जाणून घ्या २ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

 2 April Dinvishes

आजचे दिनविशेष सांगायचं म्हणजे आज जागतिक आत्मकेंद्रीपणा जागृत दिन. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांना जगभरातील ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रोत्साहित केलं जाते. २ एप्रिल २००८ साली झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने जागतिक आत्मकेंद्रीपणा जागृत दिन (वर्ल्ड ऑटिझम अवेयरनेस डे) म्हणून घोषित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी २ एप्रिल ला हा दिवस साजरा करण्यात येतो.

या व्यतिरिक्त आजच्या दिनी इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसेच आधुनिक काळातील वैज्ञानिकांनी लावलेले काही शोध अश्या प्रकारची संपूर्ण माहिती (2 April Today Historical Events in Marathi) आपण इथे पाहणार आहोत.

जाणून घ्या २ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 2 April Today Historical Events in Marathi

2 April History Information in Marathi

२ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 April Historical Event

 • इ.स. १५५९ साली मुघल शासक अकबर यांनी जजिया कर रद्द केला.
 • सन १६७९ साली मुघल बादशाहा औरंगजेब यांनी हिंदुवर ‘जिझिया’ कर लावला.
 • इ.स. १८४९ साली ब्रिटीश कालीन पंजाब राज्याची स्थापना झाली.
 • सन १८५७ साली गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुणे शहरात सार्वजनिक सभेची स्थापना केली.
 • इ.स. १८९४ साली कोल्हापूर येथील शासक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्यभिषेक करण्यात आला.
 • सन १९०५ साली मिस्र देशाची राजधानी काहिरा आणि दक्षिण आफ्रिका देशातील केपटाऊन शहरादरम्यान रेल्वेयात्रा सुरु करण्यात आली.
 • इ.स. १९२१ साली जर्मन नोबल पारितोषिक प्राप्त भौतिकशास्त्रज्ञ आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी न्यूयार्क शहरात आयोजित सभेत आपल्या सापेक्षतावादी सिद्धांताविषयी व्याख्यान दिले.
 • सन १९४२ साली दुसऱ्या महायुध्दा दरम्यानच्या कालावधीत देशांत सुरु असलेल्या चाले जाव आंदोलनाच्या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्यांनी क्रिप्स मिशनचा प्रस्ताव फेटाळला.
 • इ.स. १९८४ साली पहिले भारतीय अंतराळवीर विंग कमांडर व भारतीय वायुसेनेचे माजी पायलट राकेश शर्मा यांनी सोयुज टी-११ या अंतराळ यानातून उड्डाण केले. त्यांनी ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात प्रवास केला.
 • सन १९८८ सालच्या संसद कायद्यानुसार सन १९९० साली स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या बँकेची मुख्य शाखा लखनऊमध्ये आहे.
 • इ.स. २०११ साली भारतीय क्रिकेट संघाने सन १९८३ सालानंतर जवळपास २८ वर्षांनी विश्वकप जिंकला.
 • सन २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेनानी-नाश्री आणि जम्मू-काश्मीर यांची ‘लाईफलाईन’ असलेल्या ‘चेनानी-नश्री’ या सर्वात मोठ्या लांब बोगद्याचे उद्घाटन केले.

२ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७५६ साली सतराव्या शतकातील शैव अध्यात्मिक लेखक करुनाई प्रकाशसर यांचा जन्मदिन.
 • सन १७८१ साली हिंदू धर्मीय स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक स्वामीनारायण तथा सहजानंद स्वामी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५४ साली दक्षिण आफ्रिका देशातील व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्राप्त जॉन फ्रेडरिक मॅकक्रिया व्हीसी यांचा जन्मदिन.
 • सन १८८१ साली ब्रिटीश कालीन भारतातील तामिळनाडू येथील भारतीय क्रांतिकारक वरहनेरी वेंकटेश्या सुब्रमण्यम अय्यर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८२ साली प्रसिद्ध कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्मदिन.
 • सन १८९१ साली भारतीय राष्ट्रवादी व गोव्यातील वसाहतीविरोधी कार्यकर्ते तसचं, ‘गोवा राष्ट्रवादाचे जनक’ म्हणून लोकप्रिय व्यक्ती टी. बी. कुन्हा यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९८ साली भारतीय इंग्रजी कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन. हरिंद्रनाथ विजयवाडा मतदारसंघातील पहिल्या लोकसभेचे सदस्य देखील होते.
 • सन १९०२ साली पटियाला घराण्यातील भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९०७ साली प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक व अभिनेते गजानन जागीरदार यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२६ साली प्रसिद्ध कवी सुर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्मदिन.
 • सन १९३० साली बडोदा प्रांताचे महाराज, भारतीय राजकारणी व क्रिकेटपटू फतेसिंहराव प्रतापराव गायकवाड यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९४२ साली भारतीय-इंगजी अभिनेते महान कलाकर रोशन सेठ यांचा जन्मदिन.
 • सन १९४३ साली भारतीय समाजशास्त्रज्ञ तसचे, सुलभ इंटरनॅशनल या भारत-आधारित सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९६९ साली हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रखर आणि प्रभावी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अजय देवगन यांचा जन्मदिन. यांचे मुळ नाव विशाल देवगन आहे.
 • सन १९७२ साली भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्मदिन.

२ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 April Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १७२० साली पहिले मराठी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे निधन.
 • सन १८७२ साली अमेरिकन चित्रकार व संशोधक तसचं, ‘मोर्स कोड’ व ‘तारयंत्राचे जनक’ सॅम्युअल फिन्ली ब्रीस मोर्स यांचे निधन.
 • इ.स. १९३३ साली नवनगर येथील भारतीय नवजांचे राज्यकर्ते व नामांकित क्रिकेटपटू सर रणजितसिंग विभाजी जडेजा उर्फ रणजी यांचे निधन.
 • सन २००५ साली कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप जॉन पॉल दुसरे यांचे निधन.
 • इ.स. २००९ साली मराठी गायक व संगीतकार गजानन वाटवे यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here