जाणून घ्या २० ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

20 August Dinvishes 

मित्रांनो, दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस आपल्या देशांत दरवर्षी सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. यालाच आपण सद्भावना दिवस किंवा अक्षय उर्जा दिन म्हणून देखील ओळखतो. हा महत्वपूर्ण दिवस भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

शिवाय, प्रसिद्ध ब्रिटीश डॉ. रोनाल्ड रॉस यांना सन १८९७ साली समजल की, मलेरिया हा रोग डासांमुळे होतो. त्यांच्या निष्करणात आलं की, मादी हा डास चावल्याने माणसांना मलेरिया हा रोग होतो. त्यांनी या रोगाचा शोध लावल्यामुळे त्यांना नोबल पुरस्काराने गौरविण्यात आलं. म्हणून २० ऑगस्ट हा दिवस जागतिक मच्छर दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

तसचं, मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २० ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 20 August Today Historical Events in Marathi

20 August History Information in Marathi
20 August History Information in Marathi

२० ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 August Historical Event

 • इ.स. १८२८ साली राजा राम मोहन रॉय, द्वारकानाथ टागोर आणि कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्रह्मसमाजाचे पहिले अधिवेशन कोलकाता येथे आयोजित करण्यात आले.
 • सन १८९७ साली ब्रिटीश वैद्यकीय डॉक्टर सर रोनाल्ड रॉस(Ronald Ross) यांनी भारतात हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला.
 • सन १९१४ साली पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहरावर ताबा मिळविला.
 • सन १९६० साली सेनेगल देशाला माली देशापासून स्वातंत्र मिळालं.
 • सन १९७९ साली भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 • सन २००८ सालच्या बीजिंग ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार यांनी कास्यपदक जिंकले.

२० ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७७९ साली स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉन जेकब बर्झेलियस (Jöns Jacob Berzelius) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८३३ साली अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे २३ वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हैरीसन(Benjamin Harrison) यांचा जन्मदिन.
 • सन १९१५ साली भारतीय राजकारणी व दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याचे आठवे मुख्यमंत्री डी. देवराज उर्स यांचा जन्मदिन.
 • सन १९१७ साली पुरोगामी कवितांचे प्रसिद्ध कवी त्रिलोचन शास्त्री यांचा जन्मदिन.
 • सन १९४० साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, शांततेचा नोबल पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हवामान बदलांच्या आंतर-सरकारी पॅनेलचे अध्यक्ष राजेंद्र कुमार पचौरी यांचा जन्मदिन.
 • सन १९४४ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारताचे माजी सहावे पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिन.
 • सन १९४६ साली प्रख्यात भारतीय उद्योगपती व इन्फोसिस कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. नारायणमूर्ती यांचा जन्मदिन.
 • सन १९८६ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांचा जन्मदिन.

२० ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 August Death / Punyatithi /Smrutidin

 • सन १९१४ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उडिया भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार गोपीनाथ महंती यांचा जन्मदिन.
 • सन १९८५ साली पंजाब येथील अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरुद्वारात गोळ्या मारून हत्या करण्यात आली.
 • सन २०११ साली भारतीय प्राचीन व मध्ययुगीन कालीन इतिहासाचे अभ्यासक राम शरण शर्मा यांचे निधन.
 • सन २०१३ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते व लेखक तसचं, साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे गोळ्या मारून हत्या करण्यात आली.
 • सन २०१३ साली भारतीय ज्योतिर्भास्कर, लेखक, इतिहासकार, अभ्यासक व उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन.
 • सन २०१४ साली पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय योग शैलीचे संस्थापक व योग गुरु बी. के. एस. आयंगर यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here