi

Independence-Day

स्वातंत्र्य दिनाविषयी निबंध - Independence day Essay in Marathi

16 August History Information in Marathi

जाणून घ्या १६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

Break up SMS in Marathi

मराठी Break-Up कोट्स

Save Water Slogans in Marathi

"पानी वाचवा' या विषयी काही घोषवाक्ये"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved