Saturday, July 5, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २१ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

21 April  Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. सन १५२६ साली काबुल शासक जाहिरुद्दिन मोहम्मद बाबर व दिल्ली येथील सुलतान सत्तेचे शासक सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतचे पहिले युद्ध झाले. पानिपत येथे झालेल्या लढाईत मुघल शासक बाबर यांनी तोफांचा वापर केला तसचं, लोदी यांनी हत्तींच्या साह्याने हे युद्ध लढले. मुघल शासक बाबर यांची सेना इब्राहीम लोदी यांच्या सेनेच्या तुलनेने खूप कमी होती तरी सुद्धा ती इब्राहिम लोदिच्या सेनेवर हावी पडली होती. या युद्धात इब्राहिम लोदी मारल्या गेले आणि त्यांची दिल्लीवरील सत्ता मुघलशाहा बाबर यांच्या ताब्यात गेली. अश्या प्रकारे मुघल शाहीचा दिल्लीच्या तख्तावर पाया रोवला गेला.

याव्यतिरिक्त, आपण या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आही काही शोधकर्य (21 April Today Historical Events in Marathi) जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २१ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 21 April Today Historical Events in Marathi

21 April History Information in Marathi

२१ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 April Historical Event

  • इ.स. १५२६ साली मुघल साम्राज्याचे शासक सम्राट अकबर व सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतचे पहिले युद्ध होऊन त्यांत सुलतान इब्राहिम लोदी यांच्या पराभवानंतर दिल्ली येथील सुलतान शाहीचा अंत झाला.
  • सन १६६९ साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची भेट घेतली.
  • इ.स. १७२० साली पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी बनले
  • सन १९३२ साली नाशिक येतील काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी उघडे ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
  • इ.स. १९४१ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ग्रीस देश जर्मनी देशाला शरण गेला.
  • सन १९९६ साली भारतीय वायू सेनेचे अधिकारी संजय थापर पॅराशूट च्या साह्याने उत्तर ध्रुवावर उतरले.
  • इ.स. २००७ साली वेस्ट इंडीज देशातील क्रिकेट संघाचे महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी एकदिवसीय क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली.

२१ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८६४ साली जर्मन समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि राजकीय अर्थतज्ज्ञ मॅक्सिमिलिअन कार्ल एमिल वेबर यांचा जन्मदिन.
  • सन १९०९ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रकार व स्वातंत्र्योतर काळातील मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कला संस्थेचे पहिले भारतीय कुलगुरू जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२६ साली इंग्लंड देशाच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्मदिन.
  • सन १९३४ साली भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील लोकधर्म, लोकसंस्कृती, लोकदैवते आणि धर्मशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक गुंथर सोंथायमर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९४५ साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू व पंच श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांचा जन्मदिन.
  • सन १९५० साली भारतातील प्राख्यात किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायक पंडित उपेंद्र भट यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५० साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी व मराठी भाषिक दूरदर्शन आणि  चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्मदिन.

२१ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 April Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९१० साली अमेरिकन लेखक, विनोदी लेखक, उद्योजक, प्रकाशक,  व्याख्याता आणि “अमेरिकन साहित्याचे जनक” सॅम्युअल लॅंगोर्न क्लेमेन्स यांचे निधन.
  • इ.स. १९३८ साली ब्रिटीशकालीन भारतातील तत्त्ववेत्ता, बॅरिस्टर आणि सिद्धांतवादी तसचं, “पाकिस्तानचे आध्यात्मिक पिता” म्हणून आपली ओळख निर्माण करणारे पाकिस्तानी लेखक मुहम्मद इकबाल यांचे निधन.
  • सन १९४६ साली आपल्या कल्पनांच्या साह्याने मूलभूतपणे मॅक्रोइकॉनॉमिक्स आणि सरकारांच्या आर्थिक धोरणांचे सिद्धांत आणि प्रथा बदलणारे महान ब्रिटीश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केनेस यांचे निधन.
  • इ.स. १९५२ साली ब्रिटीश लेबर पार्टीचे राजकारणी, बॅरिस्टर आणि मुत्सद्दी सर रिचर्ड स्टाफर्ड क्रिप्स यांचे निधन.
  • सन १९६४ साली द्रविड चळवळीला चालना देणारे महान भारतीय तमिळ कवी भारतीदासन यांचे निधन.
  • इ.स. २०१३ साली “मानवी संघनक” म्हणून परिचित भारतीय गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणाऱ्या महिला शकुंतलादेवी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved